CME

Submitted by बाण२ on 27 March, 2013 - 09:12

रजिस्ट्रेशन रिन्यु करण्यासाठी मला १२ गुणांची गरज आहे. त्यासाठी मला ६ सी एम ई अटेंड करायचे आहेत. अपघातानंतर दोन वर्षे घरीच असल्याने सी एम ई करता आले नाहीत.

मला अगदी तातडीने गुण गोळा करायचे आहेत. मुंबईतील सी एम ई देखील मी अटेंड करु शकेन. कृपया डॊक्टर मंडळीनी मला मदत करावी. मुंबईत दर आठवड्याला कुठेतरी ( आय एम ऎ त का?) सी एम ई होतात, असे समजले. प्लीज हेल्प करा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सध्या कुठे स्टेट / नॅशनल लेवल कॉन्फरन्स होतायत का बघा.
नॅशनल लेवलला ४ मार्क आहेत एका दिवसाला.
मी मुंबईत नसल्याने बाकी काही माहिती नाही.

एक हेल्थ युनिवर्सिटी डॉट कॉम आहे तिथे ऑनलाईन सीएमई असतात त्या एम सी आय कंसीडर करते असे म्हणतात.फ्री रजि आहे. त्या करा.

४ मार्क एक दिवसाला देत नाहीत बहुतेक... ऑनलाइनही कन्सीडर होत नाहीत... मोठे सेमिनार कितीही दिवस चालले तरी दोनच दिवस धरतात. त्यापेक्षा जास्त दिवस सलग कन्सीडर होत नाहीत. २ गुणिले २ = ४.

जी पी आणि पी जी ना कदाचित मार्क वेगळे असावेत..... जी पी ना सब्जेक्ट देखील जी पी लेवलचाच लागतो... उगाच मोठा सेमिनार किचकट विषयावरचा नुस्ते पोइंट मिळतात म्हणून जी पी ने केला तर कन्सीडर करत नाहीत. रुल्स फार किचकट केले आहेत.

ऑनलाइन CME कन्सीडर होत नाहीत. GP साठी दर गुरुवारी मुंबईत १ तास CME (दु. १२ ते १) माहीम येथे असते.
MMCमध्ये renewal असेल तर फार त्रास देत नाहीत, माझी certificates वरवरनच चाळली होती मुंबईत.

सर्टिफिकेट वरवरच चाळतात ... पण ती सर्टिफिकेट तरी हवीत .... माहीमला नेमके कुठे? फोन नंबर अ‍ॅड्रेस मिळेल का?

गुरुवारी दुपारी हिंदुजा हॉस्पीटल,माहीम आणि शनिवारी नानावटी हॉस्पीटल, विलेपार्ले येथे GPs साठी cme होतात . free registration at the venue. १ पॉईंट एकावेळी. त्यांच्या वेबसाईट बघा details साठी.

mmc त माझ्या लेकाने ५ महिन्यापुर्वी महाराषट्रात रजिस्ट्रेशनसाठी अर्ज व कागदपत्र दाखल केली आहेत्,फोन उचलत नाहीत!पुण्याहून समक्श भेटायला तीन वेळा गेला तर दिल्लीला कगदपत्र पाठवली आहेत त्यान्च्याकडून noc आलेकी कळवू असे उत्तर मिळते!त्याच्या कामाच्या वेळामुळे सारखे मुम्बईला जाणे शक्य नाही!काही मार्ग सुचवाल का? त्याने DNB OPHTHALMOLOGY ची PRACTICAL ची परिक्षा दिली आहे त्याने दिल्लीहून DNB केले आहे व तेथे apply केले तेव्हा दोन दिवसात रजिस्ट्रेशन झाले! महाराष्ट्रातच इतकी बेपर्वाई का? उपाय असेलतर सान्गा.

सुचरिता,
दिल्लीला एन.ओ.सी करता कागद पाठवले असतील तर खरेच वेळ लागणार आहे. टेन्शन घेऊ नका.

एम एम सी रजिस्ट्रेशन म्हणजे महाराष्ट्रात वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना असा त्याचा अर्थ आहे. एम.बी.बी.एस. चे मूळ रजिस्ट्रेशन त्याच्याजवळ आहे ना? मग अ‍ॅडिशनल क्वालिफिकेशनच्या नोंदी साठी वेळ लागल्याने प्रॅक्टिकली काडीचाही फरक पडत नाही. बेसिक रजिस्ट्रेशन नंबर बदलत नाही, पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर फक्त अ‍ॅडिशनल क्वलिफिकेशन ची नोंद होते. त्याला जॉब/खासगी व्यवसाय करायला काहीही अडचण नाही. डिग्री सर्टिफिकेट असणे पुरेसे आहे. पण अ‍ॅडिशनल क्वालिफिकेशन ची नोंद करवून घेणे चांगले.

(नुसती परिक्षा दिली असेल, अन रिझल्ट अजून आलेला नसेल तर डीएनबीचे रजिस्ट्रेशन कसे काय होईल? हा एक प्रश्न आहेच..)

जुपिटर हॉस्पीटल, ठाणे येथे IMA मेम्बर असाल तर नाममात्र ५० रु घेतात .नाहीतर ५०० रु.मोजावे लागतात एका पॉइंट ला .मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटल ला १५० रु. एक .फोर्टिसला फोन करून माहिती मिळेल .परळला cps कॉलेजमध्ये बहुदा दर शनिवारी किंवा एक सोडून सकाळी असते pl .confirm . .तेथेही १०० रु घेत होते मागील वर्षी पर्यंत.

आय एम ए मेंबर म्हणजे नेमके कुणाचे मेंबर? लोकल ब्रंअ‍ॅचचे की आय एम ए चे ? मी आय एम ए चा लाइफ मेंबर आहे. पण आमच्या गावच्या लोकल ब्रँचच्या थ्रु ..

बाण मोडला . म्हणून उद्दाम झालो.

आय एम ए मुंबई वेस्ट चा आय एम ए हॉल आहे. चंदन सिनेमा जवळ, अंधेरी वेस्ट . तिथे रवि, मंगळ, गुरु अतिशय सुरेख सी एम ई होतात.

सध्या मुंबईत भटकती आत्मा होऊन फिरत आहे.

माझे ६ पॉइंट झाले.

मुंबईत जी पी ए असोसिएशन आहे. काही हॉस्पिटलमध्ये फक्त जी पी ए मेंबरनाच अलाउड करतात ... Sad ... नाहीतर एव्हाना माझे १२ मार्क कधीच झाले असते. Sad

जॉय हॉस्पिटल, चेंबूर .. दर शुक्रवारी दुपारी २-५

.

सी एम्म ई म्हणजे कंटीन्युस मेडिकल एजुकेशन.

म्हणजे पूर्वीच्या काळी एम बी बी एस झाले तर रजिस्ट्रेशन नंबर मिळायचा. नंतर आयुश्यभर सरकार त्याला काही विचारत नव्हते. तो आयुश्यभर बिनधास्त प्र्क्टीस करायचा.

२००७ नंतर सिस्टीम बदलली. आता रजिस्ट्रेशन ५ वर्षासाठीच मिळते. या पाच वर्षात त्याला सी एम ई करावे लागतात. म्हणजे हॉस्पिटल, मेडिकल असोसिएशन्स विविध लेक्चर अरेंज करतात. त्याला जाऊन आपले ज्ञान वाढवायचए... मग ते अटेंड केले के एक मार्काचे सर्टिफिकेट मिळते. अशी वर्षाला किमान ६ गोळा करायची.. पाच वर्स्।आनंतर अशी ३० गोळा केलीत तर तुमची डिग्री रिन्यु होणार. अन्यथा नाही.

सध्या हे फक्त एम बी बी एस लोकाना लागू आहे. २०१५ नंतर बी ए एम एस , बी एच एम एस, डेंटिस्ट सर्वानाच ही पद्धत येणार म्हणे.

कोरे सर्टिफिकेटबद्दल माहिती नाही... तसेही आणखी काही दिवसात माझे १२ गोळा होतील.

१२ प्वाइंट झाले. बारावे सर्टिफिकेट चार दिवसांपूर्वीच मिळाले. आज कौन्सिलात जाऊन रजिस्ट्रेशन रिन्यु केले. ५०० रु + १६०० रु दंड लेट फी .. Sad

मदत केल्याबद्दल सर्वांचे आभार. Happy