श्रवणयंत्र

Submitted by स्वाती२ on 12 December, 2012 - 08:29

माझ्या बाबांना नवीन श्रवणयंत्र घ्यायचे आहे. त्यासाठी ठाण्यातील डॉक्टर्सची नावे सुचवाल का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वातीताई,
हियरिंग एड डिस्पेन्सिंग टेक्निशियन्स करतात. पण आधी कर्णनासगलशल्यचिकित्सकांकडून (ई.एन.टी. सर्जन) ऑडिओग्राम नामक तपासणी करून घ्या. त्यांना मशिनची गरज आहे का हे ठरवू देत, नंतरच, ते सांगतील तिथून कर्णयंत्र विकत घ्या. हे म्हणजे चष्म्याचा नंबर कसा आपण डॉ. कडून घेतो अन मग चष्मा आणतो तसं. डायरेक्ट दुकानातही नंबर काढून चष्मा देतात पण ते बरोबर नाही. आधी तुम्हाला नंबरची गरज आहे का, हे डॉ.ना ठरवू देणे चांगले.

हा कानाचा दागिना भयंकर महाग असू शकतो. लपलेले कर्णयंत्र लाखात जाते. पण आजकालच्या मोबाईलचे बोंडुक कानाला लावून फिरण्याच्या जमान्यात बाहेर दिसणारे डिजिटल यंत्र हा इकॉनॉमिक पर्याय वापरायला हरकत नाही.

(कर्णनासगलशल्यचिकित्सक हे किचकट्ट मराठी ट्रान्सलेशन मला लै आवडते Wink )

धन्यवाद इब्लिस.
माझे बाबा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गेली २-३ वर्ष श्रवणयंत्र वापरतात. त्यांना आता नविन यंत्र घ्यायचे आहे. आधीचे यंत्र ज्या डॉक्टरांक्डून घेतले त्यांच्याकडे एकाच टाइपचे श्रवणयंत्र मिळते. म्हणून ते आता नविन डॉक्टरांच्या शोधात आहेत.

डोम्बिवली मध्ये Dr. Vaishali Navre म्हणून आहेत. अजून काम झाले नसेल तर तिथे चेक करा. Siemens चे Hearing Aids चान्गले असतात. Normally Siemens authorised dealers असतात.

स्वाती२, ठाण्यातले उत्तम इएनटी डॉक्टर;
डॉ. उप्पल - पाचपाखाडी, ठाणे महानगर पालिकेच्या समोर
डॉ. भुमकर - गोखले रोड
डॉ. अमित प्रधान - खोपट (यांचा इथे होरायझन हॉस्पिटलचा पत्ता दिला असला तरी खोपटला कलिकादर्शन सोसायटीत खाजगी क्लिनिक आहे.)

डॉ उप्पल भन्नाट दिसतात. याच आठवड्यात त्यांनी केलेल्या एका ऑपरेशनची बातमी वाचली. ऐकू येत नसल्याने मूकही असलेल्या अर्भकाच्या कानामागे अत्यन्त रिस्की व नवीनच ऑपरेशन यशस्वी केल्याने त्या बालकाला ऐकू आणि बोलताही येणार आहे.

डॉ उप्पल भन्नाट दिसतात. याच आठवड्यात त्यांनी केलेल्या एका ऑपरेशनची बातमी वाचली. ऐकू येत नसल्याने मूकही असलेल्या अर्भकाच्या कानामागे अत्यन्त रिस्की व नवीनच ऑपरेशन यशस्वी केल्याने त्या बालकाला ऐकू आणि बोलताही येणार आहे.>> दोन वर्षांची मुलगी आहे.