सिझन्स या नावाचा शफाकत अमानत अली यांचा एक सेमी-क्लासिकल अल्बम 'प्लस' म्युझीक कंपनीने काढला होता. माझ्याकडे त्याची कॅसेट होती, अक्षरशः खूपवेळा ऐकल्यामुळे ती कॅसेट खराब झाली, वाटले होते, दुसरी घेऊ, पण दरम्यान ती कॅसेट कंपनी बंद पडली आणि दुसरी कॅसेट मिळालीच नाही. 'सैंया बिना घर सुना' ही पहाडी ठुमरी त्या कॅसेट मधे होती. कॅसेट्च्या मुखपृष्ठावर दिलरुबा घेतलेल्या केस वाढवलेल्या शफाकत अमानत अली यांचे प्रकाशचित्र होते. तर मला त्या कॅसेट मधली गाणी हवी आहेत, अर्थात शक्यतो MP3 Format मधे.... कॅसेट असेल कुणाकडे तरी चालेल, म्हणे सध्या अश्या कॅसेट्चे MP3 Format रुपांतर करुन मिळते...
इतक्यात गुगाळल्यावर त्याचा तुनळीवर सापडलेला दुवा खाली देत आहे.
http://www.youtube.com/watch?v=MnpqrcdxH7E
अवांतर - प्लस म्युझीक कंपनीने मॉन्सून मॅजिक नावाची रुपक कुलकर्णी यांची बासरी वादनाची आणि इस रात की सुबह नही या नावाच्या चित्रपटाची कॅसेट देखिल काढली होती.