अल्सरवर घरगुती उपचारांची माहिती हवी आहे.

Submitted by कृपा on 24 May, 2013 - 10:17

अल्सरवर घरगुती किंवा आयुर्वेदिक उपचारांची माहिती हवी होती. काय खावे काय खावु नये .
कोणाला महिती असेल तर नक्की सांगा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी नवीन सदस्य आहे. मी चुकीच्या धाग्यावर प्रश्न विचारला आहे का?
मला खरच जाणकार लोकांकडुन मार्गदर्शन हवयं.

कृपा,
डॉक्टरांची ट्रींटमेंट चालू आहे का ? त्यांनी काय उपाय सुचवले आहेत ?
अल्सरसारखा आजार डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ट्रीट करायला हवा. काय खायचे / टाळायचे ते तेच सांगतील.
इथले डॉक्टरसुद्धा, प्रत्यक्ष पेशंट बघितल्याशिवाय सल्ला देऊ शकणार नाहीत.

कृपा,

अगदी प्रथम डॉक्टर! कृपया याला विचार त्याला विचार यात वेळ नका दवडू!

प्राथमिक माहिती म्हणजे तिखट आंबट टाळणे, दुधाऐवजी ताक, दही यांचा वापर करणे!

कृपा,

आपण अल्सर झाला आहे हे कसे निश्चित केले ? जर हे निदान पुर्वेतिहास आणी गॅस्ट्रोस्कोपीद्वारे झाले असेल तर हा अल्सर गॅस्ट्रीक आहे की डुओडेनल हे समजले असेल्,तसेच त्याची गंभीरता,म्हणजे अल्सर लहान आहे की मोठा,एक आहे की अनेक्,नुसते खरचटल्यासारखे आहे की अल्सर म्हणावा इतका मोठा आहे? आदि बाबी समजल्या असतील आणि त्यानुसार इलाज ठरविला जातो.

तुम्हाला घरगुती किंवा आयुर्वेदिक उपचार हवे आहेत..... मी वैद्य नसल्याने याबाबत अधिकारवाणीने सांगू शकणार नाही..... घरगुती उपचार किंवा खाण्याचे पथ्थ्ये या बाबत सांगू शकेन...

जेवणाच्या वेळा पाळा.... रोज १ वाजता आणि ९ वाजता समजा जेवत असाल्,तर त्याच वेळी जेवण केले जाईल असे कटाक्षाने पहा. वेळा चुकल्यास्,जेवणाच्या ठरलेल्या वेळेस अ‍ॅसिड सीक्रीशन रिकाम्या पोटीच चालू होईल व अल्सर बळावेल्,क्वचित प्रसंगी रक्तस्त्राव सुद्धा सुरु होवू शकतो.

तिखट-तेलकट पदार्थ खाण्याचे टाळा.

वेदनाशामक गोळ्या टाळा,घेतल्यास वैद्यकीय सल्ल्यानेच घ्या.

आणि मुख्य म्हणजे तुमच्या डॉक्टर ने संगीतलेला वैद्यकीय उपचार न चुकता चालू ठेवा.... डॉक्टरचे फॉलो अप्स चुकवू नका.

अल्सरचा आजार फार गंभीर असतो आणि रुग्णास सतत त्याचा त्रास जाणवत असतो........ पथ्य न पाळल्यास व वैद्यकीय सल्ला अंमलात न आणल्यास अल्सर फुटून ( परफोरेशन), परफोरेटिव्ह पेरिटोनायटीस होवू शकतो के ज्यासाठी तातडीची शस्त्रक्रिया करावी लागते.

१)बिब्बा पेटवून जे तेल पडते त्याचे पाच थेंब लोण्यात पाडा (= बिब्ब्याची शेवते ) . यात थोडी साखर टाकून दोनदा खाणे .हे औषध आहे २)बेल मुरब्बा दुकानात तयार मिळतो तो एकेक चमचा दोन तीनवेळा घेणे .हे अनुपान म्हणजे मुख्य औषधाबरोबर घेतात त्याने थंडावा मिळतो आतड्याची आग होत नाही.प्लैटिलैटस् कमी होऊ देत नाही .

srd
एक शंका.
१)बिब्बा पेटवून जे तेल पडते त्याचे पाच थेंब लोण्यात पाडा (= बिब्ब्याची शेवते ) . यात थोडी साखर टाकून दोनदा खाणे .हे औषध आहे..
<<
हे असलं 'औषध' तुम्ही कधी स्वतः घेतले आहे किंवा कुणाला दिले आहे का?

डॉ. गायकवाड, छान माहिती दिलीत.
दोन वर्षांपूर्वी माझ्या नवर्याला डयुडोनल अल्सर झाला होता. डॉ.नी व्यवस्थीत ट्रीट केलेलं.
सहा महिन्यापुर्वी थोडा त्रास जाणवला म्ह्णुन टेस्ट केली . रिपोर्ट निगेटीव्ह आला. (एच पायलरी)
आता परत थोडा त्रास वाट्तोय म्ह्णुन मी विचारले की ह्यावर आयुर्वेदीक,घ्ररगुती काही उपाय आहे का,
मागच्यावेळी डॉ नी काळ्जी करु नका असे सांगीतले होते.
खुप नेट सर्च केले पण योग्य उत्तर मिळ्त नव्हत म्ह्णुन इथे विचारले.
ज्यांना कोणाला स्वताचे अनुभव असतील त्यांनी जरुर सांगावे.

कृपा, अल्सरच्या बाबतीत डॉक्टरांचे उपाय आणि जोडीला एकूण लाईफस्टाइलमधे योग्य बदल आवश्यक आहे.

जीवनसत्व युक्त आहार आणि जोडीला रोजच्या जगण्यातील स्ट्रेसवर नियंत्रण ठेवल्यास खूप फायदा होतो. नो स्मोकिंग, नो अल्कोहोल हे गृहित धरुन चालतेय. टाळता न येण्यासारखा स्ट्रेस योग्य पद्धतीने हाताळायला शिकावे. नियमित व्यायाम आणि जोडीला ग्रॅटिट्युड जर्नल ठेवल्यास छान स्ट्रेस मॅनेजमेंट होते.

मी १४ वर्ष तोंडाच्या अल्सरचा त्रास सहन केला. दर आठवडाभरानी जिभेवर फोड यायचे. अशक्य वेदना व्हायच्या. घरघुती उपचार खूप केलेत पण फरक पडला नाही. पण एकदा एका वैद्यानी सांगितले की तुमच्या शरिरात बी जीवनसत्त्व अत्यंत कमी आहे. तसेही शाकाहारी माणसाच्या शरिरात बी जीवनसत्त्व कमीच असते. मग त्यांनी मला फोलिक अ‍ॅसिड आणि बी जीवनसत्त असलेल्या गोळ्या दिल्यात ज्याला आपण बी-कॉम्ब्लेक्सच्या गोळ्या म्हणतो. मी त्या फक्त ८ दिवस घेतल्यात. परत मला कधीच अल्सर झाला नाही. म्हणून मी तुम्हाला हा एकमेव सल्ला देईन की तुम्ही तुमच्या आहारात भरपुर पालेभाज्या, काकडी, ताक ठेवा आणि आत्ता लगेच उपचार म्हणून रोज सकाळ संध्याकाळ एक एक अशा बी कोंब्लेक्सच्या गोळ्या घ्या. बघा लवकर आराम पडेल.