jpg फाइलची साइज कमी किंवा वाढवण्यासाठी

Submitted by हसरी on 21 November, 2012 - 04:35

मला jpg ची फाइल background image साठी वापरायची आहे पण साइज लहान असल्यामुळे ती इमेज १ च न येता सगळीकडे छोटी येतेय. त्यासाठी काय करता येइल? मला ती इमेज फुल page background साठी वापरायची आहे. प्लिज मदत करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुला ती इमेज डेस्कटॉप बॅकग्राऊंड ठेवायचीय हे गृहीत धरुन लिहितेय. डेस्कटॉपवर राईट क्लीक केल्यावर 'प्रॉपर्टीज' मध्ये जा. 'डेस्कटॉप' टॅबमध्ये 'पोझिशन' मध्ये 'सेंटर' सिलेक्ट कर.

योडी, तुमच्या उपायाने इमेज सेंटरला आली तरी ती अगदी लहानच राहील... इमेज स्ट्रेच असा ऑप्शन वापरुन बघा. पण त्यामुळे पिक्सेल फुटतील.

एकाच फाईलला रीसाईझ करायला मायक्रोसॉफ्ट ऑफिस पिक्चर मॅनेजर वापरा बॅच प्रोसेसिंगसाठी ईरफान व्ह्यू हे फ्रीवेअर वापरा.

इमेज स्ट्रेच असा ऑप्शन वापरुन बघा. पण त्यामुळे पिक्सेल फुटतील.
>>
ह्यासाठीच तो ऑप्शन नाही सांगितला मी.

ऑफिस पिक्चर मॅनेजर
>>>
ह्याने करता येईल इमेज मोठी पण ह्यात नाही ना पिक्सेल दिसत मोठे??

मला वेबपेज साठी हवी आहे. प्लिज थोड डिटेल मध्ये सांगा कारण मला कळतं नाही आहे. पेंट मध्ये साइज मोठी होते आहे. पण फाटल्यासाखं किवा ताणल्यासारखी इमेज दिसतेय.

इमेजचे बेसिक रिझोल्युशन किती आहे त्यावर ती इमेज फाटणे अवलंबून आहे. बेसिक रिझोल्युशन जर ७२ dpi (dots per inch) असेल तर ती इमेज ठराविक आकारापेक्षा मोठी केली की फाटेलच.. त्यामुळे मूळ इमेज ३०० किंवा अधिक dpi असेल तर तुम्हाला पाहिजे तेव्हढी मोठी इमेज तयार करुन नंतर तिचे रिझोल्युशन कमी करुन योग्य रिझल्ट मिळेल.

पण परफेक्ट साइझ कळतं नाही आहे.
<<
<<

त्यासाठी "पेंटब्रश" मधून ती इमेज ओपन करा. मग Image मध्ये जाऊन Attributes करा, त्यात तुम्हाला त्या चित्राची सध्याची साईज व रिझोल्युशन कळेल.

PC Image Editor हे सॉफ्टवेअर इंटरनेटवर फुकट मिळतं. ते वापरून आकार कमी करता येतो.

हसरी,
छोटा फोटो मोठा करण्याचा प्रयत्न केल्यास तो फाटणारच.
मोठ्या फोटो चे लहान करणे सोपे असते. लहानाचे मोठे करणे नाही.