लहान मुल आणि घराबाबतचे नियम (न्यू जर्सी)

Submitted by अंजली_१२ on 15 January, 2013 - 16:21

मला एक माहिती हवी आहे.
माझी मैत्रीण नुकतीच भारतातून इकडे जर्सी सिटीमधे राहायला आली. तिचे १ बेडरूम चे घर आहे आणि तिला ६ महिन्याचे बाळ आहे. प्रॉब्लेम असा आहे की तिच्या खालच्या मजल्यावर जी बाई राहते तिला अज्जिबात पायांचा वगैरे आवाज सहन होत नाही. आता हे दोघंच असतात त्यात नवरा दिवसभर बाहेर, ते बाळ आणि मैत्रिण किती आवाज करणार? पण त्या बाईचा त्रास देणं वाढतंय. काल तिने भांडण करून पोलिसांना बोलवण्याची धमकी दिली आहे. आता मैत्रिण अशा चिंतेत आहे की जर पोलिस आले तर आवाजाचं भांडण तर ती निपटून नेईल पण जर लहान बाळ आणि १ बेडरूम असं नवीन काही टुमणं निघालं तर?

जनरली इथे असा काही कायदा कोणाला माहित आहे का की १-२ मुलं घरात असतील तर किती बेडरूम चे घर असावे? पालकांसोबत बेड शेअरिंगबद्दलही कोणाला काही माहित आहे का? आणि माझी पण मालकीण आता मागे लागलीये की तुला २ मुले आहेत तर तू १ बेडरूममधे आता राहू शकत नाही. असं काही खरंच आहे का अमेरिकेत? स्टेटवाईज रूल बदलतात का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहान मूल/मुलं अपार्टमेंटात असल्यास काही नियम आहेत.

हा न्यूजर्सी रिअल इस्टेट अटर्नी ब्लॉग बघा. कदाचित तुम्हाला हवी ती माहिती मिळेल. (मुलांबरोबर राहण्याबद्दल माहिती दिलेली आहे)

स्टेटवाईज रूल बदलतात का? बदलतो.. मिनेसोटामध्ये वन बेडरुमध्ये दोन माणसे आणि दोन बेडरुममध्ये तीन माणसे रेन्ट्ल अपार्टमेंटात चालत होती... मेल्स फ्कत ज्यांची अपार्टमेंटावर नावे आहेत त्यांनाच मिळत होती..

सेन्ट्र्ल न्यूजर्सीत वन बेडरुमध्ये तीन माणसे आणि दोन बेडरुमध्ये चार माणसे रेन्ट्ल अपार्टमेंटात चालतात.. मुल तीन वर्षाचे झाल्यावर रेन्ट्ल अपार्टमेंटवाले फॅमिलीवाल्याला दोन बेडरुममध्ये मूव्ह कराला सांगतात.. फॅमिली आणि २ मुले दोन बेडरुमशिवाय देतच नाही...

अंजली, वर मृण्मयीने दिली ती लिंक वाच. त्यात स्क्वेअर फूटाचा उल्लेख आहे. तुझं अपार्टमेंट किती स्क्वेअर फूट आहे हे तू वर लिहिलेलं नाहीस त्यामुळे आयडिया नाही. खूप लहान असल्यास लँडलॉर्ड मूव्ह करायला सांगत असेल तर योग्य आहे.

स्टेटवाईज रूल बदलतात का?
>> हो. आणि त्याशिवाय प्रत्येक हाऊसिंग कॉम्पलेक्सचे वेगळे अ‍ॅडिशनल रुल असु शकतात.
बर्‍याच ठिकाणी १ लहान मुल (०-५ वर्षे) = १ बेडरुम, १ मुल (५+ वय) = २ रुम्स, २ मुले = २ रुम्स हा स्टँडर्ड नियम आहे.
विद्यार्थ्यांसाठी असलेल्या हाउसिंगचे पण वेगळे नियम असतात. घरात पेट ठेवण्याबाबत पण वेगळे नियम असु शकतात.

हायला! ह्यासाठी पण नियम असतात. पहिल्यांदाच ऐकलं. का पण? कोणाला आर्थिक दृष्ट्या शक्य नसेल तर?

बापरे, अशी मुलं आणि बेडरूम्सची कोष्टकं असतात याची कल्पना नव्हती. असले नियम करणार्‍यांना धारावीत नेऊन एका खोलीच्या घरात किती लोकं राहतात ते दाखवले तर तिथूनच त्यांना चार माणसांनी उचलून नेण्याची वेळ येईल. असो.

पण हे नियम पाळले जात आहेत का ते कोण पाहतं?

First thing talk to the landlord about it and clear it as being a 6 month old baby how much Noise can be done. Explain the situation to them.
I think till baby is 15 months old you can stay in one bedroom as I had to move to 2 bedroom once my child turned 15 months in Connecticut, but again the rules changes from apartment to apartmanet so better talk to your leasing office people.

सायो ,ओके. पण हा नियम करण्यामागे काय कारण, काय logic हे मला जाणून घ्यायचं आहे.
पूर्वीपासून आहे का हे?
भारतात असा काही नियम केला तर केव्हढा हाहाकार माजेल..!!

(पाश्चात्य देशात) अवघड आहे!>>>> +१

खरच रे बाबा!!! कठीण आहे. येवढे नियम ठेवले तर आपलं कठीण आहे....

भारतियांना हे फारच जाचक ठरत असणार... आमची लेक तर कधी कधी लाडात अजुन आमच्या बरोबर झोपते. ( वय ११) ... कधी कधी आजी आजोबां बरोबर.

मुलांनी लौकर स्वतंत्र व्हावं, स्वावलंबी व्हावं हे सगळं जरी असलं तरीही हे घरात वावरायचे नियम, आवाजाचे नियम फारच जाचक वाटतात. मुख्यत्वे जिथे लहान मुले आहेत.

गड्या आपला गाव बरा !!!!

लगेच तुलनेच्या उड्या मारू नका रे.

आपण अजून विकसनशील देशात मोडतो. मूल जन्माला घालायचे तर मुलासाठी स्वतंत्र बेडरूम हवी हे करायला अनेकदा मुलाला जन्म देणार्‍या आईबापांनाही स्वतंत्र बेडरूम नसते. रात्री झोपण्यापुरती आडोश्याची, बंद जागा करून दिलेली असते.

तसेच भारतीय घराची पारंपारीक व्यवस्था बघितली तर बेडरूम हा प्रकार आपण गेल्या काही वर्षांमधे उचललेला आहे. तत्पूर्वी अगदी सधन घरांमधे देखील घरातल्या कर्त्या पुरूषांच्या वेगळ्या खोल्या असत जिथे अभ्यास, लिखाण, भेटायला येणारे लोक आणि झोपायची व्यवस्था असे. बायका व मुले माजघरात झोपत. (हाच प्रकार चांगला होता असे माझे म्हणणे नाही. प्लीज नोट!)

लगेच तुलनेच्या उड्या मारू नका रे.>>>>

नाही मारत हो... मी फक्त मला जमणार नाही हे लिहिले... अशा जाचात राहुन आपल्याला जमणार नाही...

माझे वैयक्तिक मत दिले.....

जर भारतातले एकूण राहणीमान त्या पातळीला उंचावले तर भारतातही काही प्रमाणात असे नियम येतीलच. मला वैयक्तिकरित्या हे असे नियम योग्य वाटतात.

मूल जागे होईल म्हणून नक्की किती वर्ष आईवडिलांनी आपल्या एकतर इच्छा मारायच्या किंवा मग चोरट्यासारखे, घाईघाईने उरकायचे किंवा मग मूल अचानक जागे झाले आणि त्याने नको ते पहायचे?

वन रूम किचनमधे आठ आठ जण रहातात ते नाईलाज म्हणूनच रहातात. कौतुकाने नाही.

एकतर इच्छा मारायच्या किंवा मग चोरट्यासारखे, घाईघाईने उरकायचे किंवा मग मूल अचानक जागे झाले आणि त्याने नको ते पहायचे? >>>>:)

मूल जागे होईल म्हणून नक्की किती वर्ष आईवडिलांनी आपल्या एकतर इच्छा मारायच्या किंवा मग चोरट्यासारखे, घाईघाईने उरकायचे किंवा मग मूल अचानक जागे झाले आणि त्याने नको ते पहायचे?>>>

नी .. अनुमोदन

पण सगळ्यांना वेगळ्या बेडरुम असुनही, ज्याला हवं तसं त्याने रहाण्याचा अधिकार हवा.... कायदा कशाला... नियम म्हंटला की जाच आलाच....

पण सगळ्यांना वेगळ्या बेडरुम असुनही, ज्याला हवं तसं त्याने रहाण्याचा अधिकार हवा <<
मला नाही वाटत मूल रोज आईच्या जवळ झोपते की वेगळ्या बेडरूममधे हे चेक केले जात असेल.
व्यवस्था, सोय असायला हवी हा नियम आहे बहुतेक.

इथे नियम आहेत( अमेरीकेत) पण सगळेच पाळत नाहित( ते चुकीच आहे).
आअम्चे एक शेजारी दोन मुले व एक बेडरूम असे होते जिथे आम्ही पुर्वी रहात होतो.
आयटी मधे असणारे दोन दोन जोडपी घेवून पण रहात गपचूप....
नुकतेच आले होते, नोकरीच्या शोधात होते. आम्हालाच कमाल वाटायची की कसे काय रहातात/करतात.. त्यात एकीला नंतर मूल सुद्धा होणार होते. Sad

मग वाटते शेवटी कोणीतरी तक्रार केली का काय माहित नाही.. एक जोडपे निघाले तिथून.

नी, प्रचंड अनुमोदन.
तुमच्या घरात मुलं तुमच्याजवळ झोपतात की वेगळी हे बघायला कुणी येत नाही. मुलांचे पेडी चेकपला गेलं की विचारतात आणि मुलांनी वेगळं झोपणं चांगलं हे सुचवतात पण सगळंच आपण ऐकायला हवं असं अजिबातच नाही. असं मला वाटतं.

प्रतिसादाकरता धन्यवाद सर्वांना. लिंक बघितली त्या मैत्रिणीला पण पाठवली आहे.

भारतियांना हे फारच जाचक ठरत असणार... आमची लेक तर कधी कधी लाडात अजुन आमच्या बरोबर झोपते. ( वय ११) ... कधी कधी आजी आजोबां बरोबर.>>>> हो आमची मुले पण आमच्याजवळच झोपतात अजून.
सवय लागली तर चांगलंच आहे वेगळं झोपण्याची.
पण इथे होतं काय भारतीयांची तरी भाड्याची घरं एवढी मोठी नसतात (जर्सी सिटीमध्ये तरी... हे अगदी पुणे-मुंबईसारखं आहे) भयंकर महाग भाडे आणी जागा त्यामानाने खूप कमी त्यामुळे सेपरेट बेडरूम इथे तरी परवडत नाही आणि त्यातून आपल्यालाच काही सवयी नसतात, मुलांना एकटं ठेवून झोपणं इ. इ.

पण इथे एक एक किस्से ऐकायला मिळतात म्हणून विचारलं.
एक किस्सा असा की मुलाचा पासपोर्ट काढताना व्हेरिफिकेशन साठी एक पोलिस ऑफिसर घरी आला आणि मुलाची बेडरूम वगैरे कुठे आहे चेक करत होता, रूम डेकोरेट का नाही केली वगैरे प्रश्न विचारत होता म्हणे...खखोदेजा...

एकीचे आई बाबा येणार होते भारतातून ३ महिन्यासाठी तरी ओनर ने १ बेडरूम मधे राहू दिले नाही. वेगळे घर शोधावे लागले मैत्रीणिला.

आता आम्हीपण लवकरच २ बेडरूम घराच्या शोधात आहोत.

मला नाही वाटत मूल रोज आईच्या जवळ झोपते की वेगळ्या बेडरूममधे हे चेक केले जात असेल.
व्यवस्था, सोय असायला हवी हा नियम आहे बहुतेक.>>>> अनुमोदन.

आयटी मधे असणारे दोन दोन जोडपी घेवून पण रहात गपचूप....>>> काय वाट्टेल ते करतात बाबा काही लोकं.... अगदी इंटरनेट ही शेअर करणारे पाहिले आहेत.

आम्हाला मुलाच्या शाळेत सांगितले होते, वेगळ्या बेडरुमचे कारण- झोपल्यानंतर चुकून मुलाच्या अंगावर पाय/ हात पडू नये म्हणून...

हो तेच कारण आहे मेन आणि कधीकधी आई-वडील जर ड्रिंक्स वगैरे घेत असतील तर मुलांना त्या वासाचा त्रास होऊ नये वगैरे वगैरे पण कारणे आहेत.

बरेचसे नियम हे मु़ख्यतः सूरक्षेच्या दृष्टीकोनातून आणि सगळ्यांच्या सोयीसाठी बनवले जातात. लहान मुलांच्या जीविताची सुरक्षा हा पहिला मुद्दा आहे. त्यांना त्यांची स्वतःची खोली असणं ही त्यांची सोय आहे. वापरावीच असा नियम नाही / नसावा.

पासपोर्ट च्या पडताळणी साठी पोलीस घरी येणं अमेरिकेत (काही राज्यांमधे) चालतं का? आम्हाला दोन्ही वेळा हा अनुभव नाही आला म्हणून विचारतोय.

"वन रूम किचनमधे आठ आठ जण रहातात ते नाईलाज म्हणूनच रहातात. कौतुकाने नाही." - अगदी खरंय.

बरेचसे नियम हे मु़ख्यतः सूरक्षेच्या दृष्टीकोनातून आणि सगळ्यांच्या सोयीसाठी बनवले जातात. लहान मुलांच्या जीविताची सुरक्षा हा पहिला मुद्दा आहे. त्यांना त्यांची स्वतःची खोली असणं ही त्यांची सोय आहे. वापरावीच असा नियम नाही / नसावा.>>>>> हो ना पण नेमका जो कोणी यात सापडेल त्याला फटका......

आम्ही बर्याच वर्षांपुर्वी फिली एरियात होतो तेव्हा माझ्या ६ महिन्याच्या मुलीला घेउन १ बेडरूममधेच होतो. घर घेण्याआधी खात्री केली होती. माझ्या खाली राहणार्या एका चायनीज जोडप्याने एकदा वर येवुन मला प्रत्यक्ष विचारले आणी कुरकुर केली तेव्हा सरळ अपार्ट्मेंट ओफिसतर्फे त्याला नोटीस पाठवलेली. तुम्ही तुमच्या अपार्ट्मेंट्मधे चौकशी करा. नियमात असेल तर कोणाला घाबरायची गरज नाही.

<<<< एकीचे आई बाबा येणार होते भारतातून ३ महिन्यासाठी तरी ओनर ने १ बेडरूम मधे राहू दिले नाही. वेगळे घर शोधावे लागले मैत्रीणिला.

इथे जर्मनीत जर तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल आणि आईवडिलांना स्वतःकडे बोलावत असाल तर घरमालकाची परमिशन घ्यावी लागत असे( २ वर्षांपूर्वीपर्यंत). तसंच ईन्विटेशन देताना फॉरेनर्स ऑफिसात सुद्धा तुमच्या घराचा एरिया विचारला जातो. २ वर्षांपूर्वीपर्यंत माणशी १२ स्क्वेअर मीटर एरिया घरात असणं आवश्यक होतं. उदा. जर घराचा एरिया ६० स्क्वेअर मीटर असेल आणि तुम्ही ३ माणसे घरात राहात असाल तर तुम्ही अजून २ च माणसांना बोलावू शकता.
येणार्या गेस्टचा खर्च तुम्ही करणार असल्याचे गृहित धरले जाते. तुमच्यावर अवलंबून घरातील माणसे+ गेस्ट ह्या सर्वांचा खर्च तुम्ही करू शकता की नाही हे कॅल्क्युलेट करण्यासाठी पगाराची लिमिट सुद्धा सेट केलेली आहे. पगार तेव्हढा नसेल तर मग ईन्विटेशनच देता येत नाही.

मी ही लँडलॉर्ड आहे आणि माझं १ बेडरुम अपार्टमेंट रेंटवर आहे. जर भारतातून आमच्या टेनंटचे आईवडील वगैरे येणार असतील तर ते आमची परवानगी घेऊनच मग बोलावतात. ती द्यायची की नाही हे आमच्या हातात आहे.

पासपोर्ट च्या पडताळणी साठी पोलीस घरी येणं अमेरिकेत (काही राज्यांमधे) चालतं का? आम्हाला दोन्ही वेळा हा अनुभव नाही आला म्हणून विचारतोय. >>> मलाही जाणून घ्यायचे आहे, कारण मलाही हा अनुभव आला नाही.

अंजली, तु मुलांची वय नाही लिहिली पण जर २ मुले असतील तर २ बेडरूम घर कोठ्ल्याही राज्यात लागेल.

डोक्यावर टांगती तलवार ठेवण्यापेक्षा सरळ २-३ बेडरुमचं घर घेण कधीही सेफ आहे.>>> १००% सहमत. मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे नियम बनवलेत. इथे चाईल्ड केअर सर्व्हीसेस वाले कधीही कोणाच्या तक्रारीवर (त्या तक्रारीत जर मुलांच्या सुरक्षिततेबाबत किंवा पालकांच्या मुलांबाबत निष्काळजी बद्द्ल काही असेल तर) तुमच्याकडे चौकशीला येउ शकतात. पण जर आपण नियमात बसत असु तर ते केव्हाही सुरक्षित.

पासपोर्ट च्या पडताळणी साठी पोलीस घरी येणं अमेरिकेत (काही राज्यांमधे) चालतं का?>>> मला ही हे नव्यानेच कळलंय.

सुप्रिता, माझी मुलं ८ महिने आणि ५ वर्ष अशी आहेत. आम्ही जसं बाळाचा जन्म झाला तसं घर बदलायचं म्हणत होतो पण सासू सासरे आले मग त्यांना हाच एरिआराहिलं, मग आमची भारतवारी त्यामुळे घराचं राहिलं ते राहिलं.

डोक्यावर टांगती तलवार ठेवण्यापेक्षा सरळ २-३ बेडरुमचं घर घेण कधीही सेफ आहे.>>> हे खरं आहे आणि तेवढंच सामानही खोल्यांमधे विभागलं जातं.

http://www.newjerseyrealestateattorneyblog.com/2010/08/new-jersey-housin...

The Division of Youth and Family Services has also promulgated regulations concerning children. Generally, children of opposite sex cannot share a bedroom with each other or an adult. Therefore, families with children will very often need to rent apartments with more bedrooms, even in cases when a single bedroom would have been large enough to accommodate the size of the family.

अर्थः
नवरा बायको १ बेडरूम.
नवरा बायको + १ मुल = २ बेडरूम
नवरा बायको + १ मुलगा + १ मुलगी = ३ बेडरूम
नवरा बायको + २ मुलगे/मुली = २ बेडरूम चालेल..
.
.
कारण सांगायला नकोच. मुलं लहान तिसरी चौथीत असेपर्यंत फारसा फरक पडत नाही. पण त्यानंतर..

http://www.ehow.com/list_6520256_laws-children-sharing-room.html

लग्नानंतर आम्ही दोघे विद्यार्थी होतो तेव्हा विद्यापीठाच्या कॅम्पसमधे लग्न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वस्तातलं हाउसिंग होतं. तिथले एकेक रोचक आणि भयंकर किस्से (बहुतांश भारतीय आणि चायनीझ विद्यार्थ्यांचे) सांगावेत काय इथे?? <विचारात पडलेली बाहुली>

लीझ/सबलीझ कारभार आणि नियमांतील पळवाटा या सार्‍यातून इल्लिगली राहणारे अनेकजण पाहिले आहेत. वाईट वाटते की जास्त उदा या दोन प्रकारचीच होती. Sad