पुण्यात/भारतात घर/फ्लॅट विक्रीवर लागणारे कर

Submitted by नात्या on 12 September, 2012 - 08:50

पुण्यात/भारतात घर/फ्लॅट विक्री करताना भराव्या लागणार्‍या वेगवेगळ्या करांबद्दल साध्या सोप्या शब्दात कुठे माहिती उपलब्ध आहे का? उदा. शॉर्ट टर्म, लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स, त्याचे नियम, ते कमीत कमी भरायला लागावे म्हणुन उपलब्ध असलेले गुंतवणुकीचे मार्ग/कायदेशीर पळवाटा, परदेशी नागरिकांसाठी असलेले वेगळे नियम. मला काही माहितीस्त्रोत सापडले पण तिथे सापडलेली माहिती उलट सुलट वाटली. इथे जर कोणी माहितगार असतील तर ही माहिती जाणुन घेण्यास नक्की आवडेल. धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी माहितगार नाहिये पण न्युजपेपरच्या कॉलम्स मध्ये अशी माहिती येत असे.
त्यात कॅपिटल गेन्स टॅक्स द्यावा लागतो असा उल्लेख आहे. त्याच्यात सुट मिळवण्यासाठी २ वर्षाच्या आत आपण नवीन घर घेत असेल तर फायदा होतो अशी त्रोटक माहिती आहे माझ्याकडे.

नात्या आम्ही मागच्या वर्षी फ्लॅट विकला.सी.ए. ने पुर्ण calculation करुन दिले.ज्या रकमेवर टॅक्स बसला ती रक्कम आम्ही सहा महिन्याच्या आत नवीन फ्लॅट मधे गुंतवली.आम्हाला फ्लॅट घेउन ५ वर्ष झाली होती.सीए सर्व माहीती देतात.long term capital gain tax account ला इंट्रेस्ट नसतो म्हणुन आम्ही ते account काढले नाही...I hope this helps you

सगळ्यांना धन्यवाद. मला जी माहिती आहे ती आज रात्री टाकतो. मवा, ती लिंक आवडली, नीट वाचायला हवी.