C drive ची जागा वाढवायची आहे.

Submitted by मया on 21 December, 2012 - 00:00

माझ्या system c drive भरला असल्या कारणाने वारंवार डिस्क फुल हा massage येतो तो बंद करण्यासाठी मला डिस्क c चा space वाढवायचा आहे कारण माझ्या d आणि e drive मध्ये भरपूर जागा आहे. काय केल्याने c drive ची जागा वाढवू शकतो.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नविन हार्डडिस्क लावा........अथवा डाटा डी आणि इ मधे ट्रांस्फर करा

C Drive >> Right Click >> Properties >>> Disk Cleanup >> check "old compressed files" >> clean

प्रोसेस पूर्ण होण्यास वेळ लागेल पण बरीच जागा मिळेल. तसेच उदयन.. नी सांगितल्यानुसार डाटा ईतर पार्टीशनमध्ये हलवा.

c drive मध्ये programme files आहेत आजून काहीच कुठलाही नवीन software इंस्टाल करता येत नाही मला एवढ माहित आहे कि असे एक option असत ज्याने drive ची जागा वाढवता येते पण त्याची procedure आता मला आठवत नाही.
आणि भ्रमर तू जे सांगितलं ते मी नेहमीच करतो.

डेस्कटॉपवर फाईल्स स्टोअर केल्या असतील तर D/E मध्ये हलवा. डेस्कटॉपच्या फाईल्स बाय डीफॉल्ट C ड्राईव्हवर स्टोअर होतात.

मया क्लिनिंग आउट विथ सीक्लीनर यूट्यूब व्हीडीओ.

CCleaner - Download - Piriform

TreeSize Free - Quickly Scan Directory Sizes and Find Space Hogs हे सॉफ्टवेअर वापरून कुठल्या डिरेक्टरीने किती जागा व्यापली आहे ते कळेल. त्याप्रमाणे बघून मग तुला पुढे काय करायचे ते ठरवता येईल.

ही सॉफ्टवेअर चकटफू आहेत.

सी ड्राईव ची असलेली जागा जर वाढवायची असेल तर पार्टिशन डीलीट करून नवीन करू शकता. पण हे सगळं करण्या आधी तुमचा संपूर्ण डेटा बॅकअप करा. सगळ्या ड्राईव्स चा. कारण जर काही चूक झाली तर सगळी एच्डीडी च फॉरमॅट करून विंडोज रीईंसटॉल करावी लागेल.

मया, तुला partition manager software वापरुन करावं लागेल. त्याच्यासाठी तुला Hiren Boot CD किंवा Linux bootable CD वापरुन हे करावं लागेल. पण योगेश कुळकर्णींनी सांगितल्याप्रमाणे डेटा बॅकप घे.

ssaurabh2008 ह्यांनी दिलेला सल्ला चांगला आहे. मी तो अनेकदा वापरला आहे. पार्टीशन managers कोणाच्या मदतीशिवाय वापरू नका.

पहिले डि आणि इ ड्राइव्ह ची जागा कमी करुन नविन रिकामी जागा (free space) तयार करा.
आणि मग सी ड्राइव्ह ला वाढवा (extend).
Start -> Right click on Computer -> Disk Drives

तुम्ही Operating System कोणती वापरता ??

Windows 7 वापरत असाल तर Shrink Volume Option मधुन C drive चा space वाढवू शकता.

प्रीतम तू दिलेलं उत्तर मला माहित होत ते opation मी शोधत होतो कारण माझ्या घरी laptop आहे त्यात windows ७ आहे त्यात मी जेव्हा नवीन घेतला तेव्हा तेच वापरून c drive चा space वाढवला होता परंतु हि system आहे ती windows आहे त्यात तेच opation शोधत होतो.

अभिजित नीटसे कळले नाही काय सांगत आहेस ते.

मी सांगितलेल्या उपायामध्ये तुम्हाला कोणतेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायची गरज नाहीये.
इनबिल्ट फिचर आहे ते विंडोजचे.

जर तुम्हाला ड्राईव्ह फॉरमॅट / पार्टीशन साइझ बद्लायची नसेल तर C:\Windows\Temp फोल्डरची साइझ बघा, .log(window's logs) फाइल्सची साइझ बघा.
इन्स्टॉल्ड सॉफ्ट्वेअर्सच्या / अ‍ॅप्लीकेशन्सच्या .exe (सेटअप फाईल्स) असतील तर त्याना अनइन्स्टॉल करुन पून्हा इन्स्टॉल करा पण वेगळ्या ड्राईव्ह (D:\ or E:\ ) मध्ये.

तुम्ही दिलेल्या उतरांबद्दल धन्यवाद पण त्यातून मला windows xp या system चे upgradation करून घ्यावेसे वाटले म्हणून मी आता windows ७ टाकून system c ला योग्य अशी जागा दिली आहे जेणे करून पुन्हा असा प्रोब्लेम होणार नाही

छान! आता किती दिलिये जागा सी ड्राईव ला? विन ७ ने जवळ२ १६जीबी खाल्लं असेल ना? माझ्या मते ५० जीबी पुरावी सगळ्या सॉफ्ट्स ना धरून... ?