मुलगा खूप चिडचिड करतो

Submitted by कॅप्ट्न एम on 25 July, 2012 - 17:11

माझं मुलगा अडीच वर्षाचा आहे. अलीकडे फार चिडचिड करतो. काही मनास येत नाही. उदा. काही हवा आहे का विचारला तर नको असं म्हणेल. नंतर १ मिनिटाने तेच हवाय असं म्हणेल. त्यानंतर दिलं तर पुन्हा ठेवायला लावेल. १ मिनिटाने पुन्हा काढायला लावेल. आणि तो बोबडे बोलतो, ते आपण पुन्हा बोलायचं नीट. त्यात आपण चुकलो (कधी कधी नाही समजत बोबडे) तर जोर जोरात रडून गोंधळ घालतो. रात्री सुद्धा उठून बसतो, आणि काहीतरी सांगतो. झोपेत त्याला नीट सांगता येत नाही, आपल्याला नीट कळत नाही. त्यावरून मोठ्या मोठ्याने रडत बसतो. खायला अशीच कटकट, लाईट बंद केलं तरी बोंबाबोंब. लावला तरी आरडा ओरड, का लावला म्हणून. पाणी हवा असेल तर ग्लास पूर्ण भरला का नाही म्हणून रडतो, मग पूर्ण भरला तरी अजून भरून हवा असतो. रात्री उशी अशीच का ठेवली, तशीच का नाही, यावरून रडारड. काही कळत नाहीये.

हे सगळं नॉर्मल आहे का?
सगळी मुळे थोड्या अधिक फरकाने या वयात असच वागतात का?
या रडारडी मध्ये, आमचा पार चढतो. कसं काय समजवायचं?
काही टिप्स?

अनुभवी मा.बो.कडून काही मार्गदर्शन मिळेल काय?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम नॉर्मल आहे.
पहिलीच्या वेळी मी पण गांगरुन गेले होते.
१) प्रत्येक निर्णय हा मुलांना स्वतःचा वाटला तर ते ऐकतात. तुम्ही त्याच्यासाठी उशी ठेवायैवजी, सोन्या तु उशी कशी ठेवतो असे बोलुन त्याला ठेउ द्या आणि मग लक्ष नसताना नीट करा.
२) डोके एकदम थंड ठेवा आणि माझ्या एका मैत्रिणीचा लॉ सान्गते

summation of all the trouble kid gives in life is constant.

यामुळे टेरिबल टु जास्त त्रासदायक असतील तर पुढे जास्त आनंद मिळेल.

घरात कुणी चिडचिडं आहे का ? असेल तर काळजी करू नका.... मात्र अशा स्वभावाला आवर घालण्यासाठी थोडा मोठा झाल्यानंतर निश्चित प्रयत्न करा.

बर्‍याचदा मुलं कुणाचंतरी कॉपी करत असतात. आपल्या वैयक्तिक ताणामुळे कधीकधी आपली छोट्याछोट्या गोष्टींनी चिडचिड झाली की मुलं ते लक्षात ठेवतात आणि ताण आलं की असं करायचं असतं हे मनाशी ठरवतात.
(तुम्ही असं वागत असाल असं मला म्हणायचं नाहीये. जनरल वाक्य.)
केअरटेकर्समध्ये अचानक बदल, नवीन शाळा, ही अजून काही कारणे.

काही वेळा हे अटेन्शन सीकिंग असतं. तो चिडल्यावर आपण त्याच्या खूप पुढेपुढे करतो किंवा आपल्याला त्रास होऊन आपल्या गप्पांमध्ये वारंवार त्याच्याबद्दल चर्चा होत असेल तर मुलांचा उद्देश साध्य होतो.

आमच्यापुरता आम्ही केलेला उपाय -
मुलगा चिडचिड करून, आक्रस्ताळेपणा करून काही सांगायला लागला की आपण आपलं हातातलं काम न थांबवता त्याच्या नजरेत नजर घालून सांगायचं "मला ही चिडचिडीची भाषा समजत नाही. तू शांतपणे सांगितलंस तर मी तुझ्या शब्दांचा अर्थ लावू शकेन."
हळुहळू चिडचिड कमी होत जाते.
(पण इतकं शांत राहताना आपला कस लागतो कधीकधी)

इथे आणखी चर्चा आहे. (रिक्षा नाही. पण बर्‍याच जणांनी आपापले अनुभव लिहिले आहेत. त्यामुळे काही फायदा होतोय का बघा. :))

वरच्या सगळ्यांना अनुमोदन.

या वयासाठी हे अगदी नॉर्मल आहे. हेच्च नको, तेच्च नको, अमुक आणि ढमुक. रडारड वगैरे.
साधारण साडेतिन्चार वर्षाचे वय होईपर्यंत निवळेल. Wink (किंवा तुम्हाला सवय होईल. जोकिंग) Proud

- कमी रागवायचा प्रयत्न करा शक्यतो. तो लहान आहे की तुम्ही? Wink
- रागावलात तरी राग धरुन बसु नका. त्याला नाही कळणार, तुम्ही का रागावलात ते.
gentle but firm रहा शक्यतो. एखाद दोनदा आक्रस्ताळेपणा केला की हवे ते मिळतेच ही चुकीची समजूत आहे हे त्याला कळेल.
- खेळायला कुठे जातो का (प्ले स्कुल वगैरे)? जरा एनर्जी वापरल्या जाईल. मित्रमैत्रिणी मिळतील.

धन्यबाद सर्व प्रतिसादासाठी. आम्हाला मोठी मुलगी आहे. तिने असा त्रास दिला नव्ह्ता. त्यामुळे काळजी वाटली. काय करायचे ते आता कळलय.