राम राम, मायबोलीकर मित्रांनो.
मी बीड जिल्ह्यातील एक तरूण. घाटशिळ पारगांव हे माझे गांव. येत्या २६ नोहेंबरला आमच्या गावची निवडणूक आहे. गेली ५ वर्ष आम्ही गावातील २०० तरूण गावच्या विकासासाठी धडपडतोय, पण सत्ताधारी विरोधक त्यात अनेक अडचनी आणत आहेत. म्हणून ठरवलय कि गावच्या विकासासाठी सत्ता हाती घ्यायचीच. म्हणून आम्ही सर्व तरूण निवडणूक मैदानात उतरलोय.
आम्हाला प्रचारासाठी मायबोलीकरांच्या मदतीची गरज आहे. तेव्हा, आदर्श सरपंच, गाव, किंवा ग्रामपंचायत याविषयी, तसेच आम्हाला या क्षेत्रात उपयोगी पडेल अशी कुठली ही मदत वा माहीती मायबोलीकरांनी आम्हाला येथे पुरवावी ही विनंती.
काही प्रतिसादावरून, मी हा धागा अधिक स्पष्ट करत आहे, जेनेकरून आपणास माहिती पुरवण्यास सोपे जाईल.
माझे गांव हे एक बागायती खेडेगाव म्हणून परीसरात ओळखले जाते. लोकसंख्या साधारण ५५००. मतदान २५००. एकून ९ सद्स्यांची ग्रामपंचायत. मुख्य व्यावसाय शेती. शेतीविरहीत लोकांचा व्यावसाय शेतमजूरी, उसतोड कामगार म्हणून सहा महिने स्थालांतर. प्रमुख पिके कापूस व ऊस. फळबाग नगण्य. गावासमोरील अडचणी,
१. गांवातर्गत व गावाला जोडणार्या रस्त्यांची दुरावस्था
२. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
३. शौचालयांचा प्रश्न
४. अवैध्य दारू विक्री व व्यसनाधिनता
५. सरकारी यंत्रनेतील भ्रष्टाचार
६. दर्जेदार शिक्षण सुविधेचा आभाव
७. शाश्वत रोजगाराचा आभाव
८. दळण वळण सुविधांचा आभाव.
९. अपुरी वीज व अनियमित लोडशिडींग
जमेच्या बाजू,
१. तरूणांचे विकास कामासाठीचे निस्वार्थ प्रयत्न.
२. गावातील धार्मिक वातावरण.
३. तरूणांविषयी गावामधिल अनूकूल वातावरण.
प्रथम आपले अभिनंदन की आपण
प्रथम आपले अभिनंदन की आपण निवडणूकीत प्रत्यक्ष भाग घेत आहात.
प्रचारासाठी आम्ही राबवायची तीच पद्धत गावात सोपी व परिणामकारक पडेल.
१. प्रत्येक घरात जाऊन भेटणे व खर्या विकासासाठी आम्हाला संधी द्या म्हणणे. ह्यासाठी गावातील काही जुन्या जाणत्या मंडळींमध्ये न वाद विवाद घालता आपले म्हणणे पटवून सांगणे. त्यांना देखील सोबत घेणे.
२. तुमचा अजेंडा हा गावकर्यांना कामी येईल असा असावा. उदा संडासची उभारणी, शाळेची नीट सोय इ इ आणि तो गावकर्यांना नीट माहिती असावा.
३. कॅम्पेन करण्यासाठी तुम्ही सर्व २०० तरूण लोकांनी गावातून फेरी मारावी. (शक्ती प्रदर्शन) अशी फेरी जीप, कार मधनं वा बाईक वरून न मारता सायकलवरून मारली तर ती प्रभावी ठरू शकते.
४. गावतल्या केबलवर जाहिरातनामा प्रसिद्धी व तुम्ही नेमके कसे वेगळे ठरणार आहात ह्याच्या जाहिराती.
५. कोणाच्याही शंकेला तुम्हाला उत्तर देता यावे.
हे जरा भारतात नवीन वाटेल पण
६. तुम्ही नेमके काय करणार हे समजावून सांगण्यासाठी तुमच्या विरोधी मतदारास " ओपन चॅलेंज"द्यावे व ओपन वादविवादात (न भांडता) आपली मत मांडावीत.
अविनाश तुमचं अभिनंदन आणि खुप
अविनाश तुमचं अभिनंदन आणि खुप सार्या शुभेच्छा ! तुमच्या सारख्या तरुणांचीच भारताला गरज आहे.
अभिनंदन अविनाश. तुम्ही पहिले
अभिनंदन अविनाश. तुम्ही पहिले पाउल तर उचलले आहेच. गावातल्या समस्या काय आहेत त्या जाणून त्या सोडवण्यासाठी तुम्ही काय कराल त्या उपाययोजना लोकांना समजावून सांगा. त्या उपायांचा लोकांना लाँग टर्म मध्ये कसा उपयोग होइल तेही सांगा आणि त्यांना त्यात सहभागी करून घ्या. गावाचा विकास कसा करायचा आहे याचा अॅक्शन प्लॅन तुमच्याकडं असणं फार महत्वाचं आहे. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे (आणि चांगले) आहात ते दाखवून द्या.
अविनाश, सर्वात आधी आपले
अविनाश, सर्वात आधी आपले अभिनंदन. गलिच्छ राजकारण न करता गावचा विकास तुमच्या हातून घडावा ही सदिच्छा. "काहीतरी" देऊन मत विकत घेण्यापेक्षा "काहीतरी" करून मतावरचा हक्क सिद्ध करा.
माझ्यातर्फे काही मुद्दे सांगत आहे. पटत असतील तर बघा.
१. सर्वात आधी तुमचा निवडणूक प्रचार कार्यक्रम पूर्णपणे आखून घ्या. कुणी काय करायचे हे ठरवून घ्या. त्यासाठी तुमच्या टीममधल्या प्रत्येकाच्या प्लस पॉईंटचा पुरेपूर फायदा घ्या. प्रचारादरम्यान, कुणी बोलायचे, भाषण कुणी लिहायचे याची सर्व रंगीत तालीम करून ठेवा. त्यामुळे कामामधे तुम्हाला अडचणी येणार नाहीत. तसेच बॅकप प्लान आखून ठेवा. अचानक काही अडचणी आल्याच तर त्यामुळे काम करणे सोपे जाईल.
२. पूर्ण फायनान्शिअल प्लानिंग हेदेखील करून घ्या. खर्च किती करायचा हे एकदा ठरलं की मग कमीतकमी खर्च कुठे करायचा, आणि जास्तीत जास्त खर्च कुठे याचं गणित बांधता येइल. आयत्यावेळेला उद्भवणार्या खर्चांची सोय आधीच करून ठेवा.
३. मीडीयाची योग्य मदत घ्या. तुमच्यापैकी कुणाकडे न्युज बनू शकेल अशी स्टोरी असली तर त्याचा पूर्ण फायदा घ्या.
४. गावकर्यांशी संवाद साधताना तीच घिसीपीटी राजकीय भाषा न वापरता त्यांच्या बोलीभाषेतून संवाद साधण्याचा प्रयत्न करा. (हे तोंडी संवादापेक्षाही लेखी संवाद - प्रेस रीलीज, फ्लायर इत्यादिसाठी जास्त लागू)
आदर्श ग्रामपंचायतीसंदर्भात माझे काही मुद्दे:
१. कचरा व्यवस्थापन.
२. पाणी व्यवस्थापन.
३. शौचालय.
४. मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न.
५. वैद्यकीय सुविधा.
लवकरच तुमच्या गावामधे युवाशक्तीच्या माध्यमातून विकास होताना दिसू देत ही बाप्पाचरणी प्रार्थना.
अभिनंदन अविनाश.. आम्हा
अभिनंदन अविनाश.. आम्हा सर्वांच्या शुभेच्छा आहेतच.
तुमच्या गावासमोर कोणते प्रश्न
तुमच्या गावासमोर कोणते प्रश्न (सगळ्यात महत्त्वाचे/अग्रक्रमाने सोडवले पाहिजेत असे)आहेत ?(उदा: रस्ता, पाणी, शाळा, आरोग्य, स्वच्छता) यातले कोणते प्रश्न ग्रामपंचायतीच्या अधिकारक्षेत्रात येतात? त्या प्रश्नांवर तुम्ही कशा प्रकारे काम करू शकाल? गेल्या पाच वर्षांत असे काही प्रयत्न संघटितपणे तुमच्या गटाने केले आहेत का?
हे प्रश्न आणि उत्तरे लोकांसमोर मांडा.
ग्रामपंचायतीत स्त्रियांना (पन्नास टक्के ?) आरक्षण असते. तुमच्या गटात शिकलेल्या स्त्रियांचा समावेश (फक्त नावापुरता नव्हे, तर सर्वार्थाने) हवा. गावातील बचत गटांना(असल्यास) तुमच्याबरोबर घेता येईल.
निवडणुकीचा निकाल काहीही येवो; निवडणूक जिंकणे हेच उद्दिष्ट न ठेवतार गावाचा विकास साधण्यासाठी, तुम्हा तरुणांची संस्था स्थापन करून ग्रामपंचायतीच्या मदतीशिवाय करता येतील अशी कामे करून दाखवा. यासाठी तुमच्या गावातून शहरांत नोकरीनिमित्त गेलेल्या लोकांची मदत/मार्गदर्शन घ्या.
इथे बसून लिहिणे माझ्यासाठी खूप सोपे आहे. मैदानात उतरल्याबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या
मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादाबदल मी खूपच आभारी आहे.
विशेष केदार, भरत मयेकर, व नंदनी यांचे विशेष आभार आपल्या सुचनांचा आम्हाला खूपच फायदा होईल.
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
सामान्य लोकांच्या सरकार दप्तरी अडलेल्या कामांचा कायदेशीर मार्गाने पाठपुरावा करून कामे मार्गी लाऊन दाखवा आणि त्याची व्यवस्थित जाहिरात करा.
१०० पोकळ आश्वासनांनी साधणार नाही असा परिणाम एक असे काम करून जाईल.
गावातील ऊद्योग धंद्यांना तुमच्या योजना कश्या पुरक असतील हे पटवून सांगा.
शेतीबरोबरच एखाद्या ऊद्योगदंद्याचा पर्याय लोकांना दिसला तर त्यांना हवेच असेल.
आदर्श, यशस्वी शेतकरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेतकर्यांची व्याख्यानं ठेवा.
हिवरे बाजार वगैरे गावातून लोकांना आमंत्रणं द्या.
रेनवॉटर हारवेस्टींगसारख्या योजना मांडा.
मुलांसाठी लायब्ररी चालवा.
गावचा आठवडे बाजार भरण्याची जागा तिथे काही सुधारणा करता येतील का ते बघा.
अॅग्रो कंपन्यांशी बोलून तुमच्या गावातल्या शेतकर्यांसाठी काही डील आणता येईल का ते बघा.
सहकार तत्वातून शेतकर्यांचा ऊत्पादन-खर्च कमी करण्यासाठी काही योजना राबवण्यासाठी प्रयत्न करता आले तर चांगलेच.
शुभेच्छा!
शुभेच्छा!
शुभेच्छा!
शुभेच्छा!
अविनाश खेडकर... खुप सार्या
अविनाश खेडकर... खुप सार्या शुभेच्छा. तुमचे पॅनेल निर्विवादपणे निवडुन येवो.
या धामधुमित जर वेळ मिळाला तर अरुण साधुंचे 'तडजोड' हे पुस्तक वाचा. शक्यतो प्रचार चालु असतानाच वाचा. खुप फायदा होइल त्याचा. आणि खरोखरच तुम्हाला चांगला बदल घडवायचा असेल तर कुठेही तडजोड करु नका आणि तुमच्या मित्रांना करु देवु नका. कारण प्रलोभनापासुन दुर रहाणे / ठेवणे थोडे अवघडच आहे आणि फक्त तुम्ही दुर राहुन चालत नाही तर तुमच्या सगळ्या सदस्यांनी दुर राहणे महत्वाचे आहे. आणि हो निवडुन आल्यावर नक्कि इथे लिहा. त्यानंतर मात्र तुम्हाला मायबोलीचा प्रचंड फायदा होइल.
अविनाश, शुभेच्छा!
अविनाश, शुभेच्छा!
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत वॉर्ड निहाय रचना/ मतदरांचे कंपोझिशन याने खुप फरक पडतो. त्यामुळे उमेदवार निवडताना ते कंपोझिशन लक्षात घेणे महत्वाचे, ग्रामपंचायतीच्या निवड्णुकीत मुद्दे बहुतेक मागे पडतात आणि वय्येक्तीक संबंध , नातीगोती जास्त महत्वाची ठरतात. त्या दृष्टीने मोर्चे बांधणी करा.
मुख्य म्हणजे मतदानासाठी आपले मतदार घराबाहेर निघुन मतदान करतील हे बघा. नाहितर तोंड्भर आश्वासने देउन लोक मतदानच करत नाहित .
गाव बागायती खेडेगाव आहे म्हणजे तीथल्या लोकाना कृषी योजना/ सबसिडीज यांची बर्यापै़कि माहिती असेल , तसेच ग्राम सेवक, कृषी विकास अधिकारी, सहकारी बँक कशी काम करतात याची चांगलि जाण असेल. २६ नोव्हेंबर हि निवड्णुकिची तारिख फार दुर नाहि त्यामुळे तुम्हि आधी काही कामं केलि असतील तरच त्याचे भांदवल करा अन्यथा नुसति आश्वासने/ बाहेरच्यांची भाषणे यानी फरक पडणार नाही,
वय्यक्तीक रित्या मतदारना भेटणे आणि आपल्याकदे वळवणे जास्त इफेक्टिव्ह. जिंकुन आलात तर नंतर मात्र व्यवस्थित आखणी करुन, सरकारि योजनांचा फायदा योग्य व्यक्तीला पोहचेल , आपले गाव नव्या योजने साठी सिलेक्ट होईल याची खबरदारी घ्या. बर्याच ग्रामपंचायतींकडे घरपट्टी सोडली तर उत्पन्नाचे साधन नसते त्यामुळे जिल्हापरीषदा, राज्य/केंद्र सरकार यांच्या ग्रँट्स्/योजना याची योग्य माहिती/ वापर महत्वाचा.
मनापासुन अभिनंदन व
मनापासुन अभिनंदन व शुभेच्छा!!! वर मस्त कल्पना लिहिल्या आहेत सर्वांनी.
२६ नोव्हेंबर हि निवड्णुकिची तारिख फार दुर नाहि त्यामुळे तुम्हि आधी काही कामं केलि असतील तरच त्याचे भांदवल करा - ह्याला अनुमोदन.
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!
अभिनंदन व शुभेच्छा. आता
अभिनंदन व शुभेच्छा.
आता निवडणुक अगदीच तोंडावर आलीये तरी काही बाबी करायचा प्रयत्न करावा. जसे काही लोकांना सांगुन समजत नाही. वा पठडीत रहायची सवय लागली असते. त्यामुळे तुम्हि कितीही घसाफोड केली तरी त्याना उमगणार नाही. जर चांगले काही पाहिले तर आहे त्याच्याशी ते कंपेअर करु शकतात ना. त्यामुळे त्यांना ऑप्शन दिसणे केव्हाही चांगले राहील.
काही गोष्टी करुनच त्याचा फायदा दाखवावा लागेल. जसे संडास बांधणे / बायोगॅस तयार करणे / सोलार सिस्टीम बसवणे. ई.
२०० तरूण म्हणजे, तुमचे २०० घरे तर या सर्वांसाठी फॉर आहेत असे समजु. जर प्रत्येक घराने अजुन ३-३ घरी जाउन त्या लोकांची समजुत काढयची / समजावयाचे म्हटले तरी खुप सोपे होईल सर्व. त्यामुळे प्रथम घरातल्यांशी संवाद साधुन त्यांना इन्डायरेक्टली यात सामील करुन घ्या. या कामात स्त्रीयांचा जेवढा सहभाग कराल तेवढे बरे असे मला वाटते.
अजुन उमजेल तसे लिहिनच.
माझा काका गेल्या वर्षी
माझा काका गेल्या वर्षी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उभा होता. निवडणुकीच्या आदल्या रात्री सत्ताधारी विरोधी पार्टीने ३ लाख रुपयांचे वाटप केले. निकाल अर्थातच त्यांच्या बाजुने लागला.
तुमचे विरोधक सत्ताधारी आहेत म्हणजे त्यांना वाटपासाठी पैशांची काहीच कमतरता नसणार.
निवडणुकीत पैसेवाटप होतेच होते हे आता सगळ्यांना माहित आहे, तेव्हा असे वाटप तुमच्याइथेही होणार हे गृहीत धरुन तुम्ही लोकांना पैशांनी आंधळे होऊन मतदान करण्यातले तोटे समजावुन सांगा. एका दिवसात मिळवलेले १००० रुपये आणि नंतरचा ५ वर्षांचा दुष्काळ यात काय निवडायचे हा प्रश्न विचारा.
साधना, काका पडले ना? अजिबात
साधना,
काका पडले ना? अजिबात वाटले नव्हते ना त्यांनी?
अविनाश तुमच्या लढाईसाठी खूप
अविनाश
तुमच्या लढाईसाठी खूप शुभेच्छा ! निकालानंतर इथे बोलूयात नक्की.
काका पडले ना? अजिबात वाटले
काका पडले ना? अजिबात वाटले नव्हते ना त्यांनी?
काकांनी पैसेवाटप करायचे नाही ठरवले होते. गावपातळीवर तुमचा पक्ष थोडे पैसे देतो,उरलेले उमेदवाराला स्वतःच्या खिशातुन घालावे लागतात. काकाच्या पक्षानेही पैसेवाटप करायचे नाही ठरवले होते.
निवडणुकीच्या एक दिवस आधी चित्र वेगळे होते. पैसेवाटपाने चित्र बदलले आणि काका पडले. काकानी केलेल्या कामावर पाणी फिरले. म्हणुन अविनाश यांना मी धोक्याचा इशारा दिला. पैसे वाटप आपण थांबवु शकत नाही. पण पैसे घेऊन मत टाकणा-यांना ते कोणत्या खड्ड्यात उडी टाकताहेत ते सांगुन सावध करु शकतो. अर्थात त्यांनाही ते माहित असते पण काही न करता हातात येणा-या पैशांचा मोह टाळणे कोणालाही कठिणच.
गावासारख्या लहान मतदारसंधात कुठल्या समुहाने कोणाला मत दिले ते प्रत्यक्ष मतपत्रिका न पाहताही सहज सांगता येते.
निवडणुकीचा निकाल ?
निवडणुकीचा निकाल ?