बल्क इमेल पाठवण्यासाठी सर्विसेस

Submitted by सावली on 4 February, 2013 - 22:16

बल्क इमेल पाठवण्यासाठी चांगल्या आणि रिलाएबल सर्वीसची माहिती हवी आहे.

बल्क इमेल पाठवणारी कंपनी भारतीय आहे त्यामुळे भारतीय रुपयातले पॅकेज हवे.
बाऊन्स इमेल, इमेल ओपन लॉग, क्लिक्स लॉग इत्यादी सोयी हव्यात.

गुगलवर अनेक सर्विसेस मिळतात पण त्या कितपत भरवश्याच्या आहेत ते कळत नाही.
कोणी वापरत असलेली, कस्टमर सर्विस चांगली असलेली एखादी वेब्साईट सुचवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@सावली: बल्क ईमेल, म्हणजे नक्की काय पाठवणार आहात? न्युझलेटर्स अथवा नवीन प्रॉड्क्ट बद्द्ल माहीती ? भारतीय कंपनीची सर्विस तुम्ही शोधत आहात, पण ते सगळे USA based servers वापरणार आणि तुम्हाला ती सर्विस रिसेलर च्या नावाखाली देणार. त्यापेक्षा ओरिजिनल कंपनीची सर्विस वापरणे केव्हा ही सोयीस्कर आणि फायदेशीर.

http://www.gothamweb.com/ListserverHosting.html

मी नाशिककर , धन्यवाद.
पण युएस बेस्ड सर्विसचे रेट्स जास्त असतात. भारतात राहुन ते महाग वाटतात.
भारतीय सर्विसेस आहेत नेटवर साधारण हजार पासुन त्याची पॅकेजेस सुरु होतात. त्यातली कुणी वापरली असेल तर त्याबद्दल अनुभव नक्की सांगा.

@सावली: साधारणतः किती लोकाना ईमेल्स पाठवणार आहात? (Total number of subscribers)
या क्षेत्रात माझा भारतीय रीसेलर्स संदर्भात चांगला अनुभव नाही आहे, म्हणुन तुम्हाला सावध करतो आहे. तरी आपल्या स्वदेशी सर्विसेसचा जरा शोध घेवुन तुम्हाला कळवतो.

भारतीय रीसेलर्स संदर्भात चांगला अनुभव नाही आहे, >> ओह.
साधारण महिन्याला ५०००० असतील. ५००० एकावेळी असे साधारण दहाएक वेळा.

मला साधारण अशा काही सर्विसेस सापडल्या. यासुद्धा रिसेलर आहेत का?
http://www.octane.in/solutions/
http://emailpostman.com/ep/bulk-email-features.asp
http://www.easysoftindia.com/

भारतीय रीसेलर्स संदर्भात चांगला अनुभव नाही आहे....कारण
या लोकांकडे स्वतःचे तंत्रज्ञ (Technical Engineers) नसतात, त्यामुळे ते कुठलाही टेक्नीकल प्रॉब्लेम आला की तो मुख्य कंपनीला फॉरवड करतात, आणि त्याच्यात वेळेचा फार अपव्यय होतो. जरी त्यांच्याकडे स्वतःचे तंत्रज्ञ असले तरी बर्याचदा त्यांना टेक्नीकल प्रॉब्लेम्स फॉरवड करावे लागतात आणि पुन्हा वेळेचा अपव्यय होतो...असो.

तुम्ही दिलेल्या लिंक्स मध्ये मला http://www.easysoftindia.com/ जरा किफायतशीर वाटतो आहे, कारण त्यांनी डिटेल्ड माहिती दिली आहे. एक गोष्ट तुम्हाला विचारायची राहुन गेली...ईमेल्स पाठवण्यासाठी तुम्ही कुठला ईमेल आयडी वापरणार आहात...कारण बल्क ईमेल्स पाठवण्यासाठी SMTP मोलाची भुमिका बजावत असतो. जर तुम्ही स्वतःचा ईमेल आयडी (yourname@yourdomainname.com) वापरणार असाल, तर तुमचा मेल सर्वर, SMTP सर्वर बल्क ईमेल्स सपोर्ट करतो की नाही ते पण चेक करावं लागेल.
easysoftindia ने त्यांचा SMTP सर्वर वापरण्याची मुभा दिली आहे, पण त्याचे शुल्क कुठे सांगितलेले नाही Happy

तुम्हि मला योगेश.सोनार्८४@गमैल.कोम वर सम्पर्क करा, मी सध्या नविन कम्पनी चालू केली आहे, मे बी मी तुमहाला मदत करू शकतो.

सावली उशीरा वाचलं... +91-22-400 445 85/86 या नंबरवर चौकशी करा... डायरेक्टर चंदन बागवे ccomsys.net
ही वेब डेव्हलपिंग, होस्टींग, मेल सर्विस, मास मेल्स्/बल्क मेल्स पुरविणारी लिडींग कंपनी आहे.