Submitted by Mandar Katre on 28 April, 2013 - 01:56
मालवणी नटसम्राट मच्छीँद्र कांबळी यांनी आपल्या दमदार अभिनयाने गाजविलेले, आणि मालवणी भाषेचा झेँडा सातासमुद्रापार पोहोचविणारे मालवणी नाटक वस्त्रहरण आज दुपारी 1 वाजता आणि सायं. 7 वाजता झी मराठी वाहीनीवरुन दाखविले जाणार आहे.
सर्वाँनी हे नाटक जरुर पहावे............
येवा कोंकण आपलोच आसा
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जरूर पाहणार. कलाकारांचा संचही
जरूर पाहणार. कलाकारांचा संचही जोरदार आहे. पंधरा वर्षांनी पुन्हा पहायचा योग येतोय. मात्र तात्यांच्या भूमिकेत मच्छिंद्र कांबळी आणि त्यांच्या प्रेमळ शिव्या खायला 'गोप्या' दिलीप कांबळी नसणार याचे थोडेसे दु:ख मनात राहील हे नक्की. तसे गोप्या आणि मास्तर (रमेश रणदिवे) अकालीच गेले त्यामुळे त्यांच्याशिवाय पहायची सवय होतीच पण मच्छिंद्रशिवाय पहिल्यांदाच पाहणार.
कुणाला रेकॉर्डींग करता येईल
कुणाला रेकॉर्डींग करता येईल का ???????
नक्की बघणार.
नक्की बघणार.
'वरिजिनल' चार- पांचदां पाहिलं
'वरिजिनल' चार- पांचदां पाहिलं तेंव्हां हें पहाणं तर आलंच. पण सगळे कसलेले कलाकारच घेतल्याने एकच भिती आहे - 'टू मेनी कूक्स स्पॉईल द ब्रॉथ ' , असं होऊंनये !
ऑडियो रेकॉर्डिंग दयनीय
ऑडियो रेकॉर्डिंग दयनीय आहे.... बन्द केले.
झी टीव्ही कडून घोर
झी टीव्ही कडून घोर निराशा.
ऑडिओ रेकॉर्डिंग एकदम खराब. नाटक नीट ऐकू येत नव्हतं, पण नाटकाच्या प्रत्येक ब्रेक च्या आधी राजकारणी मंडळींची भाषणं मात्र व्यवस्थित ऐकू येत होती. एका चांगल्या नाटकाची व्यवस्थित वाट लावून दाखवली झी टीव्हीने.
त्यातच मच्छिंद्र कांबळीची अनुपस्थिती पदोपदी जाणवत होती.
सात वाजता नाटक लावलंच नाही.
सात वाजता नाटक लावलंच नाही. फु बाई फु लावलंय. आता साडेआठला नाटक आहे म्हणे.
मी १ चा प्रयोग बघितला ....
मी १ चा प्रयोग बघितला ....
नाटक बघायला मजा नाही आली बॉस
नाटक बघायला मजा नाही आली बॉस (सेलीब्रीटी असल्या तरीही)
जुन्या संचाची तोड नाही आली
सो ज्यांचे चुकले त्यांना हळहळायच कारण नाही
(अवांतर : मच्छींद्र कांबळी म्हणायचे 'वस्त्रहरण माझे कॅश कार्ड आहे जेंव्हा केंव्हा मला पैशाची चणचण जाणवते तेंव्हा मी वस्त्रहरणचा प्रयोग लावतो)
झी मराठी वाल्यांनी सर्वांच्या
झी मराठी वाल्यांनी सर्वांच्या साक्षीने मराठी रसीकांचे महा- वस्त्रहरण केले. नुसत साऊंड रेकॉर्डींगच नाही तर व्हिडीओसुध्दा खराब होत.
बेकार. अर्ध्यातच बंद केले.
बेकार. अर्ध्यातच बंद केले. मधून मधून बघायचा प्रयत्न केला. अनासपुरे बेक्कार!
ह्या मी आदीच सांगलेलय
ह्या मी आदीच सांगलेलय
व्हीडीओच्या एडिटिंगमधे सॉलिड
व्हीडीओच्या एडिटिंगमधे सॉलिड झोल होते. ऑडीओ रेकॉर्डिंग तर खराब होतंच होतं.
अनासपुरेने एकाच सीनमधे येऊन अक्षरश: वाट लावली. प्रशांत दामले चुकीच्या नाटकात काम करत असल्यासारखा शिष्ट वागत होता. भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि पॅडी ओके ओके... पोर्याचं काम करणार्या अभिनेत्यांचं नाव विसरले, पण त्यांना माझ्यातर्फे कडक सॅल्युट!!! जितेंद्र जोशीचं पण काम ठिक होतं. पण तो त्या रोलला सूट वाटला नाही, का कुणास ठाऊक.
रत्नागिरीमधे एकदा मयेकर आणि इतर संच असलेलं वस्त्रहरण पाहिलं होतं (मच्छिंद्र कांबळींचं तर जेव्हा जेव्हा प्रयोग रत्नागिरीमधे आलेत तेव्हा पाह्यलेतच) पण या वेळेला मयेकर अगदी बुजल्यासारखे काम करत होते.
भीमाच्या पात्रपरिचयामधे "मनसे विभागप्रमुख" असल्याचा डायलॉग आल्यावर राज ठाकरेंनी कसला कोल्ड लूक दिला
अवांतर: मधेमधे हे चित्रीकरण २००९चे आहे अशी पाटी दाखवत होते. आनंदसुजुने वस्त्रहरणाचा महाप्रयोग आहे त्याला जाऊ या का? (बहुतेक षण्मुखानंदला) अशी टूम काढली तो हाच प्रयोग का?
अजून एक: नाटक मालवणी कमी आणि
अजून एक: नाटक मालवणी कमी आणि मराठीत जास्त चालू होतं. सर्वच पात्रांचे "शुद्ध" उच्चार फार खटकत होते कानाला.
१ एप्रीलला सेट टॉप बॉक्स
१ एप्रीलला सेट टॉप बॉक्स शिवाय आता टी,व्ही दिसणार नाही याची मोठी जाहिरात झाली. मग अनेकांनी सेट टॉप बोक्स खरीदले. पण ६० % टी. व्ही. सेट टॉप बॉक्स सिवाय चालु होते. बहुतेकांनी झी मराठी आणि सोनी दिसत नाहीत तर मरुदे उरलेले चानल तर पाहु असा पवित्रा घेतला होता.
मग अचानक सगळे च्यानल सेट टॉप बॉक्स शिवाय दिसु लागले आणि साधारण १४ एप्रील पासुन वस्त्रहरणाची जोरदार जाहिरात सुरु झाली.
मग अचानक २६ तारखेच्या मध्यरात्री सेट टॉप बॉक्स शिवाय सगळेच च्यानल दिसायचे बंद झाले तोवर मोठी जाहिरात झाली होती.
२७ तारखेला आपल्या केबल वाल्यांना विचारा कि किती सेट टॉप बॉक्स लावले. अश्या तर्हेने आपले उद्दीष्ट झी वाल्याने आणि सोनी वाल्याने साध्य केले. सगळ्यात जास्त पॉप्युलर मालिका इथेच आणि जाहिराती सुध्दा.
आनंदसुजुने वस्त्रहरणाचा
आनंदसुजुने वस्त्रहरणाचा महाप्रयोग आहे त्याला जाऊ या का? (बहुतेक षण्मुखानंदला) अशी टूम काढली तो हाच प्रयोग का? > होय तोच प्रयोग... माबोकरांनी महा गटग पार पडल्यावर महा वस्त्रहरण पाहिलेलं.
झी ने तर घोर निराशा केलीच पण नाटकातही मालवणी भाषेची उणीव पदोपदी जाणवत होती.
संवाद नीट कळत नव्हते. साउंड
संवाद नीट कळत नव्हते. साउंड रेकॉर्डिंग फ्लॉप. खूप डिस्टर्बन्स जाणवत होता.
उत्सुकतेने टीव्ही लावला...... पण रसभंग झाला.
रेकॉर्डिंगच्या वेळी किंवा नंतर आजूबाजूचे डिस्टर्बिंग आवाज विशिष्ट यंत्रणेच्या/सॉफ्ट्वेअरच्या सहाय्याने काढून टाकणे/कमी करणे शक्य होतं का ?
याविषयी याबाबतीतले जाणकार काही सांगू शकतील का ?
योगेश जोशी(योग) यांनी याबाबत मत व्यक्त करावे अशी त्यांना विनंती.
संजय नार्वेकर -शारीर अभिनय
संजय नार्वेकर -शारीर अभिनय आवडला. पण अनेक संवाद मराठीत म्हटले.
तात्या सरपंच आणि तो उड्या मारणार्या मुलगा या दोघांना प्रचंड शक्ती खर्च करावी लागत असणार. मच्छिंद्र कांबळींच्या आवाजातला उपरोध वॉस मिसिंग इन सरपंच. चेहर्यावर उद्वेग, वैताग्..इ.इ.च्या ऐवजी हसू होते ते आवरत नव्हते म्हणून होते अशी शंका येत होती.
राज ठाकरेंचा कोंडीत पकडले गेल्यासारखा चेहरा ,हसू येत नाही म्हणून तसा होता की आपण हसलो बिसलो तर काय म्हणून?
प्रशांत दामले कोणत्या
प्रशांत दामले कोणत्या भुमिकेमधे होता?
यदुनाथ. प्रशांत दामले
यदुनाथ. प्रशांत दामले विदुराच्या भूमिकेत होता.
संजय नार्वेकर: अर्जुन.
भरत जाधव: धर्मराज. (याच्या त्या इकडे तिकडे बघत मंचकावर बसत डायलॉगमधे वाट लावली होती, आनंदसुजु जास्त चांगलं करतो याच्यापेक्षा)
पॅडी: धृतराष्ट्र
सिद्धार्थ जाधव: दुर्योधन
जितेंद्र जोशी: इंद्रदेव
आणि दु:शासनाच्या भूमिकेत एकाच सीन्ससाठी येऊन वाट लावणारे : मकरंद अनासपुरे.
पोर्याचं काम करणार्या
पोर्याचं काम करणार्या अभिनेत्यांचं नाव विसरले, पण त्यांना माझ्यातर्फे कडक सॅल्युट!>>> अगदी, अगदी सहमत.
बाकी मालवणी भाषेचा वापर फारसा नसल्याने सगळी मजा गेली.
अतिचशय घोर निराशा. सुत्रधार,
अतिचशय घोर निराशा. सुत्रधार, मास्तर व तो वेडा मात्र खणखणीत.
Gopya- Mahendra Jadhav
Gopya- Mahendra Jadhav
माका बाकी काय नाय ओ याकच
माका बाकी काय नाय ओ याकच खटाकला.. मालवणी भाषा आणि भाषा बोलाचि ति लकब, तो हेल तात्या सरपंच थोडो फार दाखवि होतो.. नायतर पुर्या नाटकात आमच्या आवशिच्या भाषेचा (मातृभाषा) वस्त्रहरण च होता. मालवणी गाळि पण व्यवस्तित रित्या गाळलेल्यो होत्यो.. गोप्याची एनर्जि लेवल मात्र खास होति.
दशावतरावर केलेलो फार्स तो पण खयच मालवणि दशावताराची जोड दिसलि नाय.. त्या पेक्शा आसगावकर नायतर बाबि कलिगन ह्यांच्या सारख्या दशावतरांका घेवुन ह्या नाटक केल्यानि असता तर बरा झाला असता. (ह्या अपला माझा वयक्तिक मत हा)
मी नाटक मिसलं म्हणुन वाईट
मी नाटक मिसलं म्हणुन वाईट वाटत होतं पण वरचे सगळे प्रतिसाद वाचुन इतकं काही वाईट वाटत नाहीये.
पण आता <<<<<<<<<<<<<भीमाच्या पात्रपरिचयामधे "मनसे विभागप्रमुख" असल्याचा डायलॉग आल्यावर राज ठाकरेंनी कसला कोल्ड लूक दिला>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> हे मिसल्याचं वाईट वाटतय
मी मिसला हा एपिसोड.. पण
मी मिसला हा एपिसोड.. पण तूनळीवर येईल लवकरच !!!
वस्त्रहरण किती वेळा पाहिल्य
वस्त्रहरण किती वेळा पाहिल्य ते आठवतही नाही. कंटाळा आला/ उदासवाणे वाटले/ काहीच करायला नाही आणि शिवा़जीला किंवा रवींद्रला वस्त्रहरण असेल तर परत फ्रेश होण्यावर तो एक उत्तम उपाय होता. मी विवीध गोप्या पाहिले आहेत: दिलीप कांबळी, रमेश रणदिवे, लवराज कांबळी (नक्की माहित नाही) पण तात्या मात्र मच्छींद्र कांबळीच.
पुण्यात हे नाटक बर्यापैकी (९९%) मराठीत सादर करायचे. त्यामुळे माझ्या काकांना फार राग यायचे. त्यांना ते कधीच मालवणीत बघायला मिळाले नाही. कारण ते जेंव्हाजेंव्हा मुंबईत आले त्यावेळी नाट्काचे प्रयोग बाहेरगावी असायचे.
मुळात ही एक एकांकीका होती. पुर्वी टीव्हीवर नाटक सादर व्हायची त्यात राजा मयेकर तात्या असलेले नाटक बघितलेले आठवते. नाव वेगळे होते (विसरलो आता) आणि त्यात अर्धाच भाग होता. पण तेंव्हाही बघायला मजा आली होती.
ऊल्हास जी, कार्यक्रम पाहिलेला
ऊल्हास जी,
कार्यक्रम पाहिलेला नसल्याने नक्की काय प्रॉब्लेम होता माहित नाही, त्यामूळे बोलणे ऊचित ठरणार नाही.
पण मुळात ध्वनीमुद्रण स्पष्ट असावे अशी 'किमान' अपेक्षा (झी कडून) आहे..
अगदीच लोकल ट्रेन मध्ये किंवा गाव बाजारात रेकॉर्डींग केले तर 'बाहेरचे' ईतर आवाज मागाहून काढून टाकणे थोडे मुष्कील आहे, अन्यथा बाकी सर्व 'बाहेरचे' वा नको असलेले आवाज ९९% काढून टाकण्याचे तंत्रज्ञान ऊपलब्ध आहे. अगदी "लाईव्ह" कार्यक्रम देखिल स्पष्ट व दर्जेदार रेकॉर्ड करण्याचे सुलभ तंत्रद्यान अगदी सहज व कमी किमतीत ऊपलब्ध आहे.
अवांतरः 'दिल पडोसी है' या अल्बम मधिल बरीच गाणी पंचम, गुलजार, आशा कंपनीने रात्री स्टुडीयोत खिडक्या दारे बंद करून ध्वनिमुद्रीत केली. कारण स्टुडीयो रहदारीच्या रस्त्यावर होता आणि so called sound proof room ऊपलब्ध नव्हती... तरिही कुठेही काहिही खटकत नाही.
निव्वळ जाहिरातींवर मिनीटाला करोडो कमावणार्या झी ला तशी काही अडचण नसावी.
योगेश, विनंतीला मान देऊन
योगेश,
विनंतीला मान देऊन अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही कार्यक्रम पाहिला नसल्याने मत व्यक्त करणे उचित नाही हे पटले.
"मुळात ध्वनीमुद्रण स्पष्ट असावे अशी 'किमान' अपेक्षा (झी कडून) आहे.." >>> अगदी अगदी.
प्रयोग कुठल्यातरी मोठ्या ऑडिटोरिअममधे झाला असावा असे चित्रीकरणावरून वाटले.
तिथे स्पष्ट ध्वनीमुद्रणाची काळजी घेता आली असती.... असो....
या नाटकाचे पुनःप्रसारण झाले तर तुम्हाला कळवेन.
धन्यवाद.
मी अजून बघितलेलं नाहीये पण
मी अजून बघितलेलं नाहीये पण मला फार आशा होत्या. वस्त्रहरणची विडियो सिडी कुठेही सापडत नाही म्हणून मी फक्त ऑडियो ऐकतो पण ऐकताना सुद्धा काय मजा येते! मच्छिंद्र कांबळी, मास्तर (संवाद त्यांनीच लिहीलेत वाटतं, काय नाव आहे त्यांच?) आणि गोप्या हे कॅरॅक्टर असली धमाल उडवतात. अर्थात ह्या तिघांना जास्त काम आहे पण बाकी छोट्या छोट्या काम असणार्यांनी पण अगदी चोख बजावलय काम. चकणा प्रॉम्प्टर (चुकू नकोस चुकू नकोस!), शामराव डोळस ह्यांचे संवाद आठवले तरी हसायला येतं
ऑडिओ लैच बकवास. हमिन्ग साउन्ड
ऑडिओ लैच बकवास.
हमिन्ग साउन्ड येत होता.
टिव्हीच साउन्ड सेटीन्ग स्पीच वर लावल जेणेकरुन इतर आवाज कमी येतील पण मजा नाय..
त्यामुळे अधे मधे पाहिलं.
गोप्या म्हणजे तो पोर्याचं काय. लै जबरी राव तो.
एम भुरे फार वर्षानी दिसलात .
एम भुरे फार वर्षानी दिसलात . बरे वाटले. आपण पहिल्या धारेचे माबोकर
वैद्यबुवा, वस्त्रहरणची विडिओ सीडी नाहीच निघाली. हा कार्यक्रम ऑडिटोरिअममध्येच रेकॉर्ड केलेला दिसतोय कारण बरीच राजकीय भुतावळ समोर खुर्च्यात दिसतेय. बाहेरचे आवाज त्यात नाहीत पण आहे ते ध्वनिमुद्रणात इतका एको आणि हमिंग आहे की शब्दच कळत नाहीत . अगदी विरस झाला. तात्या इत्यादी नट नवे आणि बाकीची दुय्यम पात्रात सेलेब्रेटी नट त्यामुळे अगदी नाटकाचा तोल गेला आहे.... मी रेकॉर्ड करून ठेवलेय..
वैद्यबुवा, वस्त्रहरणची विडिओ
वैद्यबुवा, वस्त्रहरणची विडिओ सीडी नाहीच निघाली<<< वास्तविक झीकडे या नाटकाचा मच्छिंद्र कांबळी यांनी सादर केलेला "पात्र परिचय" हा भाग आहे या नाटकातला. जेव्हा झी मराठी हे अल्फा मराठी होतं तेव्हा पहिल्या अॅवोर्ड फंक्शनला सादर केलं होतं. त्याची क्वालीटी उत्तम आहे, मच्छिंद्र कांबळी आहेत त्यामधे. त्या एका भागाची सीडी आली बाजारात तर मी आनंदाने घेईन. लोक पण घेतालच. (झीवाले कोणी हे वाचले का? )
काहि मजा नाहि आली नाटक
काहि मजा नाहि आली नाटक पाहताना.. मालवणी माणुसच नाय म्हटल्यार काय नाटक होणार?मच्छींद्रांची खुप आठवण आली नाटक पाहताना.. अर्ध्यातुन बंदच केलं.
<< शिवा़जीला किंवा रवींद्रला
<< शिवा़जीला किंवा रवींद्रला वस्त्रहरण असेल तर परत फ्रेश होण्यावर तो एक उत्तम उपाय होता.>> माझांय नेमक्यां ह्यांच. नाटक म्हणून 'वस्त्रहरण' ग्रेट होतं कां हा मुद्दा विवाद्य असेलही पण वातावरण निर्मितीचा एक उच्चांक त्या नाटकाने गांठला हें निर्विवाद. पुन्हां पुन्हां तें नाटक पहायला जाणारे माझ्यासारखे त्या वातावरणाने भारावूनच तिथं जायचे व त्याचं बरचसं श्रेय मच्छिंद्र कांबळीना व ठसक्यात बोललेल्या मालवणीलाच जातं. म्हणून टीव्हीवरच्या या खेळाबद्दल मीं आशावादी नव्हतो व निराश होण्यापासून वांचलो. [शिवाय, सुरवातीलाच म्हटल्याप्रमाणे << 'टू मेनी कूक्स स्पॉईल द ब्रॉथ ' , असं होऊं नये >> तसं झालंच !! : डोमा: ]
(No subject)