हुरहुर

Submitted by गणेश भुते on 26 September, 2008 - 11:15

Touching.jpg
कुणाचातरी आनंद वाटुन घेण्यासाठी आपण फुले भेट म्हणुन देतो.

हंगेरीची राजधानी - बुडापेस्ट येथील, ह्या फुले विकणार्‍या महिलेला बघुन मला दु:ख झाले कारण ती खुप थकलेली दिसली. या वयात विश्रांतीची गरज असताना काम करावं लागणं हे दुर्दैवच नाही का !

आनंद वाटण्यासाठी फुले विकणारी स्वतः आनंदी नाही ह्याची एक हुरहुर मनाला लागुन राहिली.

त्या आज्जींना सुख लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना...

--गणेश भुते

गुलमोहर: 

गणूभाऊ....सुरेख. छान टिपलयं.

गणेश,
फोटोपेक्षा त्यात टिपलेली भावना जास्त भावली...
मला ही वाईट वाटलं. Sad

खरय!
त्या आज्जींना सुख लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना...