आयमॅक

Submitted by योकु on 15 September, 2012 - 23:33

नमस्कार... मला असलेला लॅपटॉप काढून आयमॅक घ्यायचा आहे. तर प्लीज जरा मार्गदर्शन करा...
माझा वापर -
कधीकधी फोटो एडीटींग. बरेचदा वर्ड एक्सेल... म्युझिक, पिच्च्रर (!) आणि वेब भरपूर.

- भारतात बेसमॉडेल ६५०००/- ला आहे - http://www.apple.com/in/imac/specs.html
- कोणी असं पीसी टू मॅक चेंज केलयं का? काही प्रॉब्लेम्स येतात का?
- सगळ्या प्रकारच्या फाइल्स मॅकवर चालतात का?
- यामध्ये डिफॉल्ट ब्लूटूथ कीबोर्ड + माऊस आहे... त्याच्या बॅट्रीचे काही प्रॉब्लेम्स?
- external hard disk, पेनड्राईव लावल्यानंतर काही प्रॉब्लेम्स?
- अँटीवायरस?
प्लीज जरा मार्गदर्शन करा...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद! कृपया माझ्या दुसर्या प्रश्नाचं उत्तर द्याल का महागुरू? >>> - कोणी असं पीसी टू मॅक चेंज केलयं का? काही प्रॉब्लेम्स येतात का?

कोणी असं पीसी टू मॅक चेंज केलयं का? काही प्रॉब्लेम्स येतात का?
हो केलयं. पिसी (विंडोज) टू मॅकबूक प्रो.
फार काही अडचणी येत नाहीत. ओ.एस. वेगळ्या आहेत पण लवकरच त्याला सरावाल. नोकिया टू सोनी एरिक्सन बदल जसा फार काही अवघड नाही तसाच हाही Happy
अडचणी आल्या तरी इंटरनेटशी जोडलेले असाल तर मदत करणारे खूप सारे गट आहेत. विंडोज टू मॅक प्रॉब्लेम सोडवणारे एक पोर्टल आहे. लिंक सापडली की इथे शेअर करतो.
फोटो एडिटींगही आणि वेब सर्फिंगसाठी मॅक उत्तम.

कोणी असं पीसी टू मॅक चेंज केलयं का? >> हो , काहीच प्रॉब्लेम नाही येत. मॅकचे शॉर्टकट्स माहिती व्हायला थोडे दिवस जातील पण तितकेच.

योगेश,
कोणी असं पीसी टू मॅक चेंज केलयं का?>>
मी चेंज नाही केलं पण आयमॅक वापरते बरेच वर्षापासुन.
वर्ड एक्सेल नेहेमीच आणि कामासाठी वापरत असाल आणि त्याचे स्पेशल डिझाईन टेम्प्लेट्स इ. वापरत असाल तर मी म्हणेन कि चेंज करु नका. आधीचा लॅपटॉपही ठेवा. विंडोजवर या गोष्टी जास्त सोप्या होतात.
मॅक साठी ऑफिस मिळते ते घेतले तरी ( माझ्याकडे विकत घेतलेले आहे ) काहि वेळा कम्पॅटिबिलिटीचा त्रास होतो.
गुगल डॉक्युमेंट्स वापरुन चालेल. पण स्पेशल डिझाईन इ. नीट होत नाही असा अनुभव आहे.
तरीही आयमॅक मस्तच आहे. फोटो, मुव्ही, म्युझिक सगळ्यासाठीच बेस्ट Happy
चेंज करु नका , मॅक + पिसी ठेवा.

धन्यवाद सगळ्यांचे. पीसी / लॅपटॉप काढावाच लागेल कारण तेवढेच पैसे आयमॅक ला होतील. आणि मला कोअर वर्ड, एक्सेल चं काम नाही पडत. कामचलाऊ सुद्धा चालेल... मग मला वाटतं की i should go ahead with the mac... Happy

इतक्या साध्या अ‍ॅप्लिकेशन्स साठी मॅक का घेणार? एच्पी किंवा एसर तत्सम साधा लॅप्टॉप ३० के परेन्त मिळेल. ३५ हजार वाचतील. अर्थात आवड आणि हौस आहेच.