काय कराय्ला पहिजे

Submitted by प्रति on 5 January, 2013 - 03:58

majhya lagnala 7 mahine jhalit... aamchi joint family aahe.... ghari aamhi dogh, sasu, sasre , aani dir... 3 room ch rent ch ghar aahe aamch.... mi job karte...

majh lagna matrimonial through jhal...

majhya sasrche lok ghavatle aahe t.. tyanche vichar pan tasech aahet... tanchya mate sun mahnje fakat kam karnari machine.... tini nuste kam karav ... job karat asel ter pagar sasuchya hatat dyava... lagna adhi aamhi dogh jevha bolaycho... tevha navryache vichar mala tase vatle navte ... pan aata to pan sasuch aaikto... majhya gharat fakat sasu ch chalt... mala 2 nanda aahet... tya pan tashyach ahet... nehmi mala tech aiikavtat ki amhi kase divas kadle... aamhi kiti kast kele... vagere....

3 room chya gharat amahala kaslich privacy nahi... room change karaychi mahntla ter parvadt nahi... gharche sarve drink kartat sasra sodun... dir roj piyun yeto... aata aata job karay lagala ... navryach pan madhe madhe suruch ast.... jar kahi program asl kiva nanda ghari aalya ki ... tyanche navre aamchya ghari basun daru pitata... m tyanchi babad shivya den suru hot.... mi ya badal navraya bole.. ter to mahnto ki.. majya javayana kahi mahnaych nahi.. tyana jas vatel tas te vagtil... mi mahntl ki mala he ghari daru pin avadt nahi aani tas hi aapl ghar itak moth nahi... pan to kahi aaikayla tyar nahi... mahnto mi tyana kahi mahnar nahi....

majha navra madhe madhe baher official tour var asto... aata pan madhe to tour var hota tya vedla maji sasu pan baher gavala geli hoti... ghari mi, sasre aani dir hoto.... mi navrala mahntal ki mi yanchyat nahi rahu sakat ek ter maheri jate... nahi ter majya aaila ghari aante ... pan to 2 gosti aaikayla ready navta..... mala samjat navt ki mi tyala kas samjau... ek ter aamchya kholila dar pan nahi aahe...

ashya khup gosti aahet jya sahan karnyachya pali kade aahet... mala pan toch vichar yeto ki divorce gheun takava....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

nust hech nahi ter ... gharchi sarvi kam kara oofice la jat paryant.... m ghari aal ki parat tech.... aani jevha job la sutti aste tya ved la ter purn divas majha kamat jato... mala sasuchi kaslich madat hot nahi....

majya sasu ni clear mahntal hot ki pagar majya hatat dyach.... je aamhi lagna sathi karz kadl hot te tu pan fhedaych .

mi ya gosticha virodh kela ... mi mahnatl karz fedna tumch kam aahe... majha navra purn pagar tumchya hati deto na... mag aamcha karch aamhi dogh majya pagaratun karu.....

tyavar sasu mahnali ki jar pagar majya hati det nashil ter job sod mala tujya job chi kahi garaj nahi... job kart hoti mahnun amhi magitli tula...

mi navrala boli mi job sodnar nahi aani pagar pan tumchya aaichya hati denar nahi... navra mahnana ki aaichya hati det nasil ter majya hati purn pagar de mi tula kharchala paise deil...

purn pagar mi aata navryachya hati dete...

khup cheap mentality che lok aahet majya gharche....

mor la kahi breakfast banla asel ter adhi sarve kahun ghetat mala kuni vichart pan nahi....

office madhan thakun aalya alya mi sarvan sathi chaha karun dyacha .... kuni kashachich madat kart nahi....
m ashya ghari rahun mi kya kru?

कुठल्याही परिस्थितीमधे पूर्ण पगार घरी द्यायचा नाही आणि जॉबही सोडायचा नाही. तूम्हाला योग्य वाटतोय तेवढाच पगार घरी द्यायचा आणि बाकीचा स्वतःचे स्वंतंत्र बँक खाते उघडून त्यात ठेवायचा.

शक्य असेल तर घरकामाला नोकर शोधा, तसे नसेल तर झेपेल तेवढेच काम करा. बाकीचे तसेच राहू द्या.
ईच्छेविरुद्ध नवरा घरात नसताना घरी राहू नका, माहेरी / गावातील नातेवाईंकाकडे रहायला जा.

बोलण्यांने अंगाला घरे पडत नाहीत. त्यामूळे चक्क दुर्लक्ष करा. अर्थात शारिरीक ईजा केली जाणार नाही याची काळजी घ्या. रोजच्या घटना, लेखी स्वरुपात डायरीत लिहित जा, ( डायरी ऑफिसमधे ठेवा ) शक्य असल्यास
लेखी स्वरुपात हे पत्राने माहेरी / जवळच्या मैत्रिणीला कळवत रहा.

पुढे शिकायची ईच्छा असेल तर तसे करा / छंद जपा. अगदीच नाही तर मुद्दाम संध्याकाळी एखादे स्तोत्र वाचत जा. तूमची श्रद्धा असली नसली तरी हे करा. त्या काळात कूणी तूम्हाला काही बोलणार नाही. घरातले क्लेश कमी व्हावेत म्हणून हे करतेय असे सांगा. हे चालू असताना घरात मद्यपान करु नये, असे सुचवून बघा. एरवीही तोंडाने जप करत रहा, कुणी बोलायला लागलेच तर हातानेच खुण करुन बोलणे थांबवा ( हे उपाय तूमच्या घरात हमखास यशस्वी होतील. ) श्रद्धावान असाल, तर प्रश्नच नाही.

इथे अवश्य लिहित रहा, इतर अनेक सल्ले मिळतील. त्यातले योग्य वाटतील ते अनुसरा. किमान मन मोकळे
केल्याचे समाधान तर नक्कीच मिळेल.
स्थानिक समाजसेवकाची पण मदत घेता येईल. ( त्यासाठी मी मदत करु शकेन.)

कुठल्याही परिस्थितीमधे पूर्ण पगार घरी द्यायचा नाही आणि जॉबही सोडायचा नाही. तूम्हाला योग्य वाटतोय तेवढाच पगार घरी द्यायचा आणि बाकीचा स्वतःचे स्वंतंत्र बँक खाते उघडून त्यात ठेवायचा>>>> १०००+

तुमचा नेमका किति पगार आहे हे पतिला किंवा घरच्यांना समजु देऊ नका.

बँकेत पैसे जमा करा.नवर्याला विश्वासात घेऊन पुढच्या भविष्यासाठि आहेत सांगा किंवा जर तसा नवरा नसेल तर सांगु नका पण आप्ला पगारातिल पैसे जमा करा.

दिनेशदा, चांगला सल्ला.

प्रति, एकदा हे सगळे माहेरी कानावर घालून ठेवा.
नवरा किंवा इतर स्त्री घरात नसताना जर तुम्हाला सुरक्षित वाटत नसेल तर घरात राहुच नका.
आपली मते ठामपणे मांडायला शिका.

दिनेश यांशी सहमत , ताइ दिवसाची सुरुवात श्रीगणेशाच्या दर्शनाने वा स्मरनाने करा, सहनशक्ती वाढवा, हेही दिवस जातील हा मंत्र विश्वासन मनात कोरुन ठेवा कायम, सात महिने लग्नाला म्हनजे खुप नविन आहे सार, तुम्हाला समजून घेन्यासाठी खुप वेळ द्याय्ची तयारी ठेवा सार्या नात्यांना, जिंदगी पडी हे,
majh lagna matrimonial through jhal...>> तरी ते कार्य नियंत्याचच आहे ..........
भावी उज्वल जीवनाला शुभेछा ! Happy

@ दिनेशदा, मि जर घरि पगार नाहि देत म्हनट्ल न तर सरळ नोकरि सोड अस बोलतात.

बोलतात कि आम्हाला तुझ्या नोकरिचि काहि गरज नाहि घरि रहा आनि घरचे काम कर.....

माला दिनेश्दा यान्चे पटले
घरकामाला नोकर शोधाच
असे पन तुम्हि तुमचा पगार नव्र्यच्या हातात देतच आहात तरि तुम्चे प्रोब्लेम सोल्वे होत नाहि आहेत निदान शारिरिक त्रास कमि होइल, घर साभालुन जोब करने खरच खुप धावपल होते.

सासु घरकामाला नोकर पन ठेउ देत नहि..... मला त्यानच्या हातच आवड्त नाहि म्हनते.

नंदा येतात नि म्हनतात कि लवकर उठुन काम करत जा, म सर्वे काम होतात.

डिव्हॉर्स ही अत्यंत टोकाची भूमिका होईल, जर तुम्हाला कौटुंबिक हिंसेला तोंड द्यावे लागत नसेल. नणंदांचे लग्न होऊन त्या सासरी जाणारच असतील हे लक्षात ठेवा, दीर सुद्धा कधीतरी लग्न करेलच, सासरे आणि दीर घरात असतांना, तुम्ही एकट्या घरात राहण्याचा प्रश्न तर खूप अवघड आहे काही बोलणं, पण तरीही; नवर्‍याला विचारण्यापेक्षा सरळ माहेरी जातेय म्हणून सांगा. आणि हे सगळं अतिशय थंड डोक्याने करा. भिती वाटेल, राग येईल, रडू येईल, नंतर काय परीणाम होतील याचीही काळजी वाटेल, पण सुरूवात करावीच लागेल. सासूला सांगा, स्वतः कमवा, मी माझे पैसे तुम्हाला देणार नाही. घरात मी आणि माझा नवरा कमवून आणत असू तर तुम्ही फक्त ऐतखाऊ आहात याची जाणीव करून द्या. माहेरी वडलांना, भावाला या गोष्टीची कल्पना देणे अत्यंत गरजेचे आहे. जी काही घुसमट होतेय, तिला प्रसंगात धीराने तोंड द्या परीणामांची चिंता न करता, नंतर भावनेला वाट करून देण्यासाठी इथे माबोकर आहेतच, किंवा तुमचे जीवलग. आत्मविश्वास ठेवा.

बँक अकाऊंट ओपन करा आणी तिथे सर्व पगार जमा करा. आमच्या कंपनीमधे पॉलिसी बदललेली असून आता पगार डायरेक्ट कंपनीमधूनच बँकेत जमा होतो असे सांगा. (बहुतेक कंपनीमधे ही पद्धत असतेच) तसेच तुमच्या नावाने एखादे आरडी अकाऊंट चालू करा, यामुळे तुमची बचत आपसूक होत राहील. खर्चाला लागतील तितके पैसे अकाऊंटमधून काढून घेत जा.

कायम पर्समधे राजिनाम्याचे पत्र ठेवून द्या. अतिकटकट वाटेल त्या दिवशी "देऊ का आत्ताच्याआत्ता राजिनामा?" एवढेच विचारा. एकंदरीत घरच्यांची वागणूक पाहता, ते तुम्हाला नोकरी सोडू देणार नाहीत. (असा अंदाज!!!)

सासूबाईंना "एवढे काम करणे माझ्या प्रकृतीला झेपत नाही" हे एकदा स्पष्ट सांगा. तरीदेखील ऐकत नसतील तर "हे मी करणार नाही, तुम्हाला हवे असल्यस तुम्ही करून घ्या, अथवा कामवाली ठेवा" असे स्पष्ट सांगा.

जितके स्पष्ट बोलाल तितक्या वाईट ठराल पण तितकंच तुमची कुचंबणादेखील कमी होईल.

शक्य झाल्यास नवर्‍याला एखाद्या मॅरेज काऊन्सिलरकडे घेऊन जा. त्यांना "लग्न-पत्नी-कुटुंब-जबाबदारी" यांचा त्या चर्चेमधे अर्थ कळत जाईल अशी अपेक्षा.

तुम्हाला शुभेच्छा.

@नंदिनी - तुमचे सल्ले खुप idealistic आहेत. हे म्हणजे आसाराम बापू नी त्या नीच लोंकांना "भाऊ" म्हणायला सांगीतल्या सारखे आहे.

@ प्रति - तुमचे सगळे लिखाण वाचुन असे स्पष्ट दिसते आहे की तुमची निवड चुकली आहे. लग्न होऊन फक्त ७ महिनेच झाले आहेत. आत्ताच ह्या लग्नातुन मोकळे व्हा. divorse घ्या. तुमच्या लिखाणावरुन तुमच्या नवर्‍याची आणि त्याच्या नातेवाईकांची जी मनोव्रुत्ती दिसते आहे ती नीच आहे. त्यांच्या पासुन सुटका करुन घेण्यासाठी divorse हा एक च मार्ग आहे.

एक महत्वाचे - जो पर्यंत तुमचा काही ही निर्णय होत नाही, तो पर्यंत मुल होऊ देऊ नका. एकदा मुल झाले की तुम्ही अडकलात त्या नरकात.

प्रति, दिनेशदांची पोस्ट खूप महत्वाची आहे. ते म्हणाले त्याप्रमाणे <<<<<<<<<< रोजच्या घटना, लेखी स्वरुपात डायरीत लिहित जा, ( डायरी ऑफिसमधे ठेवा ) शक्य असल्यास
लेखी स्वरुपात हे पत्राने माहेरी / जवळच्या मैत्रिणीला कळवत रहा.>>>>>>>>>तसेच माहेरच्यांना पण हे सगळं सांगत जा. जरा धीट बन. ते म्हणतात ते सगळ ऐकत गेलीस तर नंतर तुला बदलणे अवघड जाईल. काळजी घे. इथे लिहीत जा. तुला खूप खूप शुभेच्छा!

स्थानिक समाजसेवकाची पण मदत घेता येईल. ( त्यासाठी मी मदत करु शकेन.)>>>>>>>>>>>तू दिनेशदांशी संपर्क साध. ते तुला योग्य मार्गदर्शन करतीलच.

एक महत्वाचे - जो पर्यंत तुमचा काही ही निर्णय होत नाही, तो पर्यंत मुल होऊ देऊ नका. एकदा मुल झाले की तुम्ही अडकलात त्या नरकात.>>>>>>>>>>> हेही फ़ार महत्वाचे आहे.

दिनेशदांशी सहमत.

कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मविश्वास कमी होऊ द्यायचा नाही. इतर लोक अरेरावी करत असतात कारण आपण त्यावेळी दुबळॆ झालेले असतो. तुमची मत घरात सर्वांसमोर स्पष्टपणे मांडा. जे पटत नसेल ते सकारण स्पष्ट करा. आणि कटकटी सुरु झाल्या की कान, डोळे आपोआप बंद करुन घेण्याची कला अंगी बाळगा.

एक नक्की कायम सकारात्मक विचार करा. शांत डोक्याने परिस्थिती हाताळायचा प्रयत्न करा. तुमचे विचार तुम्हाला योग्य वाटत असतील तर त्यापासून ढळू नका.

हे सर्व करताना तुमचा नवरा तुमच्या सोबत आहे का याचा निश्चित विचार करा. नवऱ्याला गृहीत धरु नका आणि तुम्हाला गृहीत धरुन देऊ नका.

मला कळत नाही, सगळे लोक आहे त्यात कसे सहन करायचे, कसे दुर्लक्ष करायचे असे का सल्ले देत आहेत.
अजुन पुर्ण आयुष्य पडले आहे, कीती वर्ष असे सहन करायचे आणि कशासाठी?
७ महिने पुरेसे नाहीत का माणसांचे स्वभाव कळायला?
एकदा चुक झाली, ती सुधारायची सोडुन तीच करत रहायचे ते कशासाठी?

तुम्हा सर्वानचे मनापासन आभार....

माहेरि सर्वाना मि सागत असतेच ...

नणंदांचे लग्न झालि आहेत. लहान नणंद प्रतेक आठव्द्याला येते... मोठि नणंद घरा जवळ राहते..... सासु उट सुट तिच्या घरि गराने घेउन जाते...

आता परत मझा नवरा बाहेर गावि गेला... मला बोलुन गेला कि आई शि मुजुर्या कराय्च्या नाहि.; आनि पगार झाला कि आई च्या हति देशिल... मि सरळ म्हट्ल मि पगार तुम्च्या आइच्या हाति देनार नहि... आणि तुम्ही येत पर्यन्त मि इथे रहनार नहि.. मला बोले कि जर तु गेलि तर परत वापस यायच नहि...

मला हे समजत नाहि .... एक तर स्वताच घर नही माझ कहि सामान माझ्या नंदे कडे ठेवल... मि म्हट्ल कि ते सामान एक तर मझ्या महेरि राहिल किवा माझ्या सासरि रहिल.. तर म्हट्तो कि माझि वस्तु आहे ति मि कुठेहि ठेविल ........ हे सर्व अति होत नाहि का?

मला बोलतो कि... तुला तुझे माहेरचे भड्कवतात...

मि त्याला म्ह्ण्ट्ल बघा... तुम्च्या आई ला मझ वागन पट्त नाहि .... परत आपल्या ला प्रिवcय नाहि आपण वेगळि खोलि करुन रहु... तुम्हि तुमचा अर्धा पगार आई ला द्या... जेव्हा त्यानचे आनि मजे विचार पट्त नाहि... आनि तुम्च्या घरात ड्रिन्क वगेरे घेतात ते मला पट्त नाहि... म्हनुन आपन वेगळ राहु.....

तर यात मि काहि चुकिच बोलते का?

प्रति बाई - तुम्ही हे स्वीकारा की हे लग्न करुन तुमची चुक झाली आहे आणि आता corrective action काय घ्यायची ह्याचा विचार करा. तुम्ही जे प्रतिसादात दोन उदाहरणे दिली आहेत, त्यावरुन तुम्हाला तुमच्या नवर्‍याचा स्वभाव लक्षात नाही का आला?

वेगळे राहुन वगैरे तुमचे problem संपणार नाहीत. जर स्वभाव चांगला नसेल तर तुमचे सगळे उपाय थकतील. त्यामुळे वेळेवर निर्णय घ्या. गँगरीन झालेल्या पायाला antiseptic cream लावुन फायदा होत नाही.

परत यायचे नाही ही धमकी आहे. या अशा धमक्यांना भीक घालू नका. शांत मनान\, सर्व गोष्टींचा विचार करा आणि
त्यावर ठाम रहा.

आणि निश्चयावर ठाम असताना कोणाचीही अरेरावी सहन करायचा नाही.

मला divorce घ्यायचा आहे.

त्या साठी legal procure सुरुवात कुठ्न करु?

जर खरच तुम्ही वेगळ राहुन तुम्हाला बर वाटणार असेल तर खरच तुम्ही वेगळे राहा पण तुम्ही राह णार कुठे i mean 2 say आई कडे की वेगळे?

@नंदिनी - तुमचे सल्ले खुप idealistic आहेत. हे म्हणजे आसाराम बापू नी त्या नीच लोंकांना "भाऊ" म्हणायला सांगीतल्या सारखे आहे.>>> बँक अकाऊंट ओपन करा हा सल्ला आयडीलीस्टीक आहे का? आणि घटस्फोटच घेऊन टाक हा प्रॅक्टिकल सल्ला का? बरं बरं...

प्रति, शांतपणे डोके ताळ्यावर ठेवून एक्दा विचार कर. नवर्‍याला घेऊन चारपाच दिवस कुठेतरी लांब फिरायला घेऊन जा. यादरम्यान त्याला तुझ्या अडचणी त्रास वगैरे शांतपणे आणि मुद्देसूदरीत्या पटवून दे. मॅरेज काऊन्सिलरबरोबर चर्चा करायला सुरूवात कर. सासू, नणंद अथवा इतर कुणाच्याही काहीही बोलण्यावर अजिबात रीअ‍ॅक्ट व्हायचे नाही. तू जितका आक्रस्ताळेपना करशील तितकीच इतरांच्या हातात बोलायला आयते कोलीत मिळेल. माहेरी जेव्हा केव्हा फोन करशील तेव्हा वार्जून सासूबाईंच्या समोरच बसून फोन कर. घर, संसार वगैरे सोडून इतर बर्‍याच गप्पा मारायच्या. माहेरी फोन करताना नवरा आजूबाजूला असला तरी उत्तम. (माहेरचे भडकावतात या आर्ग्युमेंटमधला फोलपणा इथे निघून जातो)

आणि हो, नोकरी सोडायची नाही, मूल होऊ द्यायचे नाही आणि कुठल्याही परिस्थितीत शारीरीक मारहाण सहन करायची नाही. हात उगारला तर मात्र त्याच क्षणी घर सोडून निघायचे.

सध्या तर आई कडेच आहे,

वेगळ दोघ राहुन आम्हि कदाचित सुखी राहु शकतो.

पन नवरा वेगळ राहायला तयार नाहि....

सध्या तर आई कडेच आहे,

वेगळ दोघ राहुन आम्हि कदाचित सुखी राहु शकतो.

पन नवरा वेगळ राहायला तयार नाहि...

>>>>>>>>>>>>>

याचा अर्थ तुमचा नवरा तुमच्यावर प्रेम करतो नंदिनी नी सांगितल्या प्रमाणे नवर्‍याला घेऊन चारपाच दिवस कुठेतरी लांब फिरायला घेऊन जा. यादरम्यान त्याला तुझ्या अडचणी त्रास वगैरे शांतपणे आणि मुद्देसूदरीत्या पटवून दे.

नवर्‍याला घेऊन चारपाच दिवस कुठेतरी लांब फिरायला घेऊन जा. >> जरा सविस्तर लिहा कस जमवायचं हे ? ती पैसे सासूला देते. कोण भरणार तिकिटाचे पैसे? सल्ला योग्य दिशेने आहे पण तिचे रिसोर्सेस लक्षात घेता जे शक्य आहे तसा हवा. सध्याच्या परिस्थितीत तो स्वतासाठी 'टेलरमेड' करून घ्यावा इतकी तिची मानसिक परिस्थिती दिसत नाही. तुम्हीच जरा उलगडून सांगा.

@ नंदिनि, आम्हि बाहेर जान हे आमच्या हातात नहि... सासु आमच्या प्रतेक गोष्टित interfere करते.. मि कितिहि समजवल तरि परत तेच होनार आहे...

सगळ्यात पहिल्यांदा माबोवर किंवा अजुन कोणत्याहि साइटवर किंवा स्वतःच्या मित्र-मैत्रिंणीचे सल्ले घेणे बंद करा.

स्वतः निर्णय घ्या आणी त्या निर्णयाच्या चांगल्या - वाईट परिणामाला सामोरे जा. वाइट परिणाम झाल तरी परत स्वतःचा निर्णय घेण्याचे धैर्य ठेवा. जेव्हा तुम्हि स्वतःच स्वतःचा निर्णय घ्याल त्याच क्षणी तुम्हि स्वावलंबी झालात. जोपर्यत विचारत फिराल कि मी काय करु तोपर्यत तुम्हि परावलंबीच आहात!

पोलिसात तक्रार करून ठेवणे योग्य असं मला वाटतं. मानसिक छळ होतोय हे एकदा पोलिसात जाऊन सांगावंस. घरी पोलिस येऊन गेले तर आजूबाजूच्यांनाही कल्पना येते आणि मग समाजाला घाबरून कदाचित मंडळी थोडंफार बदलण्याचा प्रयत्न करतील.

शिवाय, 'मी एक पत्र लिहून मैत्रिणीला दिलं आहे. माझं काही बरंवाईट करण्याचा प्रयत्न केलात तर ते पत्रं पोलिसांना दिलं जाईल.' हे स्पष्ट सांगा. कारण घरी पोलिस येऊन गेले तर कदाचित आक्रस्ताळेपणाही केला जाऊ शकतो.

पोलिसात तक्रार करण्याचा फायदा हा की, उद्या तुम्ही घर सोडून जरी गेलात तरी त्यामागचं सबळ कारण तुमच्याकडे असेल. नाहीतर पुढे घटस्फोटाची वेळ आली तर तुम्ही इतर कोणाबरोबरतरी पळून गेलात वगैरे आरोप केले जातील.

तुम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला असेल तर आधी एखाद्या चांगल्या वकीलाचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे वागा. तुमचे दागिने वगैरे ताब्यात घ्या आणि माहेरी नेऊन ठेवा.

एक महत्वाचे - जो पर्यंत तुमचा काही ही निर्णय होत नाही, तो पर्यंत मुल होऊ देऊ नका. एकदा मुल झाले की तुम्ही अडकलात त्या नरकात.>>>>> खरय

जरा सविस्तर लिहा कस जमवायचं हे ?>>> सिमंतीनी, तिच्या घरची सर्वच परिस्थिती मला इथे बसून माहित नाही. पण काहीतरी मार्ग काढायलाच हवा. देवदर्शनाला जाण्याचे निमित्त काढू शकता येइल.. या कारणासाठी कुणी नाही म्हणत नाही. शिर्डी, कोल्हापूर, अष्टविनायक, कुलदैवत, अथवा जिथे कुठे "सासूची" जास्त श्रद्धा आहे, असल्या ठिकाणी "माझा अमुक एक नवस आहे, तो पूर्ण करू या" असे म्हणून चार पाच दिवस जाता येऊ शकते. सध्या सासू आणि नण्न्देपासून जरा लांब जाऊन नवर्‍यासोबत बोलता येऊ शकेल. (देवदर्शनाचे निमित्त असेल तर नवर्‍याला ड्रिंक्सपण घेता येणार नाहीत). फिरायला गेल्यावर नवर्‍याचे मन कसे वळवायचे हे मात्र तुम्हालाच जमवावे लागेल. तिथे मी तुमची काहीच मदत करू शकत नाही.

दुसरं म्हणजे, सासूला किती लेव्हलपर्यंत इंटरफेअर करू द्यायचं आणि किती नाही ते एकदाच समक्ष बसवून ठरवून घ्या. समाजामधले पाच ज्येष्ठ लोकांना बसवून तुमच्या माहेरचे-सासरचे असे एकत्र बसा. त्यातून तुमच्या सर्व समस्या त्यांच्यासमोर मांडा. सासू आणि नवरा जे काही आरोप करतील त्यांची समर्थपणे उत्तरे द्या. बर्‍याचदा कित्येक लोक अशा "समाज पंचायतीला" घाबरत असतात. जितके तुम्ही सांगितले आहे त्यावरून तरी तुमची सासू आणि नवरा "हे असंच वागायचं असतं" म्हणून तुमच्याशी असे वागत आहेत असे वाटत आहे.

हे कुठलेही मार्ग काम करत नसतील तर घटस्फोट हा पर्याय तर आहेच. मामीने दिलेले सल्ले देखील लक्षात ठेवा. सध्या तरी तुम्हाला शुभेच्छा.

माझ त्याच्या वर प्रेम असेल तरि मि त्याच्या घानेरड्या शिव्या तर नाहि एकु शकत.>>>>>>>>>>

नवरा घरात शिव्या देतो ? आणि त्याही तुम्हाला???????? ईतका साधा संस्कार ज्याच्यावर नाही तो तुमचा काय आदर करनार आणि काय तुम्हाला सुख देणार ???? तुमच्या नवर्‍याबद्दल मी असे बोलू नये पण रहावले नाही.

दिनेशदांनी लिहिलेले सर्वखरेच करा. नोकरी सोडू नका. जे जे काही होतय ते लिखित स्वरुपामधे ठेवायचा प्रयत्न करा.

जमले तर यांचे असे वागणे मोबाईल मधे रेकॉर्ड करा. ( कोणी तरी मागे एका ठिकाणी लिहिले होते कि रेकॉर्डींग हा न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. वकिलाला विचारुन बघा. )

तुम्ही तुम्हाला जे जे काही चुकिचे वाटते ते आजिबात सहन करु नका. ठाम रहा.

Nandini - सासूला किती लेव्हलपर्यंत इंटरफेअर करू द्यायचं आणि किती नाही ते एकदाच समक्ष बसवून ठरवून घ्या. >> +1000

स्थानिक समाजसेवकाची पण मदत घेता येईल.
समाजामधले पाच ज्येष्ठ लोकांना बसवून तुमच्या माहेरचे-सासरचे असे एकत्र बसा. त्यातून तुमच्या सर्व समस्या त्यांच्यासमोर मांडा.
>>>>अशाने प्रश्न अजुन चिघळेल, शक्यतो २ परिवार समोरासमोर येवुन बोला, बाहेरचे मध्ये घेवु नका.

रोजच्या घटना, लेखी स्वरुपात डायरीत लिहित जा, ( डायरी ऑफिसमधे ठेवा ) शक्य असल्यास
लेखी स्वरुपात हे पत्राने माहेरी / जवळच्या मैत्रिणीला कळवत रहा.
>>> अशाने फार फायदा होणार नाही, सहानुभुती मिळेल, पुढे खटला उभा राहिलाच तर हे सगळे प्रूव करावे लागेल.

पोलिसात तक्रार करून ठेवणे योग्य असं मला वाटतं.
>>> NC रजीस्टर करा...

किती सहन करायचे आहे हे ठरवुन घ्या आणि त्याप्रमाणे निर्णय घ्या.

अशाने प्रश्न अजुन चिघळेल, शक्यतो २ परिवार समोरासमोर येवुन बोला, बाहेरचे मध्ये घेवु नका.>> सहमत! प्रश्न समजुन न घेता बाईनेच कस जुळवुन घेतल पाहिजे वैगरे उपदेश मिळतील..
तुमच आणि नवर्‍याच रिलेशन कस आहे यावर बरच काही डेपेन्ड आहे, ते चान्गल असेल तर बाकीच्या.न्शी एकतर लढु शकाल कि.न्वा त्या.न्ना फाट्यावर मारु शकाल.

अशाने प्रश्न अजुन चिघळेल, शक्यतो २ परिवार समोरासमोर येवुन बोला, बाहेरचे मध्ये घेवु नका.>>
बरोबर
तुमच आणि नवर्‍याच रिलेशन कस आहे यावर बरच काही डेपेन्ड आहे, ते चान्गल असेल तर बाकीच्या.न्शी एकतर लढु शकाल >>>>>>>>>>.
खरय

दिनेश्दा

मला तुमचि मदत हवि आहे,

सर्वे उपाय करुन बघितले. बहेर फिरुन पन आलो ... घारि आल्या वर परत तेच.... आज नवरयानि हात पन उचला मला मारल सुधा.

मि नागपुर ला रह्ते इथे कुनाचि मदत घेउ.

Aadhee 1091 var Call Kara. Tumchee paristhiti tyana sanga mhanje case register/record hoeel.
'1091' is police helpline for women in distress.
Tumachyaa maheri pan he sanga.

आज नवरयानि हात पन उचला मला मारल सुधा. << सर्वात आधी डॉक्टरकडे जा. तिथे पूर्ण तपासणी करून तो रिपोर्ट ताब्यात घ्या. त्यानंतर माहेरी निघून जा. माहेरी या मारहाणीबद्दल पूर्ण कल्पना द्या.

१. जोडणे कठीण , तोडणे तुलनेने सोपे...
२. डिव्होर्स घेतल्यावर माहेरचे मदत करतिल का? केली तर प्रश्ण नाही... नाहीतर कुठे रहाणार तुम्ही?
३. नवर्‍याला एकदा माहेरी बोलवुन घ्या.... सगळ्यां समोर बसुन विचारा, त्याचा विचार महत्वाचा आहे...
४. घटस्पोट घेणं वाटतं तेवढं सोप्प नाही. तुम्ही जरी तयार असलात तरी तो पण तयार हवा त्या साठी
५. गेल्या ७ महिन्यात नवर्‍याचं आणि तुमचं काहीच जुळलं नसेल, कोणताही मानसिक बंध तयार झाला नसेल, तर मात्र घटस्पोट हा एकच पर्याय दिसतो
६. त्याने मारहाण केली असेल, तर पोलिसात जा. रेकॉर्ड राहु दे
७. मुळातच संस्कार चांगले दिसत नाहियेत...
८. दिनेशदांना विपु करा ते रास्त सल्ला देतिल...