सध्या देशभरात दिल्लीतील तरुणीवर झालेल्या अत्याचाराची बातमी गाजतेय.. सॉरी पण मी गाजतेय असच म्हणेन.. त्या तरुणीसोबत जे काही झाले ते निश्चितच वाईटच.. त्यात काहीच सन्शय नाही. पण एकन्दर ज्या पद्धतीने या दुर्दैवी घटनेचा जनतेकडून मध्यमाकडून अन राजकारण्याकडून प्रतीसाद येतोय ते बघुन काही प्रश्न पड्ले.. देशात घड्णारी ही काही पहिली घट्ना नाही. साधारन २ आठवड्यापूर्वीच एका अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अत्याचाराची अन नन्तर केल्या गेलेल्या हत्येची बातमी होती. . जर रोजचे वर्तमानपत्र नीट बघितले तर सरासरी एक तरी याच आशयाची बातमी असतेच. तेव्हा कुठे असतात हे सगळे समाज प्रतीनिधी.. राजकारणी अन सामान्य पब्लीक सुद्धा.. गेल्या २ दिवसात फेसबूक.. ट्वीटर अन इतर सन्केतस्थळावरून वेगवेगळ्या तर्हेने निषेध नोन्दवला जातो आहे.. ही अर्थात चान्गलीच बाब आहे. पण ज्या पिडीत मुलीन्ना अशी पब्लीसिटी नाही मिळाली त्यान्च काय.. की सामान्य जनता सुद्धा फक्त मिडियानी उजेडात आणलेल्या .. रॅदर उचलून धरलेल्याच गुन्ह्यान्चा निषेध करणार काय..................
आत्ताच कशी काय जाग आली जनतेला
Submitted by मी कल्याणी on 20 December, 2012 - 12:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जाहिरातबाजीचा राग येतो...
जाहिरातबाजीचा राग येतो... बाकी काही नाही. मनातल कुठे बोलाव ते नाही कळल म्हणून इथे लिहिल.
खरे आहे तुमचे.
खरे आहे तुमचे.
फेसबुक वर प्रोफाइल पिक्चर
फेसबुक वर प्रोफाइल पिक्चर काळं करून खरच काय साधणार आहे??? स्वतःची ''फ्रेंड्स'' मधे पब्लीसीटी??? खरच क्रुती करायची वेळ येते तेव्हा कुठे असतो यांचा निषेध?? शेजारच्या घरात home ची केस असेल तर हे दारं लाऊन बसतात. लग्नाच्या संदरभात चौकशीला आलेल्या वधुपित्याला खरी माहिती देण्याचे यांचे गट्स नाहीत...
कल्याणी बरोबर बोललात. पण
कल्याणी बरोबर बोललात.
पण जमावाला हलवायला अशा काही एक दोन घटनाम्वर मिडियाने केलेले हाईप उपयुक्त ठरते.
मग जास्तच मुद्दा लावून धरला गेला कायद्यातही योग्य बदल होतात.
ऊदा. ़ कॉलेजांत रॅगिंग होणे आणि दरवर्षि त्यात एक दोन लोक मरणे , आत्महत्या करणे हे नविन नाही पण एक दोन वर्षांपूर्वी एका मुलाच्या मृत्युची केस व त्यानंतर त्याच्या पालकांनी दिलेला सर्वांगिण लढा आणि मेडियाचे प्रयत्न यामुळे सगळ्या प्रोफेशनल कॉलेजाना रॅगिंगबाबत सतर्क व्हावं लागलं आणि सध्या त्याचि सिविएरिटी प्रचंड कमी आहे.
हा बलात्काराचा मुद्दाही तसाच.
कोणाच्या का लाठीने होईना साप मेल्याशी कारण. मग ती काठी उथळ मेडिया किंवा दिखाऊ सोशल नेटवर्कींगवाल्यांची का असेना.
कल्याणी.... हा विषय जितका
कल्याणी....
हा विषय जितका नाजूक तितकाच समाजमंथन होण्याच्या नितांत गरजेचा आहे. घटना घडली ही जितकी दुर्दैवी बाब तितकीच महत्वाची बाब अशी की चला या निमित्ताने केन्द्र आणि राज्य सरकारच्या गृहखात्याने असे घडू नये [यानंतर असे प्रकार कधीच घडणार नाही, असे छातीठोकपणे कुणीच सांगू शकत नाही] यासाठी काय उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे यावर मिडिया आणि जनचर्चा जागरूकपणे होत असल्याचे दिसत आहे, या बाबी म्हटल्या तर स्वागतार्हच मानाव्यात.
बलात्कार ही बाब समाजातील अशी एक कीड आहे की जी शिक्षा वा बंदुकीच्या धाकाने नाहीशी होईल असे चित्र दुर्दैवाने दिसत नाही हे तर उघडच आहे, म्हणजे मग राहता राहिला मार्ग मानसिकतेचा. अशा नराधमी कृत्याकडे जे ओढले जातात त्या मागील नेमकी कारणमीमांसा जर अशा विधायक चर्चातून निष्पण्ण झाली [परवा स्टार न्यूजवर काही मानसोपचार तज्ज्ञ याच विषयावर अभ्यासपूर्ण चर्चा करत होते] तर तिचे आपण स्वागतच केले पाहिजे.
धूम्रपान, दारूसेवन, गुटखा दुष्परिणाम, वेश्यागमन आणि एड्स प्रतिबंधक साधने वापरणे.....आदीच्या जाहिरांतीवर सरकारने गेल्या काही वर्षात करोडो रुपये खर्च केले होते. सुरुवातीच्या काळात 'ही निष्कारण केली जाणारी जनतेच्या पैशाची उधळपट्टीच होय, कारण जाहिरात वाचून कुणी सिगारेट, मद्य, वेश्यागमन सोडणार नाहीत...' असे निगेटिव्ह छटेचे उद्गार एका गटाने काढले होतेच. पण आज परिस्थिती अशी आहे की चांगल्या प्रमाणात वरील व्यसनांविषयी लोकजागृती निर्माण झाली आहे....विशेषतः गुटखा आणि एडस होऊ नये याबाबतची खबरदारी.
नवी दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीत ती गर्हणीय घटना घडली म्हणूनच तिला देशभर प्रसिद्धी मिळाली हे जरी सत्य असले तरी निदान त्यामुळे का होईना स्त्रियांच्या सुरक्षिततेविषयी व्यापक प्रमाणावर सरकार सोय उपलब्ध करून देण्यास तयार झाले आहे हे चित्र आपण नकारात्मक मानू नये.
बाकी तुमच्या धाग्यातील मजकुरातील "...पण ज्या पिडीत मुलीन्ना अशी पब्लीसिटी नाही मिळाली त्यान्च काय...." हे वाक्य नीटसे समजले नाही. पिडित मुलीना पब्लिसिटी म्हणजे नेमके काय म्हणायचे आहे ? याचा बोध होत नाही.
अशोक पाटील
>>पण ज्या पिडीत मुलीन्ना अशी
>>पण ज्या पिडीत मुलीन्ना अशी पब्लीसिटी नाही मिळाली त्यान्च काय....>><<
बहुतेक असा अर्थ असेल की, ज्यांचा आवाजच पोचला नाही अश्या घटना त्यांच्याबरोबर झाल्यावर... ज्यांची नोंद घेतली गेलीच नाही त्यांचे काय?
आत्ताच कशी काय जाग आली जनतेला
आत्ताच कशी काय जाग आली जनतेला >>>>>>>>> What do you mean ????
सदैव निद्रिस्तच रहावे म्हणताय का? कुठल्याच घटनेने विचलित व्हायचे नाही. दुर्लक्ष करायचे... जोपर्यंत आपल्या अंगाला माती लागत नाही तोपर्यंत पर्वा नको कशाची ... :रागः

दीडशे वर्षांनीच का हाकलले आपण ब्रिटिशांना त्याआधी किंवा नंतर का नाही?
एक क्षण येतो जागृतीचा ... तरच क्रांती होती. त्यासाठी एक साधी ठिणगीही पुरते.
याआधी बलात्कार झालेत ना. पण एवढा निर्घृण बलात्कार ... की ज्यात ती स्त्री नंतर नॉर्मल आयुष्य कधीच जगु शकणार नाही. आयुष्यभर पलंगावर लोळा गोळा होऊन पडेल किंवा शानबागांसारखे कोमात राहिल ..फक्त जिवंत प्रेत.
अशोक काका म्हण्ताय त्याचे पण उत्तर नक्की द्या. पब्लिसिटी ??? अरे देवा ! धन्य आहे.
आतासुद्धा आपण कायदे कडक करण्यासाठी देश हलवला नाही तर उद्या आपल्या मुली बाळींना दिवसाढवळ्या सुद्धा बाहेर पाठवता येणार नाही.
जाग आली हे काय कमी आहे का?
जाग आली हे काय कमी आहे का?
कल्याणी, तुझे शब्द चुकले
कल्याणी, तुझे शब्द चुकले आहेत, पण भावना पोहोचल्या. न्युजपेपरमधे अॅवरेज एकतरी रेपची बातमी असतेच. आज दोन आहेत.
त्यातली एक मुलगी तर १३ वर्षांची आणि अंध आहे. ज्या अंधशाळेत ती शिकते, तिथल्याच सिक्युरीटीने हे कृत्य केलं होतं आणि आता ती ८.५ महिन्यांची प्रेग्नंट आहे. रेपनंतर किंवा ती प्रेग. आहे कळल्यानंतरही तिचे आई-वडिल गप्प राहिले होते. का कोणास ठावुक? आणि मग आताच का जागे झाले? याचं कारण दिल्ली घटनेच्या प्रसिद्धीशी असु शकते. कदाचित सध्याच्या दिल्लीच्या बातमीमुळे त्यांची पुढे येवुन तक्रार करण्याची हिंमत दाखवली असेल. किती तरी दाबुन ठेवलेल्या अशा केसेस कदाचित या न्युज हाइपमुळे उघड होतील. अशा बातम्यांना प्रसिद्धी देणं चुक की बरोबर हा चर्चेचा विषय आहे, पण त्यामुळे जनजागृती नक्कीच होते. उपायांवर चर्चा होते. मुली/स्त्रिया जास्त सतर्क होतात, त्यामुळे प्रकरण दाबुन ठेवण्यापेक्षा ते उघड झालं तर पुढच्यास ठेच मागचा शहाणा तरी होइल.
असे दु:ख होणे योग्य आहे. इतके
असे दु:ख होणे योग्य आहे. इतके दिवस का नाहि घडले काहि हा त्रागा पण बरोबर आहे. पण आता तरि घडतेय ना. पापाचे घडे भरल्याशिवाय देव सुद्धा अवतार घेत नाहित.
त्यातहि आणि मिडिया ठरवेल ति दिशा असते. कारण आपण इतर जनता आंधळ्यान्नी हत्तिचे वर्णन करावे तशि चाचपडत असते. एखाद्या बातमिचा पूर्ण व्यु मिडियाकडेच असतो. त्याला महत्व द्यायचे की नाहि हे तेच ठरवतात.
अण्णा हजारे इतकि वर्षे काम करतायत आत्ताच का फेमस झाले?
आणि आजची जनता लढे द्यायला तयार आहे फक्त त्यान्ना दिशा मिळत नाही. ती मिडियानि दिलि कि ते लावून धरतात. चांगलेच आहे की हे.
प्रिन्सेस +१
साती अगदि बरोबर. कुणाच्या लाठिने का होईना साप मरावा.
बहुतेक असा अर्थ असेल की,
बहुतेक असा अर्थ असेल की, ज्यांचा आवाजच पोचला नाही अश्या घटना त्यांच्याबरोबर झाल्यावर... ज्यांची नोंद घेतली गेलीच नाही त्यांचे काय?>>> हेच म्हणायचय मला.
प्रिंसेस, मला काय म्हणायच आहे हे कदाचित तुमच्यापर्यंत मला नीट पोहचवता नाही आलय.
जाग आली जाग आली ,म्हणजे नक्की काय झालं सांगा ना?? प्रसारमाध्यमातून, संकेतस्थळांवरून येणार्या या प्रतीक्रिया तुम्हाला खरच इतक्या प्रभावी वाटतात?? अशा तर्हेनी व्यक्त होऊन कायदा बदलेलही कदचित.. तसं झालं तर मला नक्कीच आनंद होईल..
राहीला प्रश्न 'पब्लीसीटी' चा. तुम्हाला जर तो शब्द पटला नसेल तर माफ करा.
मनिमाउ.. भावना अनावर झाल्या म्हणून कदाचित शब्द चुकले.
''out of sight isout of mind'' ही जी समाजाची मानसिकता आहे.. त्याविश्यी मी बोलते आहे.
अण्णा हजारे फेमस झाले.. exactly. पन त्याचा उपयोग काय झाला??
<<<आत्ताच कशी काय जाग आली
<<<आत्ताच कशी काय जाग आली जनतेला>>>
जाग आली जाग आली ,म्हणजे नक्की काय झालं सांगा ना?? >>> जाग आली हे तुझेच शब्द आहेत ना?
तूच सांग जाग आली म्हणजे तुला काय म्हणायचे होते.
मला माहिती नाही ऑनलाईन प्रतिक्रिया किती प्रभावी असतात. पण माझ्या हातात जे आहे ते सध्या ऑनलाईन माध्यमच आहे. तर मी तिथेच जागृती करण्याचा प्रयत्न करणार.
बरे हे सगळे करुन काहीच होणार नाही तर मग सांग की काय केल्याने बदल होईल?
तुझ्या काय आईडियाज आहेत? फक्त अजुन एक रेप झाला असे म्हणुन सोडुन द्यायचे का?
या सर्व उद्रेकाचा उपयोग
या सर्व उद्रेकाचा उपयोग सरकारवर दबाव आणुन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरता होणार असेल तर ठीक आहे अन्यथा हे म्हणजे नुसते मोर्चे काढा, नारेबाजी करा आणि चॅनेल्सवाले येऊन त्यांचा टीआरपी वाढवणार, तसेच सोशल मेडिया (फेसबुक, इ.) मधे खुप काही लिहिले की स्वतःचा टीआरपी वाढणार.
आजकालच्या तरूण टेक्नोसॅव्ही पिढीला हे मार्ग जरी सोपे वाटत असले तरी फक्त अशा मार्गांनी जाऊन क्रांती होऊ शकत नाही. हे सर्व करणार्या जनतेने रोजच्या आयुष्यात साध्या सोप्या गोष्टी अवलंबल्या तर फार मोठा बदल होऊ शकेल. उदा. आपल्या आजुबाजुला जर काही दुर्घटना घडत असेल तर ती रोखण्यासाठी जमेल तेवढा प्रयत्न करणे, कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला उत्तेजन न देणे, इ.
पुर्वी पोलिसांचे खबरी लोकांशी चांगले संधान असायचे आणि मोठे जाळे असायचे, ते खुप मोठ्या प्रमाणावर कमकुवत झाले आहे गेल्या अनेक वर्षांत (एका पोलिस अधिकार्याने मुलाखतीत हे सांगितले होते).
एकतर असे जाळे पुन्हा मोठ्या प्रमाणावर कार्यरत केले गेले पाहिजे. तसेच पोलिस यंत्रणेला एक समांतर यंत्रणा उभी केली गेली पाहिजे, उदा. युवक युवतींचे गट करून त्यांना विशिष्ट आयडेंटिफिकेशन देऊन गस्त घालणे, आपापल्या विभागावर करडी नजर ठेवणे, आणि जर काही घडले तर गुन्हेगार व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देणे, अपघातग्रस्त व्यक्तीला सर्व प्रकारची मदत करणे, इ. कामांचे अधिकार दिले जावेत. आणि या बदल्यात त्यांना काही मोबदला मिळावा. काही विशेष सवलती मिळाव्यात (उदा. प्रवासात सवलती, कमी दरात सिनेमाची तिकिटे, इ.) आणि हे काम काही ठराविक मर्यादित काळापुरते असावे. नंतर पुढची तरूण पिढी त्यामधे येऊ शकेल, असा फ्लो असावा. हे जर झाले तर अनेक गोष्टींना जरब बसु शकेल. आणि तरूण पिढी भलत्या सलत्या मार्गाला जाणार नाही.
महेशजी.. धन्यवाद. मला जे नीट
महेशजी.. धन्यवाद. मला जे नीट नाही सांगता आलं ते तुम्ही एक्साक्ट मांडलय.
प्रिंसेस.. 'जाग आली' हे मी उपहासानी म्हटल आहे.
फक्त अजुन एक रेप झाला असे म्हणुन सोडुन द्यायचे का? >>>> इतका इंसेंसीटीव विचार असेल मझ्या म्हणण्यामागे असं तुला वाटत असेल तर मी काय बोलू?
आजकालच्या तरूण टेक्नोसॅव्ही पिढीला हे मार्ग जरी सोपे वाटत असले तरी फक्त अशा मार्गांनी जाऊन क्रांती होऊ शकत नाही. हे सर्व करणार्या जनतेने रोजच्या आयुष्यात साध्या सोप्या गोष्टी अवलंबल्या तर फार मोठा बदल होऊ शकेल. उदा. आपल्या आजुबाजुला जर काही दुर्घटना घडत असेल तर ती रोखण्यासाठी जमेल तेवढा प्रयत्न करणे, कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराला उत्तेजन न देणे, इ.>>>>> महेशजींनी हे जे म्हणल आहे.. thats what i want to say.
मला माहिती नाही ऑनलाईन प्रतिक्रिया किती प्रभावी असतात. पण माझ्या हातात जे आहे ते सध्या ऑनलाईन माध्यमच आहे. तर मी तिथेच जागृती करण्याचा प्रयत्न करणार.>>>> तुला जागृती कराविशी वाटते हे उत्त्मच आहे. पण आंतरजाल या माध्यमाला आजची तरूण पिढी जास्त करून मनोरंजन हाच central view pt म्हणून वापर करते.. ह्याला अर्थात अपवाद आहेत्च.. पण अगदी कमी!!
मला काय वाटतं .. पुढच्या पोस्ट मधे नीट मांड्ते.
कल्याणी आता समजतय तुला काय
कल्याणी आता समजतय तुला काय म्हणायचे आहे. पण हेडर मध्ये तुला नीट व्यक्त करता आलेले नाहीये- निश्चितच.... पुढच्या पोस्ट ची वाट पाहते आहे.
याआधी बलात्कार झालेत ना. पण
याआधी बलात्कार झालेत ना. पण एवढा निर्घृण बलात्कार ... की ज्यात ती स्त्री नंतर नॉर्मल आयुष्य कधीच जगु शकणार नाही. आयुष्यभर पलंगावर लोळा गोळा होऊन पडेल किंवा शानबागांसारखे कोमात राहिल ..फक्त जिवंत प्रेत.>>>>>>>> बलात्कारामध्ये कमी किंवा जास्त निर्घ्रुण अशी मापक कशी लावू शकतेस प्रिंसेस??? अल्पवयीन मुलींवर होतो तो कमी असतो का?? किंवा एकानेच केला म्हणून विचलीत नाही झालो तरी चालतं??
कायदे आधी पण होतेच की!! आत्ताही आहेत! पण धनंजय चॅटर्जी सारखं .. जर दशक लोटून गेल्यावर शिक्षा झाली तर काय अर्थ त्याला???
हे बदलायच असेल तर केवळ कायदा बदलून किंवा कडक करून चालणार नाही.. शिक्षेची अंमलबजावणीही लगेच झाली पाहिजे. तरच काही वचक राहील.
मुलांचा मुलींकडे बघ्ण्याचा द्रुष्टीकोन बदलणही गरजेच आहे.. गुन्हेगाराना शिक्षा द्या, या मगणी, जाग्रुतीइतकच हेही प्रबोधन गरजेच नाही का?? नाहीतर आज या चौघाना शिक्षा झाली.. या आनंदात आपण असताना अजुन अशी घटना घडेल अन परत आपण सगळे क्रांती ची वाट बघू.
मुळात शिक्षा किंवा कायदा.. यापेक्षा अशा घटना न घडू देण महत्वाच नाही का??
धन्यवाद प्रिंसेस.. समजुन
धन्यवाद प्रिंसेस.. समजुन घेतल्या बद्दल. अति आवेगात लिहिल्यानी शब्द चुकलेत!!!
कमी किंवा जास्त निर्घृणचा
कमी किंवा जास्त निर्घृणचा प्रश्न नाहीचे मुळी. सगळे बलात्कार तितकेच वाईट आणि तितकेच उध्वस्त करणारे.
पण या केसमधली मुलगी कधीच जेवु शकणार नाहीये, कधीच नॉर्मल होऊ शकणार नाहीये, सदैव नळ्या लावुन ठेवाव्या लागणार आहेत.
बलात्कार करुन सोडुन दिले असते तर घरच्यांच्या आधाराने, तिच्या मित्राच्या आधाराने परत नवीन आयुष्य सुरु करु शकली असती. पण आता असे काहीच होऊ शकणार नाहीये. कालची दुसर्या बीबी वरची योडीची पोस्ट वाचलीस का? हे किती जास्त भयंकर आहे याचा अंदाज लावणे कठीण
बलात्कार करुन सोडुन दिले असते
बलात्कार करुन सोडुन दिले असते तर घरच्यांच्या आधाराने, तिच्या मित्राच्या आधाराने परत नवीन आयुष्य सुरु करु शकली असती. पण आता असे काहीच होऊ शकणार नाहीये. कालची दुसर्या बीबी वरची योडीची पोस्ट वाचलीस का? हे किती जास्त भयंकर आहे याचा अंदाज लावणे कठीण अरेरे......खरे आहे हे............कल्याणी , हा नुसताच बलात्कार नव्हता.... नुसती वासना पण नव्हती...अतिशय किळसवाणा प्रकारची विकृती होती..ज्यामुळे..सगळा देश भडकला आहे....
स्मीतूताई, याबाबत मी तुझ्याशी
स्मीतूताई, याबाबत मी तुझ्याशी अन प्रिंसेसशी सहमत आहेच!
मुळात शिक्षा किंवा कायदा..
मुळात शिक्षा किंवा कायदा.. यापेक्षा अशा घटना न घडू देण महत्वाच नाही का?? >>> यासाथी काय करायला हवे?
मला तुझा नेमका विरोध कशाला आहे आणि सहमती कशासाठी आहे ते कळत नाहीये.
मी कल्याणी शांतपणे तुला काय
मी कल्याणी
शांतपणे तुला काय म्हणायचंय याचा एकदा विचार कर आणि एकदाच तुजे म्हणणे मांड. माझ्या मते तुला हे सर्व त्या दुस-या बाफवरही मांडता आले असते.
या घटनेत विक्रुतीच होती अन
या घटनेत विक्रुतीच होती अन त्यावर पेटून उठलच पाहिजे! यात दुमत नाही. पण आपल्याला पेटून उठायला इतकी जास्त वाईट घटना घडावी लागते... जवळपास रोज असे गुन्हे घडतात तेव्हा का आपण भडकत नाही?? ही एका बदलाची सुरुवात म्हणावी तर हे सगळी चीड, संताप.. काही काळानी इतका थंडावतो की त्याचा मागमुसही रहात नाही.
बरं यावर उपाय काय.. तर कायदा! पण कायद्याचा धाक असता तर आज ही घटना घडलीच नसती ना?
मानसिकता बदलायला हवी अस मला वाटत गं.
मुलींकडे बघण्याचा द्रुष्टीकोन 'युज अअँड थ्रो' असा जर असेल तर हेच घडत रहाणार ना!
आजच्या काळात 'नकार ' पचवण्याची गरजच जर तरुणाना वाटत नसेल तर कसं चालेल. मुलगी नाही म्हणाते का.. करा रेप.. टाका मारून.. ही मानसिकता सगळ्यात घातक नाही का?? पोकळ पुरुषार्थ गाजवायला स्त्रीचा वापर करण्याची जर मानसिकता असेल... (अगदी रेप सारखी मोठी गोष्ट सोडा.. शाळेतल्या मुलांना गर्लफ्रेंड?) तर कायदा कितपत उपयोगी ठरेल.
तसच योग्य वयात शास्त्रीय लैगिक शिक्षण दिल्याने, केवळ कुतुहल किंवा गंमत म्हणून होणार्या अशा गोष्टी टळायला मदत होइल.
मी कदाचित जरा जास्त विचार
मी कदाचित जरा जास्त विचार करतेय..... तो ही पेसिमिस्टीक!!!!
अरेच्चा! मी इथे न
अरेच्चा!
मी इथे न डोकावल्यामुळे बरीच चांगली चर्चा होऊन गेलेली दिसतेय!
@मी कल्याणी चला उशिरा का
@मी कल्याणी
चला उशिरा का होईना तुम्हाला जाग आली तर!
बलात्कारी-खूनींना राष्ट्रपतींनीत्यांच्या अधिकारात जिवदान दिले त्याअधी [ बलात्कारी-खूनींनी दयेचा अर्ज केल्याकेल्या] ही जाग आली असती तर कांहीतरी वचक बसला असता.
आता यांना फाशीच्या शिक्षेची मागणी करताहात तर त्याबरोबरच ती कोणीही माफ करू शकणार नाही अशी तरतूद करून घ्या. नाहीतर पुन्हा 'बैल गेला आणी झापा केला' असा प्रकार होईल.
वेळीच मागणी करा.
खुपच वायीट बातमी. आता कुठे
खुपच वायीट बातमी. आता कुठे गेले सत्यमेव जयते वाले. चार भिंतीच्या आत A/c स्टुडीओ मधे चर्चा करने सोपे असते. एकादा Study Report, Short film दा़खवायची त्यासाठी एखाद्या पीडीत व्यक्तींचा आधार घ्यायचा आणि TRP वाढवायची नाहीतर चित्रपटाचे प्रमोशन करायचे. आपण जागे व्हायला पाहीजे.
मी भास्कर यांना +१
मी भास्कर यांना +१
भास्कर, तुम्हाला नमकं काय
भास्कर, तुम्हाला नमकं काय सांगायचय??? शिक्षा किंवा कायदा .. माझ म्हणणं याविषयी नसून ही आंदोलनं, प्रतीसाद यासगळ्यांचा दुरोगामी परिणाम दिसावे यासाठी आहे....
इब्लीस... होतास कुठे इतके दिवस?
नितीन्जी.. हेच तर मला पण
नितीन्जी.. हेच तर मला पण सुचवायच आहे...
धोनीच्या टीम यंगिस्ताननी
धोनीच्या टीम यंगिस्ताननी विश्वकरंडक जिंकून भारताच्या मुकुटावर मानाचा तुरा खोचाला म्हणून कॉतुक सर्वंनी केले/करायलाच हवे
हे सत्य. पण, खटकली ती बीसीसीआयची पद्धत.उत्तराखंडात अपरिमित हानि झाली आणि लाखो परिअजनांवर अन्न्यसाधारण
आपत्ति कोसळली या पार्श्वभूमिवर पुन्रर्वसनाचा डोंगर सावरायला अमाप खर्च दिसत असताना बीसीसीआय नी प्रत्येक
खेळाडूला एक करोड आणि चमुच्या मदतनिसाला प्रत्येकी पन्नास लाखाचे बक्शिश देऊन विजेत्यांच्या गॉरवाला
गालबोटच लावल अस म्हाणायला हव.
माझ्या मते सर्वांना विश्वासात घेऊन तो संपूर्ण निधि आपत्ति व्यवस्थापनाला/पुनर्वसनाला दान केला असता तर
भारताच्या मुकुटाला तो तुरा जास्त शोभला असता.
सर्व खेळाडू एरवी श्रिमंत आहेत ते मनानीही अधिक श्रिमंत आहेत;अजून वेळ गेलेली नाही.
देशाचा ,विश्वाचा,आणि माणुसकीचा खरा परिचय होईल कि लागेल गालबोट ?
(No subject)
http://www.indianexpress.com/
http://www.indianexpress.com/news/long-walk-to-justice/1138514/0
मी कल्याणी, >> की सामान्य
मी कल्याणी,
>> की सामान्य जनता सुद्धा फक्त मिडियानी उजेडात आणलेल्या .. रॅदर उचलून धरलेल्याच गुन्ह्यान्चा निषेध
>> करणार काय..................
दुर्दैवाने उत्तर होय असं आहे. टीव्हीवर दाखवल्याखेरीज कुठलंही प्रकरण गांभीर्याने न घेणारे कोट्यावधी लोक या भारतभूमीत (व इतरत्रही) आहेत.
आजचीच बातमी पहा : दिल्ली गँगरेप: दोषींचा वकील बरळला
'पूज्य आसारामबापूंनी निर्भयाला दोष दिला' असं धडधडीत असत्य वृत्त वारंवार प्रदर्शित करणार्या वाहिन्या वरील बातमीबाबत थंडपणे बसून राहिल्यात. मायबोलीवरील तथाकथित पुरोगामी सदस्यांना या एपी सिंहाचा निषेध करावासा वाटला नाही. पण पूज्य आसारामबापूंच्या बाबतीत बातमीची खातरजमा न करता सगळे झोडपून काढत सुटले होते.
माध्यमांनी उठाव न दिलेल्या गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करणं एकवेळ समजू शकतं. पण माध्यमांनी दाखवलेलं सगळं खरं धरून चालणं, हे अनाकलनीय व असंवेदनाशील आहे.
आ.न.,
-गा.पै.