आउट्लुक

Submitted by सस्मित on 9 May, 2013 - 03:35

माझ्या लॅपटॉप मधे आउट्लूक २०१० आहे. कालपासुन ते ओपन होत नाहीये. सुरु करताना जी विन्डो येते ती येते पण फक्त लोडींग प्रोफाइल असच दाखवतं पुढे काही होत नाही. ओएस विण्डोज् २००७ आणि आउट्लूक २०१० आहे. रीइनस्टॉल केल्यास आधीचा डेटा जायची भिती आहे. कृपया मदत करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रीईन्स्टॉल केल्यास डेटा जाईल अशी मला भिती वाटत होती म्हणुन कालपासुन प्रयत्न केला नाही. नवा आयटी वाला राजस्थानी ठोंब्या आहे Angry (समस्त आयटीवाल्यांनी आणि कुणी राजस्थानी असेलच तर Light 1 घ्या.)

सस्मित पी एस टी फाईल्स या अ‍ॅड केल्याशिवाय आऊट्लूकात मेल्स कसे दिसतील?
रि इन्स्टॉल करण्या आगोदर सगळ्या पीएसट्या जपून ठेव. आलू रिइन्स्टॉल कर आणि त्यात त्या पीएसट्या अ‍ॅड कर.

ठोंब्या पण आहे का? असो.
दक्षिणा धन्यवाद. आता त्यालाच कामाला लावलाय. म्हट्लं काहीही कर पण सुरळीत करुन दे. आता काय करतोय देव जाणे.

सस्मित, start >>> run >>> outlook /safe > enter. आउटलुक सेफ मोडमधे ओपन होते का पहा. होत असल्यास काही addons disable करुन पहा.

अथवा तुमची pst file corrupt झाली असण्याची शक्यता आहे. बॅकअप घेतला असेल तर scanpst करुन पहा. ठीक होऊ शकते. अथवा नवीन data file चा path देऊन पहा. हे करुन नाही चाललं तर re-install करा.

नंतर ईथे कळवाल का, कशामुळे प्रॉब्लेम गेला ते??