सुस्वागतम्‌

Submitted by हरिहर on 6 November, 2012 - 09:18

(मी ह्या गु्पमध्ये नुकताच सामील झालेलो असल्यामुळे पुढील चर्चा ह्यापूर्वी झालेली आहे की नाही हे मला माहित नाही. तथापि विचारत आहे.)
आपण "सुस्वागतम्‌' हा शब्द सररास (सर्रास नव्हे, तसेच सर्दी नव्हे तर सरदी) वापरतो. विशेषकरून तो शाळेमध्ये तर सातत्याने वापरला जातो. सुस्वागतम्‌ म्हणजे सु+स्वागतम्‌. "स्वागतम्‌' म्हणजे सु+आगतम्‌. आता "सुस्वागतम्‌'ची फोड म्हणजे "सु+सु+आगतम्‌' अर्थात "शुभ+शुभ+आगमन' अशी होते. हे म्हणजे म्हणजे गायीचे गोमूत्र म्हणल्यासारखे आहे. म्हणूनच "स्वागतम्‌' असाच शब्दप्रयोग करणे उचित ठरते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हरिहर, ग्रुपमध्ये आपले स्वागतम! Happy

तुम्ही महामहोपाध्याय हा शब्द ऐकला आहे ना? त्याची फोड काय?

भाषेत असे गणिती प्रश्न चालत नाहीत. भाषेत शब्द येत असतात, जात असतात. त्यांचे अर्थ बदलत असतात. आपण वर्तमान काळातील चालू शब्द वापरीत रहायचे! कसं?