बाळंतपणासाठी भारतातून कोणत्या गोष्टी आणाव्या लागतात?

Submitted by शमा on 10 December, 2012 - 19:19

नमस्कार,
बाळंतपणानंतर बाळासाठी आणि बाळंतिणीसाठी कोणत्या गोष्टी भारतातून आणणे गरजेचे आहे? माझी आई december च्या शेवटच्या आठवड्यात इकडे येत आहे ( बे एरिया ). तिला महत्वाच्या गोष्टींची लिस्ट करून द्यायची आहे. इथल्या अनुभवी लोकांनी मार्गदर्शन केले तर खूप मोठी मदत होईल. धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाळंतिणीसाठी डिंकाचे इ. लाडू करायचे झाल्यास खारकेची पावडर आणावी लागेल.
फीडिंग गाउन्स वापरणार असाल तर ते सांगा.
बाळासाठी टोपडी. (इथे टोप्या मिळतात त्यांना बांधायला नाड्या नसतात त्यामुळे सारख्या पडतात.)
वापरून मऊ झालेल्या सुती साड्यांची दुपटी शिवून आणली तर बाळाला गुंडाळायला फार उपयोगी पडतात.

बाकी तिथल्या कपड्यांचा इथे फारसा उपयोग होत नाही. डिसेंबरात (थंडीत) तर अजिबातच नाही.
तुम्हाला पोटपट्टा बांधायचा तरी इथे बेबीज-आर-असमधे चांगले प्रकार आहेत. बाळाला नाळ पडून जाईपर्यंत पोट बांधायचे नसते तेव्हा त्यालाही पोटपट्टे नकोत.

इथे न्यू जर्सीत मला डिंक, अळीव, शोपा, वावडिंग हे मिळालं. तुमच्याकडे इन्डियन ग्रोसरी शॉप्समधे काय आहे/नाही बघा. गुटी वगैरे देणार असाल तर त्या मुळौषधी लागतील. तुम्ही शतावरी घेणार असाल तर ती लागेल. वेखंडाची पूड मला इथे मिळाली नव्हती.
बाळाला अंगाला लावायला इन्डियन ग्रोसरीत मिळणारे बदामाचे तेल वापरले.

बारसे पारंपारिक पद्धतीने करणार असाल तर कुंची लागेल, तसंच जिवती वगैरे घालणार असाल तर ती.

तुम्हाला शुभेच्छा! Happy