जुन्या ऑडियो कॅसेट्सचे काय करावे?

Submitted by जिप्सी on 21 February, 2013 - 00:08

माझ्याकडे एचएमव्ही, युनिव्हर्सल, टि सिरीज या कंपनीच्या काहि ऑडियो कॅसेट्स (चांगल्या स्थितीतील) आहेत. यातील बहुतेक सर्वच गाणी माझ्याकडे सीडी/डिव्हीडीत, MP3 फॉर्मेटमध्ये असल्याने (आणि काही गाणी कन्व्हर्ट केल्याने) ऑडियो कॅसेट्स वापरत नाही आहे. घरच्यांच्या मते ती "अडगळ" आता फेकुन द्यावी. Sad पण इतके वर्षे सांभाळलेला हा ठेवा कुणा दर्दी रसिकाच्या हातात पडावा असे मला वाटतंय. यातील बर्‍याचशा या एचएमव्ही ने काढलेले "HMV के अनमोल रतन" या मालिकेतील असुन त्यात लता मंगेशकर, किशोर कुमार, मोहम्मद रफी, आशा भोसले, येसुदास, सुरेश वाडकर यांनी गायलेली लोकप्रिय गीते आहेत. कॉलेजात असताना पॉकेटमनी वाचवून केलेला हा संग्रह असाच टाकुन द्यावासा वाटत नाहीत. Sad

जुन्या गाण्यांची आवड असलेल्या (आणि अजुनही कुणी टेपरेकॉर्डर/ऑडियो कॅसेट प्लेयर वापरत असेल तर) कुणाला जर ह्या कॅसेट्स पाहिजे असेल तर कळवा मी त्या सगळ्या विनामुल्य देईन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे असलेल्या ऑडियो कॅसेट्सची संख्याही तीन आकड्यात आहे. पण कॅसेट प्लेयरने(टु इन वन) राम म्हटलाय. अगदी हाय-फाय म्युझिक सिस्टमच्या कॅसेट प्लेयरनेही. आणि त्याचा डॉक्टर मिळत नाही आहे.

जिप्स्या माझ्या कडे तर शास्त्रिय संगीताच्या कॅसेट्स चा खजिना आहे त्यात भारतातिल सगळे अग्रगण्य दिग्गज लोक आणि त्याच बरोबर इंन्स्ट्रुमेंट च्या पण आहेत जसे बासरी, संतूर, सनई, पखवाज ....

सगळं कलेक्शन माझ्या दिवंगत वडिलांचे आहे. ते रोज पहाटे ४ ते ७ आपल्या खोलीत हे सगळं ऐकत वाचत बसायचे... मधुनच दाद दिल्याचे जोराजोरात "व्वा व्वा.." म्हंटल्याचे आवाज यायचे. माझ्या, लग्ना आधी च्या अनेक सकाळी अशा शास्त्रिय संगिताने समृद्ध असायच्या..... आता बाबा गेले... त्यांचा वाली कोण??? त्याच बरोबरीने कथाकथन, नाटकं.... बापरे जवळ जवळ २००-३०० असतिल....

माझ्या कडे आहे त्यांचा कॅसेट प्लेयर... वॉकमन... मी वापरते अधुन मधुन...

मोकीमी,
त्या कॅसेट्स लवकरात लवकर MP3 कन्व्हर्ट करून घ्या. फार दिवस न वापरता ठेवलेली ऑडिओ कॅसेट खराब होऊन जाते. मग फार वाईट वाटते..

आता सर्व ऑनलाइन मिळत असल्याकारणाने ,टाकुन द्यावे हाच एक बेस्ट उपाय मला तरी वाटतो

कॅसेट खराब झाल्या तर कडक उन्हात ठेवाव्यात असं ऐकलं होतं ब्वॉ. याचा यशस्वी प्रयोगही करुन पाहिला होता.

मला गीतरामायणाच्या हव्यात ...आख्खा संच!

भरत, सेम पिंच
मोकीमी, यातील बर्‍याच कॅसेट्स मी MP3 मध्ये convert करून घेतल्या आहेत.
इब्लिस,+१ Happy
श्रीगाप्र, तेच तर जमतं नाही ना Happy
आर्या, सगळ्या कॅसेट उत्तम स्थितीत आहे. Happy

जिप्सी, आता ती अडगळच आहे. ( ती म्हणजे त्या कॅसेट्स, गाणी अर्थातच अमूल्य ठेवा आहे. ) आणि आता गावाकडच्या गाड्यातही कॅसेट प्लेयर्स नसतात.

आर्या, गीतरामायणदेखील एम पी ३ फॉर्मॅट मधे उपलब्ध आहे.

घरोघरी मातीच्याच चुली...आमच्या घरात अशा जवळपास ३५०-४०० कॅसेट्स आहेत...

जिप्स्या तुझा कॅसेट प्लेअर सीपीयू ला कनेक्ट कर, काँप चा साऊंड कार्ड वापरून वेव मधे सेव कर मग पुष्कळसे फ्री प्रोग्रॅम्स मिळतील तुला ,त्यातून चूज करून एम पी ३ मधे कनवर्ट करून ठेव
मी साऊंड फोर्ज आणी अ‍ॅडॉबे ऑडिशन हे दोन प्रोग्रॅम्स वापरते
ताक.. एम पी ३ मधे रेअर कॅसेट्स कनवर्ट करून झाल्यावरही टेप्स फेकून देत नाही.. नॉस्टेल्जिक वॅल्यू इज टू मच Wink

कॅसेट्स MP3 मध्ये convert कशा करतात?
किंवा कुठे करुन मिळतात?

माझ्याही घरी सुमारे १००-१५० कॅसेट्स आहेत Sad
आणि त्यात काही आम्ही घरी रेकॉर्ड केलेल्या आहेत ज्या बाहेर मिळणार नाहीत. (आजीने गायलेला पाळणा, आमच्या पणजोबांचा आवाज वगैरे) अजुन तरी त्या उत्तम स्थितीत आहेत!

वर्षूचा उपाय टेक्नीकली खुपच उत्तम आहे. पण हे सगळे व्हायच्या आधी मी एक भन्नाट प्रकार केला होता. माझ्याकडे ट्रान्सेंड चा एम पी ३ प्लेयर होता, त्यात रेकॉर्डींगची सोय होती. मी त्या कॅसेट आणि हा प्लेयर एका जाड टॉवेलमधे गुंडाळून गाणी रेकॉर्ड केली.
आपल्या मायबोलीकर प्रियाने मला सविस्तर लिहिले होते. पण नंतर बहुतेक कॅसेट्स पुराच्या पाण्यात खराब झाल्या. त्यापैकी बरीच गाणी नंतर मिळाली, पण जी आता मिळत नाहीत त्यात, लताने गायलेला गीतेचा अध्याय ( सिडी मधे नाही तो) ज्ञानेश्वरीचा अध्याय. किर्ती शिलेदार यांच्या आवाजात शंकराभरणम आणि अनेक अभंग. संगीत मंदोदरी तल्या गाण्यांचे मी केलेले रेकॉर्डींग असे काही होते. देवगाणी हा डॉ. अशोक रानडे यांनी सादर केलेला भक्तीगीतांचा संचही होता. हे सगळे आता गंगार्पण झाले.

मी साऊंड फोर्ज >>>>>>>>>>> वर्षुजी आपल्या कडे विकत घेतलेला आहे का हा सॉफ्टवेअर...?

त्या कॅसेट मधल्या रिबीन काढा आणी लहान मुलांना खेळायला द्या.
पतंगाचा मांजा म्हणुन चांगला उपयोग होतो त्याचा.

आणि त्यात काही आम्ही घरी रेकॉर्ड केलेल्या आहेत ज्या बाहेर मिळणार नाहीत. (आजीने गायलेला पाळणा, आमच्या पणजोबांचा आवाज वगैरे) अजुन तरी त्या उत्तम स्थितीत आहेत!
<<
अशाच कॅसेटस साठी एम्पी३ कन्व्हर्ट करून घ्या म्हटले आहे. वर्षू नील यांनी बरोबर सल्ला दिलेला आहे. कमीत कमी वेव्ह फॉर्मॅट चालेले. मग त्याचे एम्पी३ कसेही करता येते.

धन्यवाद प्रसाद १९७१ या नको असलेल्या प्रतिसादाबद्दल.
इतके वर्षे सांभाळलेला हा ठेवा कुणा दर्दी रसिकाच्या हातात पडावा असे मला वाटतंय>>>>हे बहुतेक तुम्ही वाचलेलं दिसत नाही. नाहीतर त्याचे असं काहितरी करायचं हे सांगितल नसतं.

प्रसाद १९७१ जे विचारलंय त्याचीच माहिती दिली तर जास्त चांगले होईल आणि जर तुमच्याकडे ती नसेल तर जस्ट इग्नोर माय पोस्ट.

बाकी, वाद घालायला इतर बाफ मोकळे आहेतच.

जिप्स्या एक काम कर, मला एका टेपरेकॉर्डर/ऑडियो कॅसेट प्लेयर, सोबत त्या सगळ्या कॅसेट पाठवून दे. हा.का.ना.का. Proud

लवकरात लवकर कन्व्हर्ट करा. माझ्या कडच्या जवळजवळ सर्व ठेवून ठेवून खराब झाल्या.
कॅसेट प्लेयर्स दुरुस्त झालेच नाहीत.
विडीओ कॅसेट खराब होवू नयेत म्हणून त्याच्या सीडी करून ठेवल्यात. आता त्या सुद्धा हार्ड डिस्क वर घ्याव्या लागतील.

जिप्सी, भरत हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. धरल तर चावतं... अशी गत आहे. माझ्याकडे laptopवर software dowload केलेले आहे आणि सोनीचा एक साधा टेपरेकॉर्डरही आहे. त्यामुळे कधीतरी मुड आणि वेळ असेल तर गाणी transfer करतो. पुर्वी जुन्या computer वरही हे केले होते. त्यावेळी गुगल मुझिक नसल्याने computer crash मुळे सर्व वाया गेले. आता तेव्हढा हुरुप राहिला नाही. जी तुझी व्यथा आहे ती बहुतेक सर्व संग्रहकांची असेल. फार दुर्मिळ नसली तरी "आल्या नाचत मेनका रंभा"ची ३ कडवी असलेले गाणे, मुकुंद आचार्यांकडुन मिळालेली लता/ आशाची गाणी: आडवाटेला दूर एक माळ, आली दिवाळी मंगलदायी, घरोघरी वाढदिवस... तसेच तीसरी मंझिल, गाईड OSTमध्ये आहे. त्यात सर्व गाण्या आधी थोडे डायलॉग आहेत. त्यात देखिये साहिबो.. पुर्ण गाणे आहे. रफी आणि तलतचे प्रायव्हेट आल्बम.....बहुधा ह्या बाफमुळे कदाचित आता काही दिवसतरी परत transferचे काम चालू करीन. ज्यांनी हा कॅसेटचा संग्रह केला आहे त्यांना तुझी कळकळ नक्कीच कळेल, बाकीच्यांनी पतंग उडवावे नाहीतर लगोरी खेळावी. ज्यात्याप्र.

जिप्सी, कॅसेटवरुन एम्पीथ्री बनवल्यास त्याचा दर्जा फारसा चांगला होत नाही. १२८ बिट रेकॉर्ड होत नाही बहुधा शिवाय नॉईज जास्त येतो. जर हि सगळी गाणी डिजीटल म्हणजे सिडी मधे मिळत असतील तर ती घे. त्यात एखादे न मिळणारे असेल तर ते मात्र रेकॉर्ड करुन ठेव.
कॅसेट देण्यासाठी अंधशाळा किंवा वृद्धाश्रम हे पर्याय चांगले आहेत पण सुमेधा म्हणतेय तसे टेप्-रेकॉर्डर सकट देणे. देण्याआधी त्यांच्याकडे अशी काही सिस्टीम आधीच आहे का नाही याची चौकशी करुन देणे.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद लोक्स Happy
राज, सुमेधा, सावली, अंधशाळा किंवा वृद्धाश्रम देणे हा पर्याय मनापासुन आवडला Happy अगदी नविन टेपरेकॉर्डरसहित द्यायला मी तयार आहे. Happy

कॅसेटवरुन एम्पीथ्री बनवल्यास त्याचा दर्जा फारसा चांगला होत नाही
जर हि सगळी गाणी डिजीटल म्हणजे सिडी मधे मिळत असतील तर ती घे. त्यात एखादे न मिळणारे असेल तर ते मात्र रेकॉर्ड करुन ठेव.>>>>>>अगदी अगदी. हेच केलंय मी Happy Happy

जिप्सी, योग यांचे पंचमवरचे लेख वाचतो आहेस ना? एक कलाकार म्हणून नाही पण एक श्रोता म्हणून तरी आपल्याला तंत्रज्ञानानुसार बदलले पाहिजे. कोणी तो ठेवा घेणारा मिळाला तर उत्तमच नाही तर मनावर दगड ठेऊन अडगळीत काढायचा. नाही तरी कॅसेट प्लेअर नसताना त्या वाजवणे अशक्यच होत जाणार आहे.

दिनेश, बाकीच्या माहीत नाही पण लताची गितेची सिडी रीदम हाऊसमध्ये मागच्याच महिन्यात बघितली होती. इथे पण उपलब्ध आहे.