ऋतू

Submitted by योग on 28 September, 2008 - 06:54

ऋतू

अजून लक्षात आहे,
तुझ्या ऋतूंचा बहर...

ईवल्याश्या स्पर्शाने फूल होणे..
तर कधी
कोवळ्या जखमेवरी पानगळीची झूल होणे..

ते सारे घनगर्द लपेटून
चिरंतन उबेत नि:शब्द निजताना
एक मूक आभाळ चहू दिशांनी भरून येणे..
श्वासाच्या मंद झुळुकेवर
त्याचे ते थेंब थेंब झिरपणे..
दवाचे नवे अर्थ पहाटे टिपताना

सांग ना,

तुला ही ऋतूचक्राचे बदल(च) शाश्वत होते ना ?
मग "तू" अन "मि" एक निमित्त मात्र होवूया - अशाश्वत, असेच जगूया ?

गुलमोहर: 

अहा........ क्या बात है Happy