मायक्रोवेव्ह ओव्हन वापरणे सुरक्षीत आहे काय?

Submitted by पाषाणभेद on 11 January, 2013 - 22:55

मायक्रोवेव्ह ओव्हन वापरणे सुरक्षीत आहे काय?

{{सदरची पोस्ट मी चर्चा होण्यासाठी 'सार्वजनीक' धाग्यात टाकतो आहे. मला ती आहार, आरोग्यम स्वयंपाकाची भांडी, तंत्र आदींपैकी नक्की कोठे टाकावी हा निर्णय घेता आला नाही.
अ‍ॅडमीनांना यात काही तथ्य वाटत नसल्यास त्यांनी ही पोस्ट 'मायक्रोवेव्हबद्दल सर्वकाही' येथे हलवली किंवा ही पोस्ट डिलीट केली तरी माझी काही हरकत नाही.}}

कालच्याच मधुरिमामध्ये डॉ. संगिता यांचा लेख वाचला.
त्या लेखामध्ये फारच धक्कादायक विधाने केलेली आहेत. जसे:

"स्वयंपाकावर विपरीत परिणाम करणारी महत्त्वाची दोन उपकरणे म्हणजे मायक्रोवेव्ह ओव्हन व रेफ्रिजरेटर"

"आहारशास्त्रानुसार तयार झालेले अन्न वारंवार गरम करणे किंवा ते अतिशीत करून पुन्हा गरम करणे अत्यंत चुकीचे आहे. काही गृहिणी मायक्रोवेव्हचा वापर अन्न पुन्हा पुन्हा गरम करण्यासाठी करतात. त्यामुळे अन्नातील सकस/पोषक घटक द्रव्ये विघटित होतात."

"याशिवाय न मोजता येण्यासारखे असंख्य व अनावश्यक बदलही होत असतात. यामध्ये पेशींची रचना बदलणे, पेशीतील जनुकांची क्रिया बदलणे, अणुरेणू व घटकांची रचना बदलून त्यांचे गुणधर्म बदलतात."

" त्यांच्याकडील संशोधनात असे निदर्शनास आले की मायक्रोवेव्हमध्ये वारंवार अन्न गरम केल्यास ते कर्करोगाला कारण होऊ शकते."

"मायक्रोवेव्हमध्ये दूध गरम केल्यास त्यातील प्रथिनांची संख्या बदलून कर्करोग निर्माण करणारे पदार्थ तयार होतात. मायक्रोवेव्हमध्ये चिकन अथवा मटण यांसारखे मांसाहारी पदार्थ शिजवल्यास डी-नायट्रोसोडिएथानोलामाइन्स तयार होतात. परिणामी असा आहार सातत्याने सेवन केल्यास वरील पोषकतत्त्वांची न्यूनता शरीरात दिसून येते. अशा आहाराच्या सातत्याच्या सेवनाने रक्ताल्पता, पांढ- पेशींची कमतरता, प्रतिकारशक्तीमधील बदल व रक्तातील चरबी वाढणे हे दुष्परिणाम दिसून येतात. "

"काही शास्त्रज्ञांच्या मते मायक्रोवेव्ह ओव्हन कितीही कमी विद्युत चुंबकीय लहरीचा असला तरीही आहारातील अणुरेणू वा घटक वा पेशी टिकाव धरू शकत नाहीत व पदार्थात विपरीत बदल घडून येतात."

"मायक्रोवेव्हचा वापर करावयाचा झाल्यास पापड भाजणे, शेंगदाणे भाजणे, पीठ वा रवा भाजणे अशा गोष्टींसाठी करता येऊ शकतो. मात्र अन्न शिजवण्यासाठी त्याचा वापर करणे टाळणे हे महत्त्वाचेच."

क्रमश:
sangitadesh@rediffmail.com
-------------------------------

वरील विधाने फारच धक्कादायक आहेत. मी माओचा वापर स्वयंपाकघरात करण्याचा पुरस्कर्ता आहे. वरील लेख वाचून मला माओचा वापर करण्याबद्दल खरोखर काळजी वाटू लागली आहे. तरीही लेखीकेने वरील विधाने करतांना काहीही सायंटीफीक संदर्भ दिलेला नाही. मी त्यांना त्याबद्दल इमेल पाठवलेली आहेच पण उत्तराची खात्री नाही किंवा त्या जे काही संदर्भ देतील ते एकांगी असू शकतात. स्वतः लेखीकेने या लेखात आयुर्वेदाचा दोन वेळा उल्लेख केलेला आहे.

"आयुर्वेदानेसुद्धा पदार्थ तयार झाल्यावर वारंवार गरम करण्यास विरोध केला आहे."
"आयुर्वेदाने आहारावरील संस्कारांना खूप महत्त्व दिले आहे."

यावरून लेखीका या आयुर्वेदाची प्रॅक्टीस करत आहे असे दिसून येते. (कोणती पॅथी श्रेष्ठ हा वाद नको.) पण हा सगळा लेख एकांगी, वरवरचा वाटतो.
लेखातील विधानांच्याविरूद्ध काही निष्कर्ष देण्यार्‍या लिंक येथे आहेतः
http://skeptoid.com/episodes/4080
http://www.thedailygreen.com/environmental-news/latest/microwave-radiati...

येथील संशोधक मंडळी किंवा आधुनिक विचारांची मंडळी काय म्हणते?
==========================
ताजा कलम: आताच माझे इमेल अकाउंट तपासले असता मी वरील लेख लिहीलेल्या डॉ. संगिता यांना जो इमेल पाठवला होता तो बाउंस झालेला आहे. त्यांनी दिलेला sangitadesh@rediffmail.com हा इमेल आयडी चुकीचा आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेगवेगळी जिवनसत्वे वेगवेगळ्या प्रकाराने बाद होउ शकतात त्यामुळे मायक्रोवेव्ह वर सरसकट विधान करणे अवघड आहे पण अन्न वारंवार गरम करणे किंवा ते अतिशीत करून पुन्हा गरम करणे ह्यामुळे पोषणमुल्ये कमी होतात हा निष्कर्श आहे. गूगल करा. - मायक्रोवेव्ह किंवा विस्तव दोन्ही यासाठी सारखेच.

For other conclusions - I know arguments from both sides but don't have enough knowlege to have an judgmental opinion. I use microwave but not regulalry.

मायक्रोवेव्हमध्ये दूध गरम केल्यास त्यातील प्रथिनांची संख्या बदलून कर्करोग निर्माण करणारे पदार्थ तयार होतात>>> हे मीहि एकले आहे.

इकडे मायक्रोवेव्ह रोजच्या वापरात वापरणं अतिशय कॉमन आहे. पूर्ण वापर टाळता/बंद करता येईल असं वाटत नाही. माझ्याकडून तरी ही काळजी घेते. सहसा उरलेल्या भाज्या वगैरे गरम करण्याकरताच आम्ही मावे वापरतो तेव्हा भाज्या कायम सिरॅमिक्/मायक्रोवेव्हेबल बोलमध्ये काढून, वरुन प्लॅस्टिक रॅप लावून मगच गरम करणे. झिपलॉक वगैरेचे चीप प्लॅस्टिक कंटेनर्स मावेत चालत असले तरीही अजिबात वापरु नयेत.
बाकी जेवण कधीच मावेत करत नाही. ते मात्र गॅसवरच.