पुण्यात कोणत्या ऑर्थोपेडीक डॉक्टरांकडे जावे?

Submitted by मिनू on 2 August, 2012 - 02:22

मला कृपया कोणी लवकरात लवकर पुण्यातील चांगले ऑर्थोपेडीक डॉक्टर सांगेल का?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डॉक्टर आशिष बाभुळकर
3, Anant Apartment, 64/10, Income Tax Lane, Off Karve Road, Erandwana, Erandawane, Pune, MH 411004

020 25450404

Dr. Karne
Krishna Chambers,
Opp Laxmi Narayan Theatre,
Pune Satara Rd, Nr Swargate,
Mukund Nagar,
Pune, 411037.
Phone: +91-20-24264213, 24265149, 24265148, 09822036724

डॉ. हर्डिकर
1160/61, Opp Hotel Pride, University RD,
Shivaji Nagar, Pune - 411005
Call: +(91)-20-67281295

व्याधी नेमकी काय ते सांगितल्यास अधिक नेमकेपणाने डॉक्टर सुचवता येतील.
गेल्या पाच वर्षांपासून पुण्यामुंबईतल्या अनेक् ऑर्थोपेडिक डॉक्टरांचे अनुभव आणि उपचार घेतले आहेत.

माझ्या अनुभवाप्रमाणे पुण्यात कोणत्याही अस्थिरोग तज्ञाकडे जाऊ नये, मुंबईतील डॉ. शेखर भोजराज हे यासाठी सर्वोत्तम आहेत (त्यांचे पुण्यात कोणी असिस्टंट आहेत मला नाव माहीत नाही, शोधावे लागेल) त्यांना दाखवा. तुम्हाला हवा असल्यास शेखर भोजराज यांच्या हॉस्पीटलचा नंबर देईल.

माझ्या अनुभवाप्रमाणे पुण्यात कोणत्याही अस्थिरोग तज्ञाकडे जाऊ नये>> अगदी सहमत.
मुंबईतील डॉ. लाड आणि डॉ. संजय अगरवाल (९८६९४८०७०७)
दोघेही अगदी योग्य सल्ला देतात.
(निदान सेकंड ओपिनिअनकरता तरी जरूर जा)

सागर,सारिका असे का म्हणता ? माझा अनुभव खुप चांगला आहे. डाॅ. रणजीत देशमुख. म्हात्रे पुलावरून एटी फिट रोड कडे जाता ना पहिली डावी कडची पहिली गल्ली. २४५३८२४१

माझ्या अनुभवाप्रमाणे पुण्यात कोणत्याही अस्थिरोग तज्ञाकडे जाऊ नये>>>>>
हे जरा अतीच होतय.

डॉ. अभय कुलकर्णी यांचा मला तरी चांगला अनुभव आहे माझ्या फ्रो़झन शोल्डर साठी. ते सह्याद्री हॉस्पिटल मधेही असतात.

DR Abhay Kulkarni

+(91)-20-67289736

1ST Floor Soham Complex, Above Shiv Sagar Restaurant Near Parihar Chowk, D P Road, Aundh, Pune - 411007

सागर,सारिका असे का म्हणता ?>>

म्हणूनच विचारलं होतं की नेमकी व्याधी काय आहे ते..
व्याधी मोठी/सिरीअस असेल तर शेवटी ज्यांच्याकडे 'रेफर' केले जाते अशा डॉ संचेती, डॉ.वाकणकर, डॉ. हर्डीकर, डॉ. केळकर आणि डॉ. बागेवाडीकर (आयुर्वेदिक) यांच्याशी माझं प्रत्यक्ष consult करून झालयं, अनुभवही घेऊन झालेत.

ही मंडळी दिशाभूल करतात असं माझं अजीबात म्हणनं नाही.
पण नी रिप्लेसमेंट अथवा स्लिप डिस्क यांसारख्या व्याधींवर हे डॉक्टर्स (आणि त्यांचे ज्युनिअर) तात्काळ सर्जरीचा पर्याय सुचवतात जो बर्‍याचदा तेवढा गरजेचा नसतो.

(आर्थिक लाभ/लोभ यांचा विचार न करता) डॉ लाड, डॉ संजय अगरवाल ही मंडळी शक्यतो टोकाचे उपाय (सर्जरी/रिप्लेसमेंट) जास्तीत जास्त टाळतात. खरं तर एका सर्जरी/रिप्लेसमेंटमधून यांची बरीच अर्थप्राप्ती होते.

चार वर्षांपूर्वी पुण्यातील एका नावाजलेल्या डॉक्टरांनी मला 'तात्काळ सर्जरी' सुचवली होती. सेकंड ओपिनिअनकरता मुंबईला गेल्यावर डॉ लाड आणि डॉ अगरवाल दोघांनी तातडीच्या सर्जरीची गरज नसल्याचे सांगितले आणि गेली चार वर्ष मी त्या सल्ल्याने अगदी उत्तम अवस्थेत आहे.

महत्वाचा मूद्दा- व्याधी तीव्र असेल तर सेकंड ओपिनिअन घ्या.
आणि हो, हा 'सत्यमेव जयते' इफेक्ट नाही !
याच व्यवसायात माझा भाऊ जो स्वतः ऑर्थोपेडिक आहे (आणि हर्डीकरांचा असिस्टंट होता) त्याने ही माहिती चार वर्षांपूर्वी दिली होती.

माझ्या बहिणीचं पर्ल अ‍ॅन्ड ऑयस्टर या प्रसिध्द हॉस्पीटल मध्ये पाठिच्या कण्याचं ऑपरेशन झालं.. याआधी तिने संचेती, रुबी हॉल आणि मग पर्ल ऑयस्टर असा प्रवास केला, तिला ऑपरेशन नंतरही त्रास पुन्हा सुरु झाला म्हणून साबांचे जुने डॉक्टर शेखर भोजराज यांच्याकडे दाखविले, (आधी या डॉक्टरांचे नाव साबांनी सुचविले तर तिच्या अती शहाण्या सासरच्यांनी दुर्लक्ष केले) त्यांनी डायनॅमिक एम आर आय काढायला सांगितले.. त्यात तिच्या केवळ नसा दबल्याचे दिसले.. (तिचे आधी ऑपरेशन केले नसते तर जास्त चांगले झाले असते असेही त्यांनी सांगितले) त्यासाठी तिला इंजेक्शन आणि थोडे स्टेरॉईड घेणे अनिवार्य होते.
यासोबत मात्र पाठिच्या कण्यासाठीचे व्यायाम करणे आणि वजन आटोक्यात ठेवणे अनिवार्य आहे, यासाठी मात्र मी पुण्यातले डॉकटर सुचविन..
पुण्यात मला स्वतःला डॉ. कर्णे, डॉ. राघव बर्वे यांचा तितकासा चांगला अनुभव आला नाही..
मी स्वतः पुण्याचीच आहे, तरीही मी डॉ. भोजराज हेच नाव सुचवेन.
(बहिणीबद्दल लिहीले आहे त्याचा उद्देश तुम्हाला घाबरविणे असा नाही तर एक अनुभव म्हणून लिहीले आहे, सर्वांनाच असे अनुभव येतातच असे नाही.. जास्त काळजी करू नये.. )

डॉ. भोजराज मुंबई यांचे असिस्टंट डॉ. गौतम हेही मुंबईतच असतात त्यांचा क्रमांक देत आहे, गरज पडलीच तर गौतम स्वतः भोजराज यांचा अपॉइट्मेंट घेऊन देतात..
डॉ. गौतम ९९२०४७३३५३

सारीका..

माझ्या ओळखीतील डॉ. श्रीकांत वाघ हे पुण्यातील चांगले अस्थिरोगतज्ञ व र्‍हुमेटॉलॉजिस्ट आहेत. सेकंड ओपिनियन साठी त्यांचा सल्ला जरूर घ्या.
http://www.arthritis-india.com/

<माझ्या अनुभवाप्रमाणे पुण्यात कोणत्याही अस्थिरोग तज्ञाकडे जाऊ नये>> +१००.
second opinian म्हणुन का होइना मुलुंड मधील dr. Mukhi- Raj hospital यांना तरी भेटावे.
पुण्यामधे स्वारगेट च्या आधिच्या सिग्नल ला, पंडित ऑटो. जवळ, डॉ. रागिणी भिंगारकर आहेत.

mumbaiche dr. nanavati(villeparle) kase aahet ? kunala kahi anubhav aahe ka ? asel tar plz ithe share kara

डॉ. आनंद केळकर व डॉ. राहूल नेर्लीकर (डॉ. केळकरांचे जावई) - डॉ. केळकर नर्सिंग होम, मेन प्रभात रस्ता, पुणे.
डॉ. केळकर हे जेष्ट डॉ. आहेत. अनुभवही मोठा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे सोपे ऊपाय असतील तर ते प्रथम सजेस्ट करतात (माझा स्वानुभव). खीसा जास्त कापला जात नाही. Happy

संचेतींबद्दल कुणीच का बरं लिहीलेलं नाही ?

सातारा रोडला विवेकानंद पुतळ्याजवळून जो रस्ता आत जातो तिथे डॉ भगली हे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. सुरुवातीला ब-याच जणांनी नाव सुचवलेलं होतं तरी दुर्लक्ष केलं होतं. पण आई वडिलांची ट्रीटमेंट घेतली. अनुभव चांगला आला. शक्यतो शस्त्रक्रिया टाळण्याकडे भर आहे. मणक्याचे आजार वगैरेंवर किमान सेकंड ओपिनियन म्हणून कन्सल्ट करायला हरकत नाही.

पोस्टल अ‍ॅड्रेस आता देऊ शकत नाही. फोन नंबर सापडला तर देईन.

डॉ . देसाई .... निलायम टोकिज कडुन स प महाविद्यालया कडे येणे.... डाव्या हाताला रस्त्यावरच पाटी दिसेल ..... डॉ . मस्त अनुभवी आहेत ....