लाटा...

Submitted by vasant_20 on 31 July, 2012 - 23:04

धावत, पळत, उसळत, आदळत
लाटा येतच असतात
किनारयाला हरवायला...

कधी एकमेकांवर आदळून
कधी एकमेकांत मिसळून
किनारयाकडे पळतच असतात

कधी मध्येच संपतात,
कधी थोडक्यात हुकतात, तर
कधी पोहचतातही किनारयावर..!!!

मग त्या हसतात, पण क्षणभरच!
कारण त्यांना दिसतो
ओलाव्याच्या पुढे निर्माण झालेला
नवीन किनारा...!!!

गुलमोहर: