रायगड किल्ल्याजवळ राहण्यासाठी फॅमीलीसाठी हॉटेल

Submitted by prafullashimpi on 6 February, 2013 - 23:20

रायगड किल्ल्याजवळ राहण्यासाठी फॅमीलीसाठी हॉटेल आहे का? आम्ही ह्या विकांताला सर्व कुटूंबिय जाण्याचा विचार करत आहोत पण हॉटेल बद्दल विशेष माहिती नाहीये, कृपया मा बो कर चांगले हॉटेल सुचवाल का? जेवणाची सुविधा (रात्रीचे) असेल तर उत्तम किंवा जवळपास असेल तरी चालेल

आगाऊ धन्यवाद

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मागच्याच वर्षी रायगडावर जाऊन आलो.
गडावर वेगळे हॉटेल + राहायची व्यवस्था आहे. ती महाग पडेल. तसेच जेवायचीही सोय आहेच. खाली गडावरील रोप-वे वर काम करणार्‍यांची घरे आहे. तेथे रहायची सोय होते.

रायगडच्या पायथ्याला पाचाडला देशमुखांचे हॉटेल आहे. राहण्याची आणि जेवणाची सोय आहे.

गडावर रोप वे शेजारी जोग यांच्या हॉटेलात राहण्याची आणि जेवणाची सोय आहे... पुढे MTDCचे रुम आहेत.

धन्यवाद मुक्तेश्वर, विनायक परांजपे, स्मितू, इंद्रधनुष्य,

देशमुखांचे किंवा जोग यांचा काही संपर्क नंबर आहे का?

९४२२७८७७७६ यां च्या कडे रहायची सोय आहे. मी नाव विसरलो. हा क्रमांक माझ्या मोबाईल मधे रायगड MTDC म्हणून सेव्ह होता Happy