एक आठवण टीव्ही ची !!!

Submitted by Mandar Katre on 26 July, 2012 - 04:36

२०-२५ वर्षापूर्वीची आठवण आहे
तेव्हा टीव्ही वर १-२ channel च दिसायचे ,केबल/डिश वगैरे नव्हत्याच !
आमचे गाव मुंबई पासून ३५० किमी व गोव्या पासून २५० किमी वर आहे
त्यामुळे पणजी channel च थोडेफार दिसायचे
पण ते दिसण्यासाठी कायकाय भानगडी करायला लागायच्या !
एक तर १२ फुटी १३ काड्यांचा antenna १५० फूट उंचावर उभा करायला लागायचा ! त्याला परत बुस्टर वगैरे ,त्याची एवढी मोठी लांब केबल .त्यासाठी लोखंडी पाईप /बांबू .पुन्हा ते एवढे सगळे हलू नये म्हणून मोठ्या उंच झाडावर व्यवस्थित बांधायचे!
आमच्याकडे पावसाळ्यात पावूस व वारा प्रचंड असायचा
त्यामुळे antenna ची दिशा स्थिर राहत नसे
मग झाडावर चढून हे सगळे धूड antennaचे फिरवून पुन्हा दिशा व्यवस्थित सेट करायची !
एवढे सगळे करूनही पुन्हा दोन दिवसांनी प्रोब्लेम यायचाच!
आमच्याकडे फक्त सकाळी ९ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ६ नंतर सिग्नल व्यवस्थित यायचे...इतर वेळी टीव्ही बंद!
पण इतका सगळा त्रास आणि मेहेनत घेवून माझे बाबा टीव्ही चालू करायचेच!
हौस दांडगी !
त्यात पुन्हा दर वर्षी १-२ वेळा तरी antennaला बुरशी पकडल्या मुळे/ गंजल्या मुळे खाली उतरवून साफ-सफाई करून पुन्हा वर चढवायचे!

आज डिश टीव्ही /डीटीएच आल्यावर आपण किती सहजपणे टीव्ही पाहू शकतो !पण त्या वेळचे दिवस आठवल्यावर टीव्ही पाहणे किती कठीण होते ,हे समजते !
त्यावेळी रामायण-महाभारत आणि शनिवार-रविवार चे चित्रपट पहायला अख्खा गाव आमच्या घरी जमा व्हायचा !
मी त्यावेळी काही अफलातून शोध ही लावले होते !
आमच्या घरच्या साध्या antenna वर ओमान ,सौदी ,दुबई तसेच मेट्रो channel , चायना /नेपाल चे काही channel पकडून दाखवले होते!
त्याबद्दल मला अमेरिकेतील WORLD RADIO/TV/FM DX ASSOCIATION आणि UNIVERSAL RADIO RESEARCH या रेडियो -प्रेमी संघटने कडून प्रशस्ती-पत्रक ही मिळाले होते !

तर अशा या काही आठवणी!!!

गुलमोहर: 

खरंय आजकाल आयुष्य बरंच सोयीचं झालंय. माझी बहीण १२वी पास होईपर्यंत आमच्याकडे टिव्ही नव्हता. बर्‍यापैकी लहान असताना बाबांच्या एका मित्राकडे गेले होते तेव्हात त्यांच्याकडे टिव्ही होता.. मी त्याला म्हणलं अरे वेगळं चॅनल लाव ना.. तो फिदीफिदी हसला होता माझ्यावर. कराण मला रेडिओसारखी टिव्हीला पण बरीच चॅनल्स असतात असं तेव्हा वाटलं होतं.

Happy .आमचे ऑफिसमध्ये परवाच या विशयावर बोलणे झाले.

मी तर मुम्बैत वाढले.आमच्या बिल्डिंगच्या गच्चिवर अ‍ॅन्टिना होती (म्हणजे सगळ्यांच्याच टीव्हीच्या तिथेच असायच्या)
पावसाळ्यात picture quality बिघडली की बाबा धुणे वाळत घालायची काठी घेउन गच्चीवर जायचे.
मग बहिण घराच्या दारात उभी रहायची टीव्हीकडे लक्श देउन , मी विंगच्या बाहेर बाबांना गच्चीवरून दिसेल अशी.बाबा पहिल्यांदा काठीने अ‍ॅन्टिना वाकडी करून त्यात साचलेले पाणी ओतुन टाकायचे.मग काठीने ती अ‍ॅन्टिना गोल फिरवत योग्य दिशेत आणायचा प्रयत्न करायचे .मग मला हातवारे करून विचरयचे - मी बहिणीला - ती टीव्ही बघत मला - मी बाबांना .मग मध्येच कधी व्यवस्थित दिसु लागलं की बहिण मला ओरडुन सांगायची - मी बाबांना .
सगळं आठवलं Happy

.

साध, सोपं जीवन होतं...
छायागीत, चित्रगीत, चित्रहार... काळ सुखी होता.... Happy

मी त्यावेळी काही अफलातून शोध ही लावले होते !
आमच्या घरच्या साध्या antenna वर ओमान ,सौदी ,दुबई तसेच मेट्रो channel , चायना /नेपाल चे काही channel पकडून दाखवले होते!
त्याबद्दल मला अमेरिकेतील WORLD RADIO/TV/FM DX ASSOCIATION आणि UNIVERSAL RADIO RESEARCH या रेडियो -प्रेमी संघटने कडून प्रशस्ती-पत्रक ही मिळाले होते ! >>>>
वा मंदार - विशेष अभिनंदन या सर्व गोष्टींकरता.......