तुम्हाला वाटणार्‍या 'नॉर्मल' आणि 'स्पेशल' गोष्टी!

Submitted by माधवी. on 3 October, 2012 - 02:58

पाऊलो कोएलो च्या 'The Winner Stands Alone' कादंबरी मधे एक पात्र आहे, जॅविट्स वाइल्ड नावाचं.
हा माणुस हॉलिवूड चित्रपटांचा वितरक आहे. खुप श्रीमंत आणि यशस्वी! सगळी सुखं त्याच्या पायाशी लोळण घेत असतात. त्याने आपले चित्रपट वितरीत करावे म्हणुन बरेच बडे लोक ह्याच्या पुढे मागे करत असतात. ह्या सगळ्या वातावरणाला जॅविट्स वाइल्ड खुपसा सरावलेला आणि काहीसा वैतागलेला असतो. म्हणुन मग मनःशांती साठी तो महिन्यातुन एकदा अलास्का ला जात असतो. तिथे तो असाच निरुद्देश भटकतो, तिथल्या स्थानिक लोकांशी बोलतो आणि त्याला प्रश्न पडत असतो की नॉर्मल म्हणजे नक्की काय,
what does being normal mean? ह्या प्रश्नाला त्याला खुप वेगवेगळी उत्तरं मिळतात. नंतर तो लोकांच्या ह्या 'नॉर्मल' वागण्या-बोलण्याची एक लिस्ट करायची ठरवतो आणि सगळ्या गोष्टी आपल्या डायरी मधे लिहुन घ्यायला लागतो. जसकी त्याला मिळालेली काही उत्तरं,
१. spending years at university only to find at the end of it all that you are unemployable.
2. never asking a direct question even though the other person can guess what it is you want know
3. Following fashion trends however rediculous or uncomfortable

हे सगळं मी जेव्हा वाचलं तेव्हा मलाही प्रश्न पडला की खरचं 'नॉर्मल' म्हणजे नक्की काय? म्हणजे माझ्यासाठी जे 'नॉर्मल' असेल ते दुसर्यासाठी 'स्पेशल' असु शकतं! म्हणुन मलाही इथे विचारावेसं वाटलं. कदाचित ह्या प्रश्नाला बरीच गमतीशीर आश्चर्यकारक उत्तरे मिळु शकतात. तर शेअर करा
तुम्हाला वाटण्यार्या 'नॉर्मल' आणि 'स्पेशल' गोष्टी Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन एक नॉर्मल गोष्ट,
लिफ्ट मधे अनेक लोक असतानाही लिफ्टच्या दाराकडे तोंड करुन उभं राहाणं आणि दाखवणं की तुम्ही एकटेच लिफ्टमधे आहात Happy

एक नॉर्मल गोष्ट Happy
जेव्हा १०० लोक एखाद्या गोष्टीच कौतुक करत असतात...तेव्हा आपल्याला ती गोष्ट अपील का होत नाही असा प्रश्न पडण ???? Wink

anusaya >> +१

बाळू जोशी,
आपण बोलताना बरेचदा म्हणतो की 'हे तर नॉर्मल आहे' किंवा एखादी गोष्ट आपल्यासाठी विशेष असु शकते Happy
तर अशा गोष्टी सांगा ज्या तुम्हाला नॉर्मल/स्पेशल वाटतात!

थोडक्यात प्रवाहानुरुप वागणे म्हणजे नॉर्मल आणि विरुद्ध म्हणजे स्पेशल असं अपेक्षित आहे का उत्तरांत
>>>
धनश्री,
असे काही नाही Happy तुला काय नॉर्मल/स्पेशल वाटते ते लिहायचे.
प्रवाहानुरुप वागणे बर्‍याच जणांना वाटते नॉर्मल, काहींना नाही.

प्रितीभुषण,
नवर्या कडुन अपेक्षा करणे हे नॉर्मल अन त्याने भेट वस्तु आणली हे स्पेशल
>> अगदी अगदी!

नवरोबांनी लग्नाचा , बायकोचा, साखरपुड्याच्या, पहिल्या भेटीचा, पहिल्या फोन संभाषणाचा, बायकोच्या आईचा, बाबांचा, भावाचा, बहिणीचा, तिच्या आईबाबांच्या लग्नाचा वेग्रे वगरे चा वाढदिवस 'विसरणं' हे झालं "नॉर्मल"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आणि हे सर्व लक्षात ठेवण म्हणजे पेशल Happy

मस्त आहे हा धागा! खूप गोष्टी असतील अशा!

गणपती, नवरात्र आले की घरातली एक न एक गोष्ट धुवून काढण्याची आमच्या कामवालीची सवय तिला "नॉर्मल" आणि मला "स्पेशल" वाटते.

नॉर्मल:
एखादी गोष्ट करायची आहे असे सतत म्हणणे आणि वेळ मिळत नाही अशी सबब सांगणे

नंतर खरचं मनावर घेउन ती गोष्ट करणे आणि त्या बद्दल खुप मानसिक समाधान वाटणे स्पेशल Happy

गर्दीत "ए गाढवा" अशी हाक मारा. १०-२० जण तरी तुमच्याकडे नक्कीच पाहतात.
>>>
अवांतरः "ए गाढवा" ह्या नावाने ललित टाकले तर किती जण येऊन डोकावून जातील? Lol

सलवार कुर्ता, वेस्टर्न फॉर्मल्स घालुन ऑफिसला जाणं नॉर्मल. साडी नेसुन जाणं स्पेशल. Happy

आज एका कलिगने साडी नेसली आहे. तिला कित्ती जणांनी विचारलं कि आज काय स्पेशल? मग लगेच हा धागा शोधला. Happy

मी रोज घरून डबा नेते, एक दिवस नेला नाही, (अगदी कालच) कँटीनात भेटलेला प्रत्येक जण.. अरे क्या स्पेशल? आज डबा नाही? Uhoh

एक कलिग कधीच डबा आणत नाही. एक दिवस तो डबा घेऊन आला.
लग्गेच आम्हीच विचारलं.. आज काय स्पेशल Proud

अच्छा, म्हणजे मल्लिका, साडीत दिसली तर ते स्पेशल ! ( जॅकी चॅनच्या एका चित्रपटात दिसली होती, अवघडल्यासारखी वाटत होती,........... ती नाही हो, साडी ! )

अच्छा, म्हणजे मल्लिका, साडीत दिसली तर ते स्पेशल ! ( जॅकी चॅनच्या एका चित्रपटात दिसली होती, अवघडल्यासारखी वाटत होती,........... ती नाही हो, साडी ! Happy Happy
--- अशी नजर असणे हे नॉर्मल आणि ------ नसणे हे Wink

दिनेशदा --- गंमत करतेय पण हे खर मात्र आहे Happy

नॉर्मल गोष्ट

पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतलेला इसम चड्डीत हमखास लघुशंका करतोच.
(तसचं आंघोळ करतानाही काहीजण.. Wink )

*मुर्ख असणे..... नॉर्मल.....
.
.
.
.
पण कोणी जाहीर साक्षातकार करून द्यावा ..हे स्पेशल....
:)..

दाद ने ह्रिदयस्पर्शी किंवा खुमासदार लेख लिहिणं ,मुंगेरीलाल ने मस्त पंचेस दिलेलं विनोदी लेखन करणं हे नॉर्मल माझ्यासाठी.(तुम्ही दोघेही इतक छान, इतक्या consistently लिहिता म्हणून तुमचं कौतुक आहे मला )
मी मनात असलेलं, सुटसुटीत आणि समर्पक शब्दात व्यक्त करू शकणं हे स्पेशल!
मनात, डोक्यात घुमत असलेले सूर गळ्यातून तेवढ्याच सुरेलपणे बाहेर येणं हे स्पेशल माझ्यासाठी.

घरातल्या सर्वात जवळच्या व्यक्तीने अचानक देवाघरी जाणं नॉर्मल झालंय सध्या आम्हाला. त्यातून कसबसं सावरणं हेही नॉर्मल आणि या सगळ्यात देवावरची श्रद्धा ढळू न देणं हे स्पेशल झालंय माझ्यासाठी. अजूनही चांगलं काहीतरी घडू शकतं हा आशावाद बाळगण हे कधी स्पेशल तर कधी इतक सहज जमतं कि नॉर्मल वाटतं

एखाद लेटेस्ट बॉलीवूड सॉंग तरुण मुलामुलींनी गुणगुणन नॉर्मल आणि तेच सॉंग आज्जी आजोबांनी म्हंटल कि स्पेशल Happy

रोज च्या रोज तुम्ही कपाळाला टिकली लाऊन ऑफिस ला जाता -नॉर्मल
पण एखाद्या दिवशी टिकली लावली नाही तर स्पेशल- येता जाता लोक विचारतील टिकली पडलेय का ? लावायची रहायली आहे का ? माझ्यासाठी टिकली न लावण हे स्पेशल नसत( त्यात काय? नाही लावली ) पण लोकांसाठी मात्र ते स्पेशल ( अरेच्या टिकली लावली नाही ) Lol

खुप ओढीनं एखाद्या मित्राला / मैत्रीणीला दिलेल्या वेळेवर भेटायला जाणं आणि समोरच्यान उशीर केल्यामुळे त्याच्याशी अवाक्षरही बोलायची इच्छा न होण ..

नवर्‍याच्या वाढदिवसाला त्याच्यासाठी सरप्राइझ गिफ्ट देणं हे नॉर्मल व नवर्‍याने माझ्या वाढदिवसाला असे सरप्राइझ गिफ्ट दिले तर ते स्पेशल.

लहान मुले,तरुण, मध्यमवयीन व्यक्ती स्मार्ट फोन लिलया वापरतात हे नॉर्मल पण हीच गोष्ट ज्येष्ठ नागरिक करतात तेव्हा स्पेशल.