जुन्या पद्धतीचा झोपाळा बनवून हवा आहे

Submitted by स्वरुप on 22 December, 2012 - 10:45

जुन्या पद्धतीचा कडीपाटाचा मोठा झोपाळा बनवून देणारे कारागीर पुण्यात कुणाच्या माहीतीचे आहेत का?
किंवा असे झोपाळे विकत कुठे मिळतात हे कुणाला माहीत आहे का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुना बाजार ठाऊक आहे का? स्टेशन जवळ भरतो. बघा ट्राय करून.
तुम्ही लाकूड आणून दिलेत झोपाळा कुणीही सुतारकाम करणारा बनवून देईल. त्याच्या कड्या पितळी हव्या असतील तर भयंकर महाग मिळतील.
माझा सल्ला असा, की गावाकडे बघा. सेकंडहँड किंवा नातेवाईकांकडे/ओळखीपाळखीच्यांकडे पडून असलेली बंगई मागून पहा. पुण्यात मिळाला तरी सालटी निघतील इतके लुटले जाल.
रच्याकने: जुन्या पद्धतीचा मोठा झोपाळा करून टांगण्या इतकी जागा तुमच्या बंगल्यात तीही पुण्यात आहे हे वाचून तुम्हाला 'महाग' चा प्रश्न नसेल असे वाटते.

सुतार करून देईल, ओळखीचा असेल तर. पितळी कड्या मात्र अवघड/ महागडं काम आहे. त्याचा हट्ट नसेल, तर स्टीलवर तडजोड करता येईल. ओळखीचा सुतार नसेल, तर कोणताही ईन्टीरियर डेकोरेटर, ज्याच्याकडे बांधलेले सुतार आहेत तो ही करून देईल. तो त्याचं कमिशनही घेईल, हे सांगणे न लगे Happy

सारस बागेकडून दांडेकर पूलाच्या दिशेने जाताना , डाव्या हाताला १ बारक दुकान आहे तिथे मिळतो बनवून..

नाहितर , बाजीराव रोड ला हि एका दुकानात मिळतो बनवून.. Happy

स्वरुप, कितपत अर्जंट आहे? माझ्या बाबांनी नविन घरी असा जुन्या पद्धतीचा, कोकणातल्या घरी असतो तसा झोपाळा बनवुन घेतला आहे. मोठा लाकडी पाट, त्याला डिझाइनच्या पितळी कडया आणि त्याही वर लोखंडी साखळ्या. मस्त आहे. मी पुढच्या आठवड्यात फोटो टाकु शकते.

घारूआण्णाला पकडा, तो असल्या कामात येक्सपर्ट आहे. शिवाय तो स्वतःला ईंटीरीयर डेकोरेटर, गड किल्ल्यांचा आर्किटेक्ट, ईंजिनीयर, हत्यारविशारद असं बरच काय काय समजतो.

नुकताच असा चांगला झोपाळा मी भंगारात विकला. खर तर गावाकडील घराची जुनी आठवण होती. काय करायच असा प्रश्न होता. टेरेस ची जागा खात होता.शेवटी ५००/- देउन टाकला. एखाद्या बंगला बांधणार्‍या माणसाला भेट म्हणुन द्यायचा होता. पण असा कुणी मिळाला नाही.

पितळी कड्या पुण्यात पितळी कड्या पुण्यात मंडईजवळ रामेश्वर चौकात, तांब्या-पितळेच्या वस्तू विकणारी जी दुकाने आहेत, तिथे मिळू शकतील.

आम्ही फ्लॅटमधे ५ वर्षांपूर्वी बसवला आहे.
- स्टेशन/कँपाच्या आसपास लाकडाची बाजारपेठ आहे कुठेतरी. तिथे विचारापूस केली होती. जुनी घरं/वाडे पाडल्यावर तिथले झोपाळे असातात त्यांच्याकडे. तो मनासारखा मिळाला तर उत्तम. नाहितर करुनपण मिळतो. पण आपल्याला लाकूड वै मधलं जास्त माहिती नसल्याने महागात पडत असेल. पण आमच्या झोपाळ्याची अजुनही काही तक्रार नाही.
- आम्ही साध्या स्टीलच्या कड्या बोहरी आळीतुन घेतल्या. पितळी फार महाग पडतात.
- हा झोपाळा तुम्ही कसा टांगणार ते माहिती नाही. आम्ही फ्लॅटच्या छताला anchor bolt वापरून हूक जोडले. कोणिही लाउन देइल. आमच्या इलेक्ट्रिशननेच लाउन दिले. पण जरा sensible/experienced माणुस असेल तर बरं.

सगळ्यांना धन्यवाद!

अवनी, सॅम, तुम्ही सांगितलेल्या ठिकाणी चौकशी करुन बघतो.

पौर्णिमा, मी पण एका ओळखीच्या इंटीरीअर डेकोरेटरला सांगुन ठेवलय.... ती म्हणाली की बनवून मिळू शकेल पण तो जुना टच मिळेलच असे नाही!

मनिमाऊ, अगदी फार अर्जंट नाहीये.... तुम्ही कुणाकडून बनवून घेतलाय त्याचा रेफरन्स मिळू शकेल का?
मनासारखा मिळेपर्यंत घाई करणार नाहीये.... तुम्ही सांगताय साधारणत तसाच हवा आहे..... आमच्या सातारच्या घरी गच्चीवर बसवायचा आहे.... मस्त चांदण्यात ऐसपैस झोपता येईल इतका मोठा हवा आहे Happy

अरेरे! के रेहमान, स्वरुप मी तो झोपाळा अक्षरशः वैतागून तो विकला. ४".६" साईज होता. कड्या हुक सर्व उत्तम होते. कुणातरी योग्य व्यक्तिला भेट द्यावा असे मनात होते. पण तशी व्यक्ती भेटलीच नाही बायकोच्या मैत्रीणीसाठी वर्षभर ठेवला होता पण तिने नेलाच नाही..आता ओलेक्स चा धागा पाहिल्याने या धाग्याची आठवण झाली