लग्न समारंभ आणि भारतातले भाव..

Submitted by परदेसाई on 8 September, 2012 - 11:40

माझा एक मित्र मुलीचे लग्न भारतामधे बंगलोरला करतोय.. त्याच्याकडून मी ज्या गोष्टी ऐकतोय त्या अशा...
(लग्नाचे तीन दिवस , दररोज दोन तास. सगळे मिळून ६ तास)
DJ: एक सर्वसाधारण DJ. दिड लाख बिदागी, दोन Round Trip तिकीटे Hydrabad Banglore , तीन दिवस 4 Star + Hotel , एक A/c गाडी Innova आणि त्याबरोबर ड्रायव्हर. सर्वसाधारणपणे सगळे मिळून ४ ते ५ लाख.

Videographer साडे तीन लाख रुपये.

Flower Decor: १० लाख भरतीय फुले ते १८ लाख Orcids वगैरे.

पत्रिका: १०० रुपयापाससून ५००० रुपये प्रत्येकी.

हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं..
१. माझे भारताबद्दल (किमतींबद्द्ल) बरेच गैरसमज आहेत.
२. या मित्राला अमेरिकन म्हणून हे भाव सांगितले जात आहेत.

तुमच्या पैकी कुणी हल्ली मुंबई पुण्यात लग्न Arrange करण्यात भाग घेतला असेल तर माझे समज/ गैरसमज दूर करा...

विनय

तुमच्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खरच मजा येत आहे हा बीबी वाचताना. ते सोनु निगम, शान वगैरे ५० लाख घ्यायचे म्हणे लग्नात वगैरे कार्यक्रम करायला. ऐकलेले आहे, खखो, कमीजास्ती त्यांनाच माहीत.
ब्रॅड पीट-जेन नी लग्नात २००,०००$ ची फुले वापरली डेकोरेशन करायला. आता ते ५००मिलियन चे मालक, त्यांना हे काहीच नसेल. Happy ..

सशल Lol +१००००..
सिंडरेला +१ Happy
स्वानुभव: एकदा का लग्न ठरले की आमच्यासारख्या इंटरस्टेट लोकांना आपापल्या घरच्या पद्दधती दुसर्‍यास समजावणे, त्या पद्धती दुसर्ञास समजवायच्या म्हणजे आधी स्वतः समजून त्यामागे असलंच काही तर लॉजिक समजून घेणे, त्यानुसार कॉमन गोष्टी शोधून त्या २-२ दा होणार नाहीत याची खात्री करणे, आपापल्या घरच्यांना या लसावि लग्नावर पटवणे असे बरेच उद्योग करावे लागतात. एका बाजूला आपणच दोघे अन दुसर्‍या अन तिसर्‍या बाजूला दोन कुटुंबे Proud त्यात पुन्हा "तुझ्या मामीने माझ्या काकूला अमुक का म्हटले?" वगैरे आपली भांडणं वगैरे.. मग पुन्हा आपल्याला खरंच लग्न करायचेय ना? हे स्वतःला विचारुन दुसर्‍याला सॉरी म्हणणे अन कामाला लागणे. किमान वर्षभर हा प्रोजेक्ट चालतो. रिलेशनशिप भलतीच स्ट्राँग होते. Proud काय बिशाद एवढी मेहनत करुन केलेलं लग्न न टिकण्याची? इथे पैशाचा काहीएक संबंध नाही. हॉट एअर बलुन असो की अजून काही..

त्यात पुन्हा "तुझ्या मामीने माझ्या काकूला अमुक का म्हटले?" वगैरे आपली भांडणं वगैरे.. मग पुन्हा आपल्याला खरंच लग्न करायचेय ना? हे स्वतःला विचारुन दुसर्‍याला सॉरी म्हणणे अन कामाला लागणे. किमान वर्षभर हा ............एकदम मान्य .किमान वर्षभर नाही तर वर्षानुवर्ष हा प्रोजेक्ट चालतो .यात ससारमाहेर यांतील आगाऊ अजुनच रंग भरायला लागतात . मोठी जाऊ ,सासू बाईच्या बहिणी , पणजी असेल तर स्थिती फारच भयानक असते .
लग्न या निमित्याने अनेक हेवेदावे उफाळून येतात .सुशिक्षित लोक कुठल्या ही दर्जा पर्यंत जाऊ शकतात . माझ्या मावस बहिणीचे लग्न रोहिणीतुन ठरले. मुलगा अणि कुटुंब यांचे पलिकडे कोण relatives आहे याची कल्पना नव्हती . बहिणीच्या सासुबाईनी देण्याघेण्याच्या साड्यामध्ये एक सम्पूर्ण शुभ्र साडी घ्यायला सांगितली. ती त्यांनी मावशी कडुन स्वताच्या मोठ्या जावेला (बहिणीच्या चुलत सासू बाईना) दिली( ज्यांच्या पतीचे निधन एका वर्षापूर्वी झाले होते) असा परस्पर काटा (कुठल्यातरी मागच्या कुरापातींचा) काढला . पुढे कित्येक वर्ष चुलत दिराकडून बहिणीला एकूण घ्यावे लागले की तुमच्या माहेरून शुभ्र साडी देऊन आमच्या आईचा अपमान झाला .वास्तविक सासरचे सगळे लोक सुधारक, उच्च शिक्षित होते. सासू बाईंची आई सुद्धा रंगीत पातळ नेसत होती.

मला दबंग चित्रपटातले लग्न आवडले.

जो काय खर्च, कमी, जास्त करायचा तो दुसर्‍याच कुणीतरी केला, नि हिरो नि हिरॉइन आयत्या बोहोल्यावर चढून लग्न करून मोकळे. म्हणजे म्हंटले तर त्यांचे लग्न थाटात झाले म्हंटले तर एकहि पैसा खर्च न करता झाले.

आता तो सिनेमा फार लवकर संपला. नवीन जोडप्याचे प्रेम किती वर्षे टिकले वगैरे कळले नाही. टिकले असले तरी सांगता येणार नाही, थाटा माटात केले म्हणून, का एकहि पैसा खर्च न करता केले, म्हणून.
आशा आहे की दबंग-२, दबंग-३ असे चित्रपट काढतील, त्यातहि तेच हिरो हिरॉइन आहेत का कुणि दुसरीच बायको किंवा नवरा असला तर कळेल.
आतुरतेने वाट पहातो आहे.

>>>> wealth demonstration
<<

अरेरे..न्यु योर्क टाईम्स पण लेबलं लावते. आँ. Proud

हा धागा खूपच मनोरंजक आहे!

लहानपणी आम्ही ज्या काही थोड्याफार लग्नांना गेलो तेव्हा तिथे वर-वधूंना कितीतरी लोकांच्या पाया पडताना पाहून त्यांच्या दुखणार्‍या पाठींविषयी कळवळायचो व स्वप्नरंजन करायचो की ''सनम तेरी कसम'' मधील गाण्यातल्या कमल हसन व रीना रॉय च्या डान्ससारखं गोल गोल फिरणारं स्टेज असेल तर काय मज्जा येईल नाही? म्हणजे सर्व वधू-वर अशा स्टेजवर फक्त वाकलेल्या अवस्थेत उभे राहतील व ज्यांना नमस्कार करायचाय ती मंडळी स्टेजच्या भोवती उभी राहतील. एकाच फेरीत सर्वांना नमस्कार!! Lol इथे त्या स्टेजचा वापर वधूवरांनाच गरगरगरवण्यासाठी होतोय असं दिसतंय! Lol

अकु,
गरगरवल्यावर चक्कर येऊन पडतील ते जमिनीवरच ना. कुणीतरी असेलच तिथे. आयतं पाया पडणं पण होईल Wink

यासाठीच मी वरती म्हणलं होतं सर्कशीवर चक्कर फ्री पण बॉण्ड चिल्डे... Happy

अकु Lol

आयतं पाया पडणं पण होईल
अहो पण या मायबोलीवर मागे एक खूप मोठ्ठा वादविवाद झाला होता की नवरा नवरीने सर्व मोठ्या माणसांना लग्नात नमस्कार केलाच पाहिजे का? ही जुनी प्रथा आता मोडून काढली पाहिजे वगैरे. बर्‍याच जणींनी आम्ही नमस्कार करणार नाही असे सांगितले होते. त्यांच्यापैकी कुणि पडले नि नमस्कार 'झाला' तर?
(जणांना काही त्रास नव्हता) Light 1 Light 1

केवळ यासाठी दबंग पाहिन म्हणते. म्हणजे 'परत' पाहीन, असे म्हणायचे आहे का? कारण 'दबंग' पाहिला नाही तर भारतीय नागरिकत्व काढून घेतले जाते असे ऐकले! मागे मी हम आपके कोई नही, का तुम मेरे कोई नही हा सिनेमा पाहिला नव्हता, तर मला भारतात फार त्रास झाला. Happy

नाही हो झक्की मी दबंगच काय हम आपके है कोन पण पाहिला नाही. १-२ वर्षांपूर्वी टिवीवर अधून मधून मैने प्यार किया पाहिलाय.
मला अजून एन आर आय स्टॅटस मिळालं नाही.
आता बहुदा लेकी-जावयाबरोबरच परदेशी जाईन. Happy

त्याला बरीच वर्षे लागतील हो! त्यापेक्षा आत्ताच बघून घ्या. परदेशात आल्यावर ते सिनेमे कळत नाहीत. नट नट्या ओळखू येत नाही, मग सारखे 'हा इथे कसा? ' हिला रडायला काय झाले?' असले प्रश्न विचारत बसावे लागते.

अर्थात सिनेमातच, काय प्रत्यक्षात हि कधी कळलेले नसते की बायका रडतात का, हसतात का, काय करतात, का करतात? Happy

भारतातले लग्न खर्चाचे भाव नको असतील तर ब्रुने मध्ये भाव काय आहेत ज्यांना माहीती करून घ्यायचेय त्यांच्यासाठी....

http://shine.yahoo.com/photos/sultan-bruneis-daughters-wedding-might-sli...

Proud

आता सांगोपांग चर्चा घडु द्या... प्रत्येक मुद्द्यावर. Wink

जसे की,
काहींना ब्रुनेच्या सुलतानच्या घरची माहीती असेल (असा दावा करणार्‍यंना) संधी आहे, की हा नक्की काळा पैसा आहे की सफेद? Proud किंवा इकडच्या आयडिया घेवून थीम कशी वापरात आणू शकतो किंवा आपले विचार किती मौलिक आहेत लग्न खर्चावर, कुजकट/बुरसट नाहीत वगैरे वगैरे... संधी चुकवू नका. Rofl

पन हि लिंक मस्त आहे,
http://shine.yahoo.com/love-sex/20-things-learned-blogging-wedding-18070...

mazya putaniche 14th Feb 2014 la lagna aahe, kanyadan amhi ubhayta karnar aahot parantu lagana adhi chi purva tayari kay karavi, tech samjat nahi jankarani pls madat karavi ha prashna kuthe vichara te samjat nahi chukichya thikani vicharla aslyas admin krupya yogya jagi halvava jankarni margadarshan karave.

Pages