Submitted by टकाटक on 29 November, 2012 - 01:38
चेह-यावरचे चामखीळ काढायचे औषध कुठे मिळेल ? आयर्वेदीक असल्यास उत्तम कारण त्याने काही साईड ईफेक्ट होणार नाही.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्वचातज्ज्ञांना भेटा.
त्वचातज्ज्ञांना भेटा. आयुर्वेदीक उपचारही होऊ शकतात. मेडिकल मध्ये व वरुन सुरु होणारे एक औषध मिळते पण डॉ. च्या सल्ल्याशिवाय असले काहीही चेहर्याला लावायची जोखीम घेऊ नका.
एक औषध आहे. "वार्टोसिन "
एक औषध आहे. "वार्टोसिन " माझ्या नवर्याने माने वरच्या चामखीळी साठी वापरले होते. पण त्याने जळजळ झाली थोडी. चामखीळ मात्र गेला. तसेच चामखीळ डोळ्या जवळ असेल तर मात्र नको.
यासाठी लेझर ट्रीटमेंट घ्यावी
यासाठी लेझर ट्रीटमेंट घ्यावी लागते. त्वचा तज्ञ सांगतीलच.
हे औषध कोणत्याही मेडिकल मधे
हे औषध कोणत्याही मेडिकल मधे मिळते. सुरुवातीला लाल सर दिसत होते. ३/४ दिवसात नोर्मल त्वचा झाली.
माझ्या एका भाचीचे {वय वर्षे
माझ्या एका भाचीचे {वय वर्षे १३} चामखिळ 'लेझर ट्रीटमेन्ट' ने काढले होते. उजवा गाल आणि कान यांच्यामध्ये एक जिर्यासम लहान व एक जवळपास गव्हाएवढे चामखिळ होते तर तिसरे मानेवर होते.
आयुर्वेदिकचे डोक्यात होते, पण ज्या दोघाचौघांना सल्ला विचारला त्यानी त्या प्रक्रियेच्या यशस्वीततेबाबत साशंकता व्यक्त केल्याने थेट आमच्या कोल्हापूरातील त्वचातज्ज्ञ डॉक्टरांच्याकडूनच ट्रीटमेन्ट करून घेतली. लेडी डॉक्टर असल्याने भाचीनेही काही खळखळ केली नाही. छानपैकी सर्वकाही झाले. पण चामखिळी गेल्यानंतरची जागा साधारणतः दोन-तीन आठवडे काळसर झाल्याचे दिसत होते. त्यावर मग स्थानिक ब्युटिशिअन्सकडे आठवड्याला एक या प्रमाणे तिच्या ५ सिटिंग्ज झाल्या.
आता सर्व काही नॉर्मल आहे. चेहरा स्वच्छ आणि डागविरहीत झाल्याने तिच्यातही चांगलाच आत्मविश्वास आल्याचे जाणवत आहे.
[काहीसे अवांतर : 'लेझर ट्रीटमेन्ट' च्या अगोदर डॉक्टर मॅडमनी माझ्या भाचीचे वजन चेक केले होते....ते कशासाठी हे आमच्यापैकी कुणीच विचारले नाही. वजनाचा आणि अशा ट्रीटमेन्टचा काही संबंध असू शकतो असे मात्र आता वाटते.]
अशोक पाटील
पोडोफायलीन (२०%) हे औषध यावर
पोडोफायलीन (२०%) हे औषध यावर उपयुक्त आहे. मात्र लावण्याअधी चामखिळीच्या आजुबाजुची त्वचा व्हॅसलीन लावून संरक्षित करावी लागते.
रोज २ वेळा पोडोफायलीन साधारणता ८-१० दिवस लावल्यावर चामखीळ कायमची जाते व डागही फारसा दिसत नाही.
पोडोफायलीन हेच नाव आहे
पोडोफायलीन हेच नाव आहे क्रिमचे?
ते चामखीळ वारंवार येण्याची शक्यता असते का?
वजनाचा आणि अशा ट्रीटमेन्टचा
वजनाचा आणि अशा ट्रीटमेन्टचा काही संबंध असू शकतो >>> चामखिळ हे एकतर अनुवशिक असेल तर येतात...
caused by a virus infection.... local anesthesia देऊन easily radio frequency ने काढता येतात. परन्तु ते एकदा काढलेल्या ठीकाणी येत नाहि.. आजुबाजुला other body part वर कुठेहि पुन्हा येऊ शकतात..
पाटील सर, प्रत्येक दवाखान्यात
पाटील सर,
प्रत्येक दवाखान्यात मुलांचे वजन नोंदले जाईल, कारण सर्वच औषधांचे डोस हे वजनावर, मिलिग्राम प्रति किलोग्राम या हिशोबाने दिले जातात.
प्रौढांचे वजन सामान्यतः नोंदले जात नाही, कारण अॅव्हरेज अॅडल्ट वेट, ४५-५० असे गृहित धरून त्यापुढे जास्त वजन असले तरी बेसिक अॅडल्ट डोस बहुतेक सामान्यतः वापरायच्या औषधांसाठी चालून जातो. म्हणून औषधे देण्यासाठी वजन केलेले असणे गरजेचे असते.
(अवांतर :
>>आयर्वेदीक असल्यास उत्तम कारण त्याने काही साईड ईफेक्ट होणार नाही.<<
उत्तम विनोद!)
डॉक्टर आणि SmiRocks थॅन्क्स
डॉक्टर आणि SmiRocks थॅन्क्स .... तुम्ही दोघांनी दिलेली ही माहिती पूरक म्हणून मी जरूर नोंदवून ठेवतो. या ना त्या निमित्ताने मी अशाप्रसंगी सोबत म्हणून विविध प्रकारच्या दवाखान्यात ये-जा करीत असतोच. तिथे असे कुणी नोंदी करून घेत असतील तर त्या मागील कारणमीमांसा समजली की समाधानही होत असतेच.
[अवांतर : रंकाळ्यात नियमित जलतरण करणार्या ५५ वर्षे वय असलेल्या एका मित्राच्या अंगाला गेल्या महिन्यापासून प्रचंड खाज सुटायला लागली. त्याला कारण म्हणजे रंकाळ्यात बेफाम वाढलेले केंदाळ वनस्पती आणि त्यामुळे झालेल्या दूषित पाण्यामुळे. हे आम्ही ओळखले होते, पण त्याला ज्यावेळी त्वचातज्ज्ञाकडे त्यावरील उपचारासाठी नेले त्यावेळी त्यानी काही पाहाण्यापूर्वी "युरीन आणि ब्लड रीपोर्ट घेऊन या संध्याकाळी..." असे सांगितले. त्यावर प्रतिवाद घालण्याचा मित्राला मोह झाला होता पण मी त्याला आवरले. युरिनचाही खाजेशी संबंध असू शकतो हे नक्की.
थोडक्यात डॉक्टर्सनी अमुकतमुक रीपोर्टस घेऊन या असे म्हटले की त्याची शांतपणे अंमलबजावणी करणे शहाणपणाचे ठरते.]
अशोक पाटील
मी मला आलेले २ चामखिळ माझे
मी मला आलेले २ चामखिळ माझे मीच उडवले होते
मी त्यांच्यावर कॉर्नकॅप लावल्या. एक चामखिळ २ कॉर्नकॅप मध्ये निघून आला तर दुसरा ३ मध्ये निघून आला. १ कॉर्नकॅप २४ तास ठेवली होती न भिजवता. एक कॉर्नकॅप काढली की हळूच तो चामखिळ ओढून बघत होते. निघून आला तर पुढे कॉर्नकॅप लावायची नाही. चामखिळाच्या जागी एखादं अँटिसेप्टिक लावून ठेवायचं.
कॉर्नकॅपचा पर्याय आहे.. पण तो
कॉर्नकॅपचा पर्याय आहे.. पण तो पायाच्या टाचेला वगैरे ठीक आहे.. शक्यतो चेहर्यावर वापरुच नये.. चेहर्यावर scar राहण्याची शक्यता असते..
रॉकिणी (चालेल ना गं? ),
रॉकिणी (चालेल ना गं?
), माझ्या पायावर आणि दंडावर आला होता चामखिळ. स्कार राहिला नाही. टाचेवर पण चामखिळ येतात? चेहर्याच्या बाबतीत मात्र तू म्हणतेस तसं काळजीपुर्वकच उपाय केला पाहिजे.
टाचेवर पण चामखिळ येतात? >>
टाचेवर पण चामखिळ येतात? >> corns म्हणायचे होते मला.. ते नॉर्मली हाताच्या तळव्यावर, बोटांवर आणि पायाच्या टाचेवर येतात..
रॉकिणी (चालेल ना गं? >> चालेल ना..
घोड्याच्या शेपटीचा केस
घोड्याच्या शेपटीचा केस बांधा, साधारण ७ ते ८ दिवसात चामखीळ गळून पडेल. मलाही गालावर चामखीळ होते. माझ्या सोसायटीमधल्या एका आजोबांनी हा उपाय मला सांगितला होता आणि त्यांच्याजवळ तो केस पण होता. तुम्हाला मात्र कदाचित आधी घोडा शोधावा लागेल.
चामखीळ घालवण्यासाठी १००%
चामखीळ घालवण्यासाठी १००% रामबाण उपाय म्हणजे वार्टोसीन हे औषध आहे.
हे आयुर्वेदीक आहे. (तत्राप माझा कोणताही आर्थीक संबंध नाही.)
६५ ते ७० रुपयांना बाटली मिळते. चामखीळ धुतल्यानंतर ७/८ दिवस लावावे. चामखीळ गळून पडते. कोठेही मिळेल.
ही लिंक पहा:
चामखीळ घालवण्यासाठी १००% रामबाण उपाय म्हणजे वार्टोसीन हे औषध आहे.
होमिओपॅथि मध्ये थुजा नावाचे
होमिओपॅथि मध्ये थुजा नावाचे मलम आहे. त्याच बरोबर थुजा नावाच्या बहुतेक पोटात घेण्याच्या होमिओपॅथि गोळ्यासुध्दा आहेत. याने किंवा वरील कोणत्याही औषधाने चामखिळ गेल्यास ती पुन्हा उदभवु नये यासाठी विचार करा.
कायम पेन किलर्स, सर्दीसाठीची अॅक्शन ५०० सारखी औषधे घेणे आवश्यक असल्यास पर्यायी औषधांचा शोध घ्या.
वार्टोसिन ने काडलेले चामखीळ
वार्टोसिन ने काडलेले चामखीळ परत येन्याची शक्यता जास्त असते..
एखादा cosmotologist ला भेट..
घोड्याच्या शेपटीचा केस बांधा,
घोड्याच्या शेपटीचा केस बांधा, साधारण ७ ते ८ दिवसात चामखीळ गळून पडेल.
>>> होय. हा रामबाण उपाय आहे बहूदा. लहानपणी आजीने माझ्यावर हा प्रयोग केला होता. पण घोड्याच्या शेपटीचा केस तोडल्याबरोबर (सॉरी घोड्या :P) लगेच चामखिळावर बांधावा लागतो.