मला काही पीसीबी फॅब्रिकेट करून घ्यायचे आहेत. (Printed Circuit Boards) ते मायक्रोवेव फ्रिक्वेन्सी रेंजमधे वापरायचे आहेत. सर्किट डिझाईन आणि सिम्युलेशन मी करणार, आर्ट वर्क कदाचित आऊटसोर्स करावं लागेल. मायक्रोवेव ट्रान्समिशन लाईन्स आणि कदाचित मायक्रोवेव अँटेना सुद्धा करून घेऊ, नक्की माहिती नाही. तर या बाबतीत सल्ल हवा आहे. पुण्यात कोणाकडे या प्रकारचे पीसीबी करून मिळतात? एका मॅडमचा पत्ता आहे, आणि त्यांना काही पीसीबी दिलेही आहेत करायला. पण त्या सिंगल लेअर करतात. मला डबल लेअर करायचा आहे. शोगिनीबद्दल वेबसाईटवर माहिती मिळाली आहे, अजून काही माहिती असेल तर प्लीज सांगा.
साधारण स्पेसिफिकेशन्स :-
FR 4 material substrate (काही सर्किट्सना FR 4 पेक्षा वेगळं हवं आहे)
relative permittivitty apprx 2 to4
freq range 4 to 10 GHz
track length from 0.1 mm to 1 cm (may vary)
single or double layer PCB
सिंहगडरोडला एक व्हीसीबी
सिंहगडरोडला एक व्हीसीबी म्हणून आहे.... आम्ही काही पीसीबी करुन घेतले होते तिथुन.
अजुन एक पीसीबीपॉवर म्हणून आहे....त्यांना गर्बर मेल करायच्या आणि ते पीसीबी घरपोच देतात!
स्वरूप, मला दोन्हीचे पत्ते/
स्वरूप, मला दोन्हीचे पत्ते/ फोन नं देऊ शकाल का?
तुम्ही कोणत्या प्रकारचे बोर्ड्स करून घेतले होते आणि खर्च साधारण किती आला होता?
मुंबईला लॅमिंग्टन रोडला
मुंबईला लॅमिंग्टन रोडला वेगाकिट नावाचं दुकान आहे. तिथे हवे तसे पीसीबी तयार करून मिळतात. या रस्त्यावर तशी अनेक दुकानं आहेत. पुण्याची मला माहिती नाही.
धन्यवाद चिनूक्स. मला आत्ता
धन्यवाद चिनूक्स.
मला आत्ता लगेच लागेल असं नाही, अजून तरी नवीन असाईनमेंट मिळाली नाहिये. जी आहे ती तयार होण्याच्या मार्गावर आहे, पण नवीन जे काम असेल ते साधं नसेल. शिवाय पुढच्या वर्षात मोठा प्रोजेक्ट असेलच. आम्ही सगळेच शोधतोय. मुंबईत असेल तर सगळ्यांना एकत्रितपणे करता येईल. तसाही पर्याय आहेच. पण इथल्याइथे होत असेल तर अगोदर बघायचंय.
पुण्यात कदाचित दगडूशेठ हलवाई
पुण्यात कदाचित दगडूशेठ हलवाई गणपतीच्या जवळ असलेल्या इलेक्ट्रीक / इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमधे काही माहिती मिळू शकेल.
लामिंग्ट्न रोडचा अजून
लामिंग्ट्न रोडचा अजून एक
http://www.vishaworld.com/contact-us.asp
आमचे पीसीबी इथेच द्यायचो. चांगला अनुभव आहे.
मुंबईमध्ये Yashna Circuits
मुंबईमध्ये Yashna Circuits म्हणून आहे. आयआयटी पवईच्या माझ्या Labचे आणि अन्य बऱ्याच Labsचे पीसीबी ह्या Manufacturerकडून करून घेतले जातात. अतिशय चांगला परफॉर्मन्स आहे. मल्टीलेयर पीसीबी पण फॅब्रिकेट करून मिळतील तिथे.
वेबसाईट: http://www.yashnacircuits.com/
शोगिनी = सर्वोत्तम
शोगिनी = सर्वोत्तम
वेगाकीट चानगले PCB तयार करुन
वेगाकीट चानगले PCB तयार करुन देते
पुण्यामधे बरेच आहेत पण जर हाय
पुण्यामधे बरेच आहेत पण जर हाय फ्रिक्वेंसी चा हवा असेल तर शोगिनी शिवाय अन्य कुठेही जाऊ नका. स्वानुभवावरुन सांगतोय. त्यांची क्वालिटी खुप चांगली असते आणि स्पेसिफिकेशन्स प्रमाणे च तयार होतात बोर्ड्स. फक्त वेळ जास्त लावतात. साधारण ४ ते ६ आठवडे....
त्याही पेक्षा बेंगलोर ला एक खुप चांगली कंपनी आहे, (नाव विसरलोय - मला वाटते Hi-Q).. हे आणखी उच्च दर्जाचे आहेत, अर्थात charges जवळपास दुप्पट पडतात.
General PCBs हवे असतील तर गुजरात मधे PCB power आहे. त्यांची on-line ordering system आहे. Gerber Files submit करायच्या. Payment on delivery or online advance.
आणखी माहिती देउ शकेन संपर्कातून.....
सगळ्यांचे आभार. खूप उपयोगी
सगळ्यांचे आभार. खूप उपयोगी माहिती मिळाली.
योगी, संपर्कातून इमेल करणार का प्लीज?