लॅपटॉप दुरुस्ती संदर्भात....

Submitted by स्वरुप on 1 January, 2013 - 11:47

माझ्या HP च्या लॅपटॉपला डिस्प्ले प्रॉब्लेम येतोय.....
पुण्यात कुणाला लॅपटॉप दुरुस्तीसाठी खात्रीलायक दुकान माहिती आहे का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लॅपटॉप वॉरंटीमध्ये आहे का? नसेल तरीही एकदा ऑथोराईज्ड सर्वीस सेंटरला दाखवा... अंदाजे किंमत पहा पार्ट + लेबर ची, त्या रीप्लेसमेंट पार्ट वर वेगळी वॉरंटी आहे का तेही तपासा... (शक्यता कमी आहे). मग लोकल कुणी असेल तर पहा...

यात जर डिस्प्ले गेला असेल तर तो बदलावाच लागेल आणि त्याची कॉस्ट बेअर करावी लागेल. जर छोटा प्रॉब्लेम असेल तर लोकली रीझॉल्व्ह होऊ शकेल.

ओहो... मग एकदा वर जे सांगितलंय ते चेक करा, तो पार्ट भारतात अव्हेलेबल आहे का आणि किंमत किती ते पहा.
२०के+ जर असेल तर मी तरी म्हणेन की लॅपटॉपच बदला, नाहीतरी ३+ वर्षे वापरून झालाच आहे!

२०के.... अरे बापरे.... इतके घाबरवू नका!
माझा अंदाज आहे की डीस्प्ले कनेक्शन किंवा ग्राफिक कार्डचा काही तरी प्रॉब्लेम असावा.... पण बाहेरुन नक्की काही कळणे अवघड आहे..... म्हणूनच खात्रीशीर दुकान हवे आहे!
ऑथोराईज्ड सर्वीस सेंटर जरा महागडे असतात ना?

ऑथोराईज्ड सर्वीस सेंटर जरा महागडे असतात ना?>>> पण मग ते खात्रीशीर ईलाज पण तर करतात. आणि म्हणूनच मी सुचवलेलं की आधी २ही ची (ऑथोराईज्ड + लोकल) तुलना करा मगच निर्णय घ्या...

सुरुवातीस BIOS चे Messages येतात का? तसे असेल तर फक्त S/W प्रॉब्लेम आहे. उगीच पैसे खर्च करू नका. ते लोक तुम्हाला LCD किंवा Motherboard बदलायला लावतील.

BIOS चे Messages येतात का ते सांगा.

नाही असे काही मेसेज येत नाहीत...... पण सुरुवातीला मधूनच आडवे तिडवे चेक्स यायचे स्क्रीनवर.... नंतर न.तर स्क्रीन फार वेळ चालू राहील्यावर फ्लिकर करू लागला..... आणि आता तर पूर्ण झोपली आहे स्क्रीन!
नेटवर शोधाशोध केल्यावर हा Nvidia graphic cards चा प्रॉब्लेम आहे असे कळतेय.... HP च्या dv6000 series ला बर्‍याच जणांना हा प्रॉब्लेम येतोय!

स्वरुप, हा प्रॉब्लेम Nvidia Graphic चाच आहे. Graphic Chip बदलता येते पण हा प्रॉब्लेम पुन्हा कधिही उद्भवु शकतो आणि तेव्हा chip बदलता येईलच असे नाही. साधारण ३०००-३५०० मधे चिप बदलुन मिळते पण १ महिन्याचीच वॉरंटी असते, रीस्क घ्यायची ईच्छा असेल तरच रीपेर करुन घ्या अथवा buy back चा पर्याय बघा.

स्वरुप स्वारगेटजवळ एक दुकान आहे.. खात्रीलायक काम करुन मिळेल.... माझ्या एका लॅपटॉपचे काम त्यांच्याकडून करुन घेतले आहे..

झाला एकदाचा दुरुस्त लॅपटॉप.... टिळक रस्त्यावरच्या एचपी मॉलच्या वर असाणार्‍या जेनेट मधुन रिपेअर करुन मिळाला.... (आधी मी लॅपटेक मध्ये दाखवला... पण त्याचा अ‍ॅटिट्यूड फार बेफिकीर वाटला... तो म्हणाला की ग्राफिक कार्डचा प्रॉब्लेम आहे दुरुस्त केला तरी गॅरंटी नाही.... बदलून टाका आता!)..... इथे त्याने डिस्प्ले केबल बदलली आणि एक महीन्याची वॉरंटी दिलीय... ३६०० रुपये सांगितलेले..... मी बाजारातली डिस्प्ले केबलची किंमत सांगितल्यावर ३००० घेतले.... आता दोन दिवस तरी नीट चालतोय Happy