गॅस ओव्हन असला काही प्रकार आहे का?

Submitted by टकाटक on 17 January, 2013 - 00:31

गॅस ओव्हन असला काही प्रकार आहे का? नानखटाई मोठ्या प्रमाणात बनवण्यासाठी मा.वे. महागात पडतो. त्यासाठी गॅस किंवा शेगडीला उपयुक्त असे कुठले उपकरण आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेकरी ओव्हन कुठे मिळु शकतो ? साधारण काय कींमत असु शकते. बहीण खुप छान नानखटाई बनवते. तिला छोटासा व्यवसाय सुरु करायचा विचार आहे. शेजा-यांना पण बहीणीने बनवलेली नानखटाई खुप आवडते त्यांनीही विकत घेण्याची तयारी दर्शवली आहे. पण मा.वे. मध्ये बनवणे परवडण्यासारखे नाही.

टकाटक, जवळपासच्या बेकरीमधून नानकटाई भाजून आणता येइल का त्याची चौकशी करा. ते जास्त उपयोगी पडेल. हळूहळू विक्री सुरू झाली की मग बेकरी ओव्हन बसवून घेता येइल. आयटीआय मधे बेकरी प्रॉडक्ट्सचे कोर्सेस असतात तिथेदेखील चौकशी करून जास्त माहिती घेता येइल.

जवळपासच्या बेकरीमधून नानकटाई भाजून आणता येइल का त्याची चौकशी करा. ते जास्त उपयोगी पडेल>> +१
पर ट्रे चार्जेस असतात Happy

.