मला सुचलेले कांही...

Submitted by गणेश कुलकर्णी on 27 July, 2012 - 09:28

१) आकाशात भरारी मारणारे आपण जमिनीवर असताना लहान लहान गोष्टीकडे किती दुर्लक्ष करतो!
आणि परत उंच उंच भरारी घेताना आपणच म्हणतो....मला प्रत्येक मोठी गोष्ट लहान लहान का दिसते आहे?

२) खंत म्हणजे आपले आणि परिस्थितीचे एका "Wavelength वर” नसणे!

३) जो पर्यंत तुम्ही एखादी गोष्ट "वेडे होऊन” करत नाहीत, तो पर्यंत शहाणे लोक तुम्हाला “खडे होऊन" दाद देणार नाहीत.

४) आवाज वाढवून मोठ्याने बोलले म्हणजे प्रत्येक गोष्ट खरी असते/होते असे नाही, नाहीतर आपला देश खूप सुधारला असता....संसदेच्या दररोजच्या आरडाओरडीमुळे !!!

५) ज्यांच्या लग्न पत्रिकेत मंगळ आहे...त्यांनी पृथ्वीवर लग्न करण्यापेक्षा "मंगळावर" लग्न करावे म्हणजे सगळे 'मंगल " होईल. कारण पृथ्वी वर आजकाल सगळे अमंगल होत आहे ...!

६) प्रेयसीच्या मिठीतला प्रियकर आणि नशेच्या आधीन होऊन बुडून गेलेला प्रियकर माझ्यामते दोन्हीही सारखेच! दोन्हीतही नशा आहेच पण त्या त्या नशेचा परिणाम मात्र वेगळा! मिठीतला 'आबाद' होतो तर नशेतला 'बरबाद'......!!!

७) आता प्रयत्न करतो दगड बनायचा....म्हणजे काय होईल मी माझ्या मनातले कुणाला बोलू शकणार नाही आणि कुणी त्यांच्या मनातले मला! फक्त कुणाच्यातरी एकटेपणात पाण्यावर भिरकावले गेल्यावर कमीत कमी ४- ५ तरी छान दूरवर तरंग निर्माण करायचे....त्यांच्या क्षणभंगुर आनंदसाठी !!!

८) जेव्हा तुम्ही कुणाच्या घरचे "मीठ " खाऊ शकता, तेव्हाच तुम्ही त्या घरातल्या लोकांना "नीट" समजून घेऊ शकता !

९) इथं प्रत्येक जण सुरातून गाणे गायचा प्रयत्न करतो, ज्यांचे सूर आतून लागतात तेच 'गायक' होतात. बाकीचे त्या गायकाचे गाणे ऐकायला कानाने 'लायक' होतात.

१०) लोकं दु:खी असूनही 'मी सुखी आहे’ म्हणतात....आणि खरेच सुखी झाल्यावर 'मी दु:खी आहे" म्हणतात. किती हा खोटेपणा !

११) कुण्याही गोड व्यक्तीने कडू कारले तुम्हाला खायला दिले तर ते कारले तुम्ही जरूर खाऊन घ्या कारण आज काल गोड माणसांची साथ कमी होत आहे.

**************
गणेश कुलकर्णी (समीप)
**************

गुलमोहर: