पुणे ब्रॉड्बँण्ड सर्व्हिस प्रोव्हायडर

Submitted by DeepSea on 19 December, 2012 - 06:24

एमटीएनएलचे प्लॅन चांगले आहेत पण कस्टमर सर्व्हिस बेकार आहे. त्यांचे नेट बरेच वेळा बंद असते.
मला Unlimited usage, fast download speed and reliable broadband हवा आहे. (work from home साठी). यामुळे मला ईंटरनेटसाठी काही ईतर ऑप्शन्स आहेत का याची माहीती हवी होती.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा, पण पुण्यात एमटीएनएल ची सेवा नाही. बीएसएनएल मिळेल. अनलिमिटेड प्लॅन्स ४९९/- प्रतीमाह पासून सुरू होतात. अधिक माहीती - http://www.bsnl.co.in/

आता ऑफिसात ओपन होत नाहिये... घरी गेल्यावर बरोबर लिंक देतो.
अजून एक, बीएसएनएल ला PPPoE असल्याने पीएसटीन लाईन/ टेलीफोन लाईन घ्यावी लागते.

टाटा फोटॉन बद्दल अनुमोदन. वायर्ड मध्ये 'तिकोना' अजिबात घेऊ नका. मी हडपसर मध्ये वापरलेय, अतिशय वाईट अनुभव आहे.

हडपसर मध्ये''रिलायंसचा' अतिशय चांगला अनुभव आहे. टाटा ब्रॉडबँडचा पण माझ्या मित्रांना चांगले अनुभव आलेत. 'एअरटेल' चे फार नाव ऐकून आहे, पण कुणी माहितीतील वापरले नसल्याने सांगू शकत नाही.

नवीन आलेले 'You' ब्रॉडबँड कुणी वापरले असेल तर अनुभव लिहा.

BSNL उत्तमच आहे, काही शंकाच नाही.

You Telecom पण चांगले आहे. एकदाही बंद पडत नाही कि काही नाही... एकदम मस्त सर्विस.

या आधी BSNL होते. त्याचा तोटा म्हणजे तुम्हाला जर प्लॅन बदलायचा असेल तर १ महिना थांबावे लागेत.

यू टेलिकॉम मधे तुम्हाला हवे तेव्हा हवे तेवढे रिचार्ज करुन वापरु शकता.....

वर्षभर पुण्यात बीएसएनएल वापरले आहे. वायरलेस राउटर सकट. काहीच प्रॉब्लेम नाही. एक दोन वेळा बंद पडले, ते सुद्धा एक दोन तासात फिक्स झाले.

एक शंका, माझ्याकडे फोटॉन+ आहे. २ वर्षांपूर्वी घेतलेले आणि त्यावेळी 3G नव्हते. आत्ता नवीन डिव्हाइस घ्यायचे असल्यास जुने परत करुन नवीन मिळते की नवीन आणि जुने, दोन्ही असतील माझ्याकडे?

आभुली,

मी ज्या कंपनीत अमेरिकेत काम करत होतो त्याच कंपनीबरोबर तेच काम इथे भारतात बसुन VPN ला कनेक्ट करुन करतो.

माझे घर मुंबई मधे आहे... पुण्याला शिफ्ट होणार आहे... त्या मुळे चुकून एमटीएनएल लिहील.
मी ज्या कंपनीत अमेरिकेत काम करत होतो त्याच कंपनीबरोबर तेच काम इथे भारतात बसुन VPN ला कनेक्ट करुन करतो.>>> +१ माझी कंपनी uk आहे.

गेल्या साडे चार वर्षापासून बीएसएनएल वपर्तो आहे.उत्तम सेवा अहे.पुण्यात तोच सर्वोत्तम सर्विस प्रोवायडर आहे असे माझे मत आहे.कधिही कोणताही प्रोब्लेम आला नाही.भरपूर प्लान्स आहेत.वर कोणीतरी म्हटअले आहे की प्लन बदलायला १ महिना घेतात सध्या तरी असे काही नाही, काही तासाभरतच चेंज होतो.

thank u mansmi,
i thought u do work from home that pays you .i want that information.there are many online ad's come but are the reliable?

पिंपळे सौदागर मध्ये रिलायंस ब्रॉडबँडची सेवा उपलब्ध आहे काय? असल्यास कशी आहे सुविधा? मी सध्या रिलायंसचा विचार करतोय, फोटॉनची दमछाक होतेय भरपूर डाऊनलोड करताना.

माझ्याकडे इथे [कोल्हापूर] सुरुवातीला टाटा फोटॉन होते. पण कनेक्शन आणि रीकनेक्शन इतक्या वेळाने होत असे की मोडेम काढून फेकावे असे वाटत गेले. मग पुढे "एमटीएस" या भागात चांगले बस्तान बसविल्यावर त्यांचा प्लॅन घेतला. सोयीचा होताच पण कनेक्टिव्हिटी अतिशय वेगवान... मध्ये एकदाही डिसकनेक्ट होत नसे. स्थानिक सेवाही खूप चांगल्या प्रकारची.

पण स्पेक्ट्रम घोटाळ्यानंतर परवा परवा सुप्रीम कोर्टाने नव्याने ज्या निविदा मागविल्या त्यामध्ये 'एमटीएस' चे महाराष्ट्रा आणि गोवा या दोन राज्यांचे कव्हरेज रद्द झाले. १० एप्रिलपासून एमटीएस या राज्यातून आपला गाशा गुंडाळणार. त्या मॅनेजमेन्टचे आम्हा सर्व ग्राहकांना दिलगिरी व्यक्त करणारे ई-मेल आले.... म्हणजे संपलेच.

काल बीएसएनएलचे फॉर्म्स आणले....आता हे कर्मचारी कनेक्शनसाठी किती नखरे करतील तेच पाहायचे.

आता हे कर्मचारी कनेक्शनसाठी किती नखरे करतील तेच पाहायचे.
<<
शून्य नखरे!
भयंकर सुधारणा आहे. फॉर्म भरा अन इथे अनुभव लिहा.

जरूर डॉक्टर..... सोमवारी ते काम करीत आहे.... मलाही माझा तर्क खोटा निघाल्यास आनंदच होईल हे निश्चित.