Submitted by तनुदि on 10 November, 2012 - 08:28
अजीन्ठा आणी वेरुळ बद्दल माहित हवी आहे.
राहाण्य्याचे ठीकाण , आजुबाजुचा परिसर etc.
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजीन्ठा आणी वेरुळ बद्दल माहित हवी आहे.
राहाण्य्याचे ठीकाण , आजुबाजुचा परिसर etc.
किती दिवसांचा कार्यक्रम आखला
किती दिवसांचा कार्यक्रम आखला आहे / आखणार आहात? अजिंठा बघायला १ आणि वेरुळ बघायला १ असे किमान २ पुर्ण दिवस हातात हवेत. मी ४ घेतले होते.
वेरुळ लेण्यांच्या समोरच एक छानसे हॉटेल आहे. ही लिंक. http://www.hotelkailas.com/
औरंगाबाद शहरात राहण्यापेक्षा इथे राहणे अधिक योग्य. एकतर शांतता आणि लेण्यांचा सहवास. इथूनच अजिंठा, दौलताबाद देखील जाता येईल. बाजुलाच खुल्दाबाद (औरंगजेबाची कबर), वेरूळचे घृश्णेश्वर मंदिर आहे.
आमचा चार दिवसांचा कार्यक्रम
आमचा चार दिवसांचा कार्यक्रम आहे.
गुगलवर जरा शोधाशोध करा.. सर्व
गुगलवर जरा शोधाशोध करा.. सर्व माहिती उपलब्ध आहे. लेणी आठवड्यातून १ दिवस बंद असतात. तो दिवस तपासून घ्या.
अजिंठा अन वेरूळ हे
अजिंठा अन वेरूळ हे शेजारी-शेजारी नाहीत हे ठाऊक आहे ना तुम्हाला?
जवळजवळ दीडेकशे किमी अंतर आहे दोघांत. दुसरे म्हणजे वेरूळला 'उतरून' अजिंठा पाहून येतो,(किंवा उलट) असे होत नाही. कठीण आहे.
औरंगाबादेत रहाणे परवडेल त्यासाठी. तिथून एमटीडीसी च्या बसने जाता येईल. स्टेशनजवळ एमटिडीसीचं हॉटेल आहे. ते छान व परवडणेबल आहे. गाईडही चांगला असतो.
तनुदी अजिंठा जळगाव पासुन जवळ
तनुदी अजिंठा जळगाव पासुन जवळ आहे, तर वेरुळ औरंगाबादजवळ आहे. दोन्ही एका दिवसात होणे शक्यच नाही. तेव्हा जळगावला मुक्काम करुन आधी अजिंठा पहा, नंतर वेरुळकडे प्रस्थान करा. वेरुळ जवळच श्री घृष्णेश्वर हे १२ ज्योतिर्लिंगांमधले एक ज्योतिर्लिंग आहे, त्याचे पण दर्शन घ्या. बाकी दौलताबाद ( देवगिरी किल्ला ) पण करता येईलच. नाहीतर उलट पण करु शकता. आधी वेरुळ करुन मग अजिंठा बघा.
बाकी सेनापती यांनी माहिती उत्तम दिली आहेच.
औरंगाबाद रेल्वेस्टेशन जवळ ५
औरंगाबाद रेल्वेस्टेशन जवळ ५ मिनीटावर MTDC आहे. Online Booking करु शकता (http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/Index/Index.aspx) किंवा त्यांच्या कार्यालयात जाउन करा. MTDC मधे राहाणार असाल तर Online Booking केल्यास उत्तम. कोणकोणत्या प्रकारच्या रुम्स आहेत अन कोणत्या दिवशी कोणत्या रिकाम्या आहेत हे Online बघता येतं. आसपास अजुनही बरिच हॉटेल्स आहेत.
MTDC च्या कार्यालयात २ बुकिंग कांउटर आहेत. IT (Indian tourism) आणि दुसरे private. त्यापैकी IT चा माझा अनुभव चांगला आहे. एक दिवस बीबी का मकबरा, पाणचक्की, वेरूळ, दौलताबाद, खुल्दाबाद (औरंगजेबाची कबर), वेरूळचे घृश्णेश्वर मंदिर आणि दुसरे दिवस अजंठा अशी २ दिवसाची टुर निघते. MTDC मधे राहात जरी नसलात तरी तुम्ही या टुर च बु़किंग करु शकता. फक्त एका दिवसाचही बुकिंग करता येतं. १० पेक्षा जास्त जण असतील तर सोबत गाईड देतात.
दौलताबाद किल्ला नीट बघायचा असेल तर १ दिवस अजुन बाजुला काढा. औरंगाबाद स्टेशनवरुन १०/- माणसी अशी share auto बाबा पेट्रोल पंप पर्यंत मिळेल. आणि तिथुन काळ्या/पिवळ्या पट्ट्याच्या jeep / trax 20/- seat असे दौलताबाद किल्ल्यासमोर सोडतात.
औरंगाबादला जातच आहात तर लगे हात लोणार (http://bahawa.blogspot.com) पण बघुन घ्या. साधारण १५०/१६० किमी अंतरावर आहे. MTDC बाहेर बरेच private गाड्या असातात. जरा घासाघीस करुन पहा.
MTDC हवेच असेल तर मग
MTDC हवेच असेल तर मग औरंगाबादेत कशाला रहावे? खुद्द अजिंठ्याच्या पायथ्याला देखील MTDC आहे. तिथे रहावे. म्हणजे बाहेर पडलो की पुढच्या मिनिटाला इको बस पकडून गुहांपाशी जाता येते.
अजिंठा - वेरुळ हे अंतर ११० कि.मी.च्या आसपास असेल.
औरंगाबादजवळच एक विश्रांती
औरंगाबादजवळच एक विश्रांती घेणार्या मारुतीचे मंदिर आहे. त्याचे नाव विसरले. ते देऊळही छान आहे. बिबी का मकबरा आणि पाणचक्की ही दोन ठिकाणंही पहा.
पाणचक्की १० मिनिटात बघून
पाणचक्की १० मिनिटात बघून होईल. मकबरा नाही पाहिला तरी चालतो असे माझे वै.म.
सेनापतीजी, औरंगाबादला गेलेच
सेनापतीजी,
औरंगाबादला गेलेच नाही तरी काही फरक पडत नाही. अन ११० कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात ११० लाख लोकांनी तरी वेरूळ समजून उमजून नीट पाहिले आहे का? साऊथवरून शिर्डी करून गाड्या येतात तिथे अन सगळे २ तासात कैलास पाहून मग फक्त घृष्णेश्वर करतात. तिथे यांच्यामुळे पुरुषांनी कमरेवर उघडे जावे अशी नवीन स्टाईल निघाली आहे. आमच्या लहानपणी नव्हती.
अमि तो भद्रा मारूती आहे.
>>तिथे यांच्यामुळे पुरुषांनी
>>तिथे यांच्यामुळे पुरुषांनी कमरेवर उघडे जावे अशी नवीन स्टाईल निघाली आहे. आमच्या लहानपणी नव्हती.
)
हो, आम्ही गेलो तेव्हा मी खुप वाद घातला होता. अगदी तिथले सिक्युरिटी गार्ड, पोलिस, जमा झाले होते. त्यांना कोणालाही सांगता येत नव्हते की अशी पद्धत का आहे. पण जोरदार हेका होता शर्ट, बनियन, इ. काढून आत जाण्याचा. शेवटी जसे पुण्यात लाल सिग्नल असुन सुद्धा मागचे गाडीवाले जोरदार हॉर्न वाजवत असतात पुढे जाण्यासाठी, तसे रांगेत माझ्या मागे असलेले लोक अस्वस्थ होऊन त्या गार्डस आणि पोलिसांना सामिल झाले. मला एकंदरीत दिसले की तिथे डोकेफोड करण्यात काही अर्थ नाही आणि उशीर होत होता पुढच्या ठिकाणाला जाण्यासाठी, त्यामुळे अखेर नमते घ्यावे लागले. पण मला जबरदस्त खुमखुमी आहे तिथे जाऊन सत्याग्रह करायची.
एखादा ठराविक ड्रेसकोड ठीक आहे, लुंगी, सोवळे, इ. पण हा कसला अर्धवटपणा
कसल्या तरी युसलेस, नॉनसेन्स पद्धती चालू करतात आणि खुळ्यासारख्या पाळायला लावतात.
जमल्यास एखादे गटग तिकडे करून सामूहिक आंदोलन करूयात.
(पण दुर्दैवाने त्यानंतर पुन्हा हे चालू राहील असे वाटते.
महेशजी, तुमची चिडचिड समजली.
महेशजी,
फार पूर्वी एकदा आतून पाहिले गेले होतेच. बाकी मित्रांची चिडचिड अन गम्मत पाहून हसू आवरत होतो.
तुमची चिडचिड समजली. मी नास्तीक असल्याने मंदीर बाहेरून पहात निवान्त बसलो होतो
(नेहेमी चपला सांभाळत मंदिराचे 'दर्शन' घेणारा) इब्लिस.
रच्याकने : आतून पहायचेच असल्यास मला ड्रेसकोडचा विधिनिषेध नाही. पद्मनाभ मंदिरात व्यवस्थीत लुंगी लावून गेलो होतो. योग्य ती 'दक्षिणा' दिल्याने साग्रसंगीत 'दर्शन' झाले. अंधार फार असल्याने फटू काढता आले नाहीत नीट इतकेच..
दर सोमवारी लेणी मेंटेनन्स
दर सोमवारी लेणी मेंटेनन्स साठी बंद असतात. लेणी पाह्ण्याची वेळ ११ ते ५ अशी आहे अजिंठाला MTDC चे एक हॉटेल आहे. पण खुपच गर्दी असते. अजिंठाला ४ किमी आधी आपल्या प्रायव्हेट गाड्या जाउ शकतात. त्यानंतर फक्त MTDC च्याच बसेस जातात. जाताना पाणी सोबत घेणे गरजेचे कारण MTDC चे हॉटेल खाली आहे व टेकडी चढल्यानंतर काहीही सोय नाही. लहान मुले बरोबर असतील तर खायला नेणे आवश्यक. ३-४ तास तर फिरण्यातच जातात. फिरुन झाले कि भराभर खाली उतरणे उत्तम , कारण फिरुन खुप भुक लागते आणि खाली एकच हॉटेल असल्याने तुफान गर्दी असते. प्रायव्हेट गाईड करायची गरज नाही अजिंठाला वर पोहोचल्यानंतर MTDC चे कर्मचारी सुद्धा गाईडचे काम करतात. बार्गेनींग करा. आम्ही तर एका कुटुंबाने गाईड केला होता त्यांच्या बरोबरच फिरलो. माणसे ओळखीची नव्हती पण त्यांनी आम्हाल त्यांच्यात सामील केले मग आम्हीही काही ठिकाणी त्यांना आमच्यात सामील करुन घेतले. अजिंठाला कॅमेरा किंवा मोबाईल नेताना विदाउट flash वाला नेणे. एल्लोराला शॉपिंग करताना ५०० चे ५०-१०० रु. पर्यंत बार्गेनींग करणे. खुप फसवणुक होते. आम्ही औरंगाबादला पंचवती हॉटेल मध्ये राहीलो होतो. आणि हॉटेलचीच गाडी केली होती. सोईस्कर होती. अजिंठा लेणी खुपच छान आहेत.
बिबी का मकबरा , पाणचक्की ,
बिबी का मकबरा , पाणचक्की , खुल्दाबाद (औरंगजेबाची कबर)ही ठिकाणंही पाहण्यासारखी आहेत. मुख्य म्हणजे औरंगजेबाच्या कबरीवर तुळशीची झाड लावले आहे आणि ती माणसे ते तुळस नाही हे बासील चे झाड आहे असे म्हणतात आम्ही तर सांगितले तुळशीलाच इंग्रजीमध्ये बासील म्हणतात तेव्हा त्या मुसलमान माणसाचा चेहरा पडला होता.
अजिंठा औरंगाबादपासुन ११० कि.मी. अंतरावर आहे. आणि वेरुळ साधारण ३५ कि.मी. अंतरावर आहे.
बाकी देवळाचं म्हणाल तर शिर्डी
बाकी देवळाचं म्हणाल तर शिर्डी साईबाबांशिवाय मला कुणाचही दर्शन घेण्यात जास्त रस नसतो म्हणुन श्री घृष्णेश्वर मंदीराचा अनुभव सांगणार नाही. तसं मी दर्शन तर घेतलं होतं पण गर्दीचा अनुभव वाईट आला. गाभा-यात सेक्युरीटीची व्यवस्था चांगली नाही. पिंडीच्या आजुबाजुला काहीही व्यवस्था नाही एक - एक जण २०-२५ मी आपापला जप पिंडीच्या बाजुला बसुनच करतो त्यामुळे गर्दी खोळंबते. आणि देवाचं दर्शन ५ मी घ्या किंवा ३० मी. त्याने काही ही फरक पडत नाही असे माझे मत आहे पण मला दुस-यांच्या भावना दुखवायच्या नाहीत म्हणुन जास्त काही लिहीत नाही.
तिथे यांच्यामुळे पुरुषांनी
तिथे यांच्यामुळे पुरुषांनी कमरेवर उघडे जावे अशी नवीन स्टाईल निघाली आहे. आमच्या लहानपणी नव्हती.
>> आम्ही गेलो होतो तेव्हाही पद्धत नव्हती.
दक्षिणेमधे मात्र प्रत्येक देवळामधे पुरूषांना लुंगी अथवा सोवळे नेसूनच प्रवेश असतो. स्त्रियांना साडी अथवा सलवार कमीझ.
मंगलोरच्या देवळांकडली शिस्त आणि स्वच्छता खरोखर वाखाणण्याजोगी असते.
फेसबुक वर ब्लशिंग इंडियन
फेसबुक वर ब्लशिंग इंडियन स्टोन्स पेज आहे त्याशी संबंधित उदयन इंदुरकर यांच्याशी संपर्क करावा
ते अजिंठा वेरूळ ला नेहमी ट्रिप्स ऑरगनाइज करतात व इंडॉलॉजिस्ट आहेत त्यामुळे ऑथेंटिक माहिती मिळेल.
शक्य असल्यास जगातल एक
शक्य असल्यास जगातल एक आश्चर्य- लोणार सरोवर पाहून या, औबाद पासून बहुधा ७०/८० किमी आहे. तिथे एक इतिहासाचे प्रोफेसर अतिशय छान माहिती हौसेने (एकही पैसा न घेता) सांगतात.
तिथे आजुबाजुला एक देऊळ सोडल तर पहाण्यासारख दुसर काही नाही, गावात खायची प्यायची सोय , स्वच्छता गृहाची सोय कुठेही नाही तसेच स्वच्छताही कुठेच नाही.
दौलताबाद किल्ला बघणेबल आणि चढणेबल. म्हैसमाळ म्हणून एक पुर्वी अभयारण्य होत. सध्या तिथे प्राणी आहेत की नाही माहिती नाही. पुर्वी हरसुल जेल मधील सतरंजा, बसकुर आवर्जून घेणेबलहोत्या. सध्या बनवतात की नाही माहिती नाही. पैठण गार्डनला लवकर जाणे आवश्यक, म्युझिकल फाऊंटन शिवाय बघणेबल काही नाही, तेही लहान मुलांसाठी ठिक आहे. अंधार लवकर पडतो त्यामुळे गार्डन मधे फिरणे अतिशय गैरसोईचे आहे. लाईटसची व्यवस्था अजिबात चांगली नाही. जायकवाडी धरण आणि पैठणी केंद्र मुलांना दाखवणेबल आहे. पैठण ला जायच असल्यास दुपारीच जाण सोईच. रस्ता अतिशय खडबडीत असल्याने गाडीतबसून देखील तासभर बैलगाडी राईड केल्याच फील येइल.
खुलताबादला गेलात तर सिताफळ
खुलताबादला गेलात तर सिताफळ जरुर घेऊन या, उत्तम क्वालीटीची मिळतात, पुर्वी २५ रु ना टोपली मिळायची आता कदाचित २५रु ला एक असेल किंवा २५रु ला नुसती टोपली असेल
'म्हैसमाळ' हे हिलस्टेशन आहे
'म्हैसमाळ' हे हिलस्टेशन आहे या माहिती वरून आम्ही मोठ्या अपेक्षेने गेलो होतो पण प्रचंड निराशा झाली. का ही ही प्रेक्षणीय नाहीये तिथे. वेरूळ , अजिंठयाला मात्र पहावं तितकं कमी आहे.