facebook service बंद केली आहे.

Submitted by मया on 14 February, 2013 - 01:44

मी जिथे part time काम करतो तिथे बाकी सर्व site open होतात facebook सोडून आणि बाकी सर्व system वर facebook site open होते कोणी तरी ती बंद करून ठेवली आहे तरी मला ती चालू करण्यासाठी मदत करावी.
काय करावे लागेल जेणे करून ती चालू होईल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुमच्या सिस्टिम अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशिवाय दुसरं कुणी तुम्हाला मदत करू शकेल असं वाटत नाही. ९९% हापिसात फेसबूक बॅन असते माझ्या माहितीप्रमाणे.

मी जिथे part time काम करतो त्यामुळे ४ तास असतो तिथे आणि office काही मोठे नाही आणि दुसरे म्हणजे मी अगोदरच सांगितले बाकी सर्व system मध्ये facebook चालते.

.

<तुमच्या सिस्टिम अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशिवाय दुसरं कुणी तुम्हाला मदत करू शकेल असं वाटत नाही. ९९% हापिसात फेसबूक बॅन असते माझ्या माहितीप्रमाणे.>+ १००००

मी पण तेच सांगितलं की सिस्टिम अ‍ॅडमिनिस्ट्रेटर मदत करेल. म्हणजे तुमच्या ऑफिसातल्या कंप्युटर्सचा मेंटेनन्स कोण करतो? त्याला विचारा.
शेवटचं वाक्य हे अवांतर होतं.

तुमच्या सिस्टिम अ‍ॅडमिनिस्ट्रेटरशिवाय दुसरं कुणी तुम्हाला मदत करू शकेल असं वाटत नाही. ९९% हापिसात फेसबूक बॅन असते माझ्या माहितीप्रमाणे.>>>>>>>>>>>>> हेच सत्य आहे आणि त्यात तुम्हाला कोणीही मदत करु शकत नाही तुमच्या सिस्टम अ‍ॅडमिन शिवाय

जर मीच अ‍ॅडमिनिस्ट्रेटर असलो असतो तर काय कराव लागल असत ते तर सांगा.>>>>>> तुम्हीच अ‍ॅडमिन असता तर तुम्हाला हे प्रश्न विचारण्याची गरजच पडली नसती ...... तेव्हा मुकाट काम करा हाच प्रेमाचा सल्ला Happy

facebook service बंद केली आहे.>>>>>>>>>>>> बरंय की मग. आहे काय त्या फेसबुकात. Happy

@मया: तुम्ही सिक्युअर्ड लॉगीन ट्राय करा: https://facebook.com

जर ते पण नाही चालले तर तुम्हाल तुमच्या संगणकाची hosts फाईल एडीट करावी लागेल. मी गॄहीत धरतो की तुम्ही Windows 7 OS वापरत आहात. खाली दिलेल्या लोकेशनला नॅव्हीगेट करा:

C:\Windows\System32\drivers\etc\hosts

hosts फाईल तुम्हाला नोटपॅड ऑप्शन वापरुन खोलावी लागेल. त्यानंतर फाईल मध्ये कुठेही facebook.com संदर्भात एन्ट्री सापडली की ती पुर्ण ओळ डिलीट करा (along with the IP address, the entry can be anything like this: 127.0.0.1 facebook.com)

फाईल सेव्ह करा, आणि फेसबुकचा आनंद घ्या !! Happy

अहो चार तासात पण करमत नाही फेबू शिवाय कमाल आहे? अहो ते काय... हि आहे का? की ते ?..:फिदी:

फेबू वर काही लोकांचे स्टॅ वाचून टाळक्यात जाते, तर आम्ही कसे नुकतेच इथे जावून आलू , तिथे जावून.. (जा ना बापुडे, आम्हाला काय.. पण ते सर्वच्या सर्व पोझचे फोटो का टाकता? Wink

बरं, मुद्द्याचे. ऑफीसची पॉलीसी असेल तर तुम्हीच काय कोणीच करु काय शकणार नाही. (इथे सभ्यतेने लिहिलेय... नाहीतर बाचाबाची झाली असती.) Happy

मया, तुमच्याच पोस्टित तुमच्या अडचणीचे उत्तर आहे.
फक्त तुमच्या सिस्टीमवर बंद आहे पण बाकीच्या सिस्टिमवर फे.बु. चालु आहे. बरोबर?
अहो, मग सिस्टिम बदलुन घ्या ना. हाकानाका Proud Lol

facebook service बंद केली आहे <<< लै भारी

आय.पी द्वारे लॉगीन करता येईल असे ऐकण्यात आले आहे, जर तुमच्या सिस्टीम वर बाकिच्या साईट चालू होत असतील तर आणि त्या ऑफिस मधे तुम्हाला फेसबुक वापरण्यास परवानगी असेल तरच
अन्यथा न वापरणे योग्यच

सगळ्यांना धन्यवाद प्रतिसादाबद्दल, टिंगल उडवली त्यांना सुद्धा
पहिली गोष्ट हा त्रास सगळ्यांना होत असेल.
@ नात्या : माझ्याकडे १ सोडून २ फोन आहेत त्यात इंटरनेट सुद्धा आहे परंतु काम करताना mobile वापरताना दिसलं तर timepass करतोय हे समजेल ना रे.
@ सस्मित: वापरायला सुरवात करा मग समजेल.
@ मधुरा : तुमच्या सारखे कामगार सगळ्यांना मिळूदेत part time कामात थोडा विरंगुळा हवा.
@ mansmi18 : करा आमचीच थट्टा
बाकी सगळ्यांनी जे चांगले चांगले सल्ले दिले त्याबद्दल पुन्हा मनपुर्वक धन्यवाद (उदा. चिंतातुर जंतू,मी नाशिककर

काहीही ! कोणीतरी तुमच्या जातीवरुन तुमचा दुस्वास करायचा/ तुम्हाला त्रास द्यायचा म्हणुन तुमच्या मशीनवरुन फेसबुक बंद करतंय हे कैच्याकै वाटतंय्. असो.

माझ्याकडे १ सोडून २ फोन आहेत त्यात इंटरनेट सुद्धा आहे परंतु काम करताना mobile वापरताना दिसलं तर timepass करतोय हे समजेल ना रे. >> Uhoh मग सिस्टिमवर केलेला टाईमपास कळत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला? त्याचे तर लेखी पुरावे असतात सिस्टिममध्ये.

मया,

थट्टेबद्दल सॉरी. पण मला हे थोडेसे गमतीशीर वाटले..कि तुम्ही आधीच पार्ट टाईम काम करताय आणि त्यातही तुम्हाला विरंगुळा हवाय. असो..

एक उपाय आहे:.. तुमच्याकडे वायरलेस ब्रॉडबँडचा डाँगल आहे का? तो घेउन जात जा. तिथे गेल्यावर नेटची लॅन केबल काढुन टाकायची आणि डाँगल वापरायचा नेट कनेक्शन साठी. हे कोणालाही नकळत करणे शक्य आहे की नाही हे मला माहित नाही (ती तुमची जबाबदारी).डाँगलचे सॉफ्टवेअर तुमच्या मशिनवर इंस्टॉल करता येइल की नाही तेही तुम्हाला पहावे लागेल.

पण एक मित्रत्वाचा (फुकट) सल्ला: तुमच्या कंपनीच्या काँप्युटर मधे कुठलीही छेडछाड करणे, प्रॉक्सी बदलणे (किंवा मी वर जो उपाय सांगितला आहे तोही) अशा गोष्टी करु नका. कंपन्यांचे युसेज मॉनिटरींग प्रोग्रॅम असतात. की लॉगर्स असतात. तुम्ही कोणाशी काय बोलता आहात, कुठल्या साईट्स अ‍ॅक्सेस करत आहात, किती वेळ "टाईम पास" करत आहात याचा सगळा डेटा सहज मिळेल अशी ही सॉफ्टवेअर्स असतात. साधारणपणे तुम्ही थोडाफार वेळ इतर साईट्स वर घालवला तर कंपन्या एवढे मनावर घेत नाहीत पण जर तुमच्या युसेजचा पॅटर्न बनला की अमुक अमुक हा बराच वेळ अतिरिक्त घालवतो तर ते कारवाईचा बडगा दाखवु शकतात. जरा सांभाळुन.

मी नाशिककर, तुमची https ची लिन्क माझ्याकडे चालली. आश्चर्य आहे. कारण फेसबुक ब्यान आहे आमच्यातही!
धन्यवाद.

मनस्मी, अगदी बरोबर.
पण त्यामुळेच मी सरळ डाटावाल्या डिपार्टमेण्टलाच जाऊन भिडलो अन सान्गित्लए की मी या या साईटवर (म्हणजे मायबोलिवर) असतो. अन ती चालू राहिली. (नैतरची ऑप्शन त्यान्नाच सान्गितली होती, कीमला टीपीच करायचा तर हल्ली मोबाईल आहेत की, तुमचेच नेट कशाला हवे? अन मोबाईलला बन्दी नाहीये अजुनतरी आपल्यात!, मी सान्गुन सवरुन करतोय तर पटवून घ्या, नैपेक्षा मग.... ते पटले त्यान्ना Happy
अर्थात कम्पनी टू कम्पनी ही रिलेशन्स बदलती अस्तात, सबब तुमची सूचना रास्त आहे

@limbutimbu: अभिनंदन आणि धन्यवाद.

अनेक लुपहोल्स मुळे कुठलाही सिस्टीम अ‍ॅडमिन एखादी वेबसाईट पुर्णपणे ब्लॉक नाही करु शकत (जर तो मुरलेला सिस्टीम अ‍ॅडमिन नसेल तर ;))