नोकरीवली बायको

Submitted by के. रेहमान on 24 December, 2012 - 05:00

एका मेंबरबे म्हटलं कि बायकोने काय काय करायचं ? नोकरी , शिक्षण, संसार इ. इ. त्यावरून प्रश्न पडला आहे. नव-याम्ची अपेक्षा काय असते बायकोच्या नोकरीबद्दल ? वोट करा आणि जमल्यास मत लिहा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्लीज, एका आयडीने एकच वोट द्या. ( या पोस्टला नको). नवा पर्याय बनवू शकता. वोट दिल्यावर दोन चार ओळीत त्यामागचा विचार लिहील्यास ठीक राहील.

के.रेहमान,

>>शक्यतो, नोकरीवालीच. नसल्यास हुंडा जास्त द्यावा.

या पर्यायात हुंडा देणेघेणे चालण्याजोगे आहे असे अप्रत्यक्षपणे सूचित होते. तरी कृपया अस्वाम्यक (डिस्क्लेमर) टाकावा. Happy

आ.न.,
-गा.पै.

तळटीप : हुंडा घेणे म्हणजे लग्नाच्या बाजारात स्वत:ला विकणे आहे. मात्र तरीही 'मी स्वत:चीच दलाली केली तर बिघडतं कुठे', असा प्रश्न विचारू नये.

>>तळटीप : हुंडा घेणे म्हणजे लग्नाच्या बाजारात स्वत:ला विकणे आहे. मात्र तरीही 'मी स्वत:चीच दलाली केली तर बिघडतं कुठे', असा प्रश्न विचारू नये.<<
शमत.

तात्यानु,
नुसते इतकेच नाही. तो "गुन्हा" आहे. पोलीसात कळ्ळं तर अडचन हुईल.

ही एक चांगली कल्पना आहे. सर्वांनी प्रामाणिकपणे वोटींग केलं तर एक चांगला सर्वे होईल.

(नोकरीवाली) असली तरी चालेल, नसली तरी चालेल. हा माझा ऑप्शन आहे. एक पुरूष म्हणून घर चालवायची जबाबदारी माझ्यावर आहे हा संस्कार आहेच आहे. बायकोला करीअर म्हणून किंवा बाहेर पडता यावं म्हणून नोकरी करण्याला ना कधीच नव्हती. उलट काही व्यवसाय करता आला तर प्रोत्साहन दिलंय. पण मुलीच्या वेळी तिने आपणहून नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला त्यालाही विरोध नव्हता. उलट तिच्या या निर्णयाने दोन्ही मुलांच्या बाबतीतली चिंता गेली.

इथून पुढच्या पिढीने काय करायचं ते त्यांचं त्यांनी ठरवायचंय.

नम्र शंका:
-------------
के. रेहमान | 24 December, 2012 - 15:31
1
Vote up!

घरबायको हवी. नोकरी चालणार नाही. असल्यास सोडावी लागेल.
------------

"घर बायको" म्हणजे काय?

मित | 23 December, 2012 - 12:54 नवीन

झंप्याच्या एका पायाचे हाड तुटले होते म्हणून तो दवाखान्यात गेला.
पाहतो तर काय... तिकडे एक माणूस बसला होता ज्याच्या दोन्ही पायांची हाडं तुटली होती.
झंप्याने त्याला कुतुहलाने विचारले
.
.
.
.
काय हो? तुम्हाला दोन बायका आहेत का ???

हुंडा देऊन आलेली बायको नोकरी सोडून व्यवसाय करून घर साम्भाळत असेल तर मज्जा की नै. Happy
हुंडा नसेल तर निदान माहेरच्या संपत्तीतला तिचा हिस्सा घेउन यावी.

भारतातल्या लै टक्के 'पिवळ्या रेशनकार्डवाल्या (अन इतरही कित्येक) घरांत' काय चाल्लेलं अस्तं असं म्हणायचंय तुम्हाला साती तै?

मज्जाच!

हुंडा तर आणतेच. प्लस घरकाम, बाहेरकाम, कमाई, पोरं जन्मू घालणं, संभाळणं अन तदानुषंगिक गोष्टी करून वरतून नवर्‍याच्या दारूला पैकं देऊन मारही खाते रोज.

अशी अखुडशिंगी बहुदुधी असते. Wink माहेरून इष्टेट आणलीच पायजे. नाहीतर अतिक्रमण केलेल्या या माझ्या पत्र्याच्या झोपडीरूपी इष्टेटीची व त्यावर नवर्‍याने करून ठेवलेल्या कर्जाची नवरा सिर्‍हॉसिसने मेल्यानंतर वारस कोण?? तीच ना? मग तिच्याच या नव्या घराची इष्टेट वाढवली तिने तर काय बिघडलं?? Wink

.

तुमच्या पोस्टचा अर्थ जरी लक्षात आला तरीही इतरांचे गैरसमज होतील अशा पोस्टस कृपया टाळाव्यात ही नम्र विनंती. इब्लीस ठिपका हा आयडी माझा नाही. कुणाचा आहे यात रस नाही. इथे बालासोरला तुमच्या ओळखीचा कुणी आयडी असेल तर मी कुठल्या कामात बिझी आहे आणि दिवसभरात किती दमायला होतंय हे त्यांना प्रत्यक्ष पाहता येईल. इतका वेळ नाही हो... उठसूठ आयडी बनवत बसायला.

I shall make it a rule never to respond to your posts ever again. >>

जो काही अर्थ होत होता तो आपल्या लक्षात आणुन दिला होता इतकंच. माझी जमेल तितकी काळजी घेणं हे मलाच करायला पाहीजे. अनुभवातून अशा गोष्टी वेळच्या वेळी लक्षात आणून दिलेल्या ब-या असं वाटतं. यात काही चुकलंय असं तुम्हाला वाटत नसेल तर मर्जी तुमची ! प्रत्येक वेळी लक्षात आणून द्यायचं माझं काम नक्कीच कमी होईल. आभार.