स्वप्नांचा वारसा .....

Submitted by यशू वर्तोस्की on 23 July, 2012 - 05:13

राजेश खन्ना आता आपल्या मध्ये नाहीत .....राजेश खन्ना ने पडद्यावर जिवंत केलेला गुलाबी नायक आज हि सर्व रसिकांच्या मनावर आपली मोहिनी जिवंत ठेवून आहे . मान तिरपी करून डोळ्यांची वेगळीच हालचाल करत राजेश पडद्यावर दिसला की तरुण तरुणीच्या काळजाचा ठोका चुकत असे. त्याला दत्तक घेतलेल्या आई वडिलांच्या लाडात राजेश उर्फ जतीन जगत होता . हिरो होवून पडद्यावर " कोरा कागज था ये मन मेरा " आणि मेरे सपनो की रानी कब आयेगी तू " म्हणताना एक सुपर स्टार चा जन्म झाला. त्यानंतरचे दशक राजेश खन्ना चे होते . एका मागोमाग हिट सिनेमे देवून तो लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाला . भारतातील प्रत्येक तरुणाला त्याच्या सारखे बनावे असे वाटत होते आणि प्रत्येक तरुणी आपल्या प्रियकरा मध्ये त्याची झलक शोधात होती.
इतकी लोकप्रियता लाभलेला राजेश प्रत्यक्ष जीवनात माणूस म्हणून फार चांगला नव्हता. अंजू महेंद्रू ची केलेली फसवणूक असो किंवा निर्माता दिग्दर्शक यांच्या बरोबर केलेली बेशिस्त वागणूक असो . त्याच्या यशा बरोबर हे सारे सहन केले गेले . डिम्पल बरोबर केलेले लग्न असो त्याबरोबर तिला दिलेला मनस्ताप असो त्याच्या कोत्या मनोवृत्तीचे दर्शन ठीक ठिकाणी होत होते.
जंजीर पडद्यावर झळकला आणि राजेश खन्ना युगाचा अंत झाला भारतीय चित्रपट दुनियेतील महानायकाचा जंन्म झाला . अमिताभ बच्चन या रूपाने अतिशय गुणवान ...व्यावसायिक ....आणि शिस्तबद्ध व्यक्तिमत्व लोकांसमोर आले . पडद्यावर आक्रमक आणि बंडखोर भूमिका रंगवणारा अमिताभ वैयात्तिक आयुष्यात अतिशय संवेदनशील ...सुसंस्कृत होता. त्याच्या पडद्यावरच्या आणि पडद्या बाहेरील रुपांवर रसिकांनी मनभरून प्रेम केले. राजकारणातील प्रवेश ...रेखा प्रकरण सोडले तर अमिताभची छबी सामान्य लोकांच्या मनातून कधीही उतरली नव्हती. बोफोर्से ची राळ पचवून आणि राजकारणाला राम राम ठोकून अमिताभ सेकंद ईनिन्ग सुरु करून अलगद आपल्या जागी विराजमान झाला . आपल्या पडत्या आर्थिक काळात छोट्या पडद्यावर कोन बनेगा करोडपती सारख्या कार्यक्रमातून त्याने यशस्वी पदार्पण केले. दाढी वाढवलेला आजोबा दिसणारा ....चीनी कम ...पा या सारखे वेगळे प्रयोग करणारा अमिताभ आजही लोकांच्या आकर्षणाचा विषय आहे . निशब्द सारखी भूमिका त्याला मिळावी यातच त्याचे मोठेपण दडलेले आहे. भारतीय चित्रपट दुनियेत अमिताभ महानायक झाला त्याला अढळपद प्राप्त झाले. आजही असंख्य तारे तारकांच्या मांदियाळीतही नंबर वन कोन ही चर्चाच रंगत नाही . किंग शाहरुख असो... दबंग सलमान असो ...खिलाडी अक्षय असो किंवा ग्रेट अमीर असो सगळे नंबर दोन चे हक्कदार .

राजेश खन्ना गुणी कलाकार होता यात शंकाच नाही . परंतु जनतेने त्याच्या पडद्यावरच्या भूमिकांवर प्रेम केले . अमर प्रेम ...आनंद ..बावर्ची .या सारखे सिनेमे त्याच्या डायालोग डिलेव्हरी साठी पुन्हा पाहावेत. किशोर कुमारचा प्लेबाक आणि मधुर संगीत याचाही राजेश खन्नाच्या यशात मोठा सहभाग आहे . गुल छबू नायकाचा हाच वारसा पुढे ऋषी कपूर ने यशस्वीपणे चालवला. आमीर खान ....रितिक रोशन ...आणि आता रणबीर कपूर असे नव्या दमाचे प्रेमपटू पुढे आले आहेत थोड्याफार फरकाने हा वारसा असाच पुढे जाणार.

प्रिय राजेश खन्ना .....तुझ्या नावाने नाही तर तू पडद्यावर रंगवलेल्या आमच्या हळुवार भावनांच्या स्वप्नांचा रूपाने आणि तू दिलेल्या त्या सुंदर अनुभवांच्या वाराश्याच्या रूपाने तू अजरामर झाला आहेस. या पुढेही रुपेरी पडद्या वर प्रेम..प्यार ..दिल..धडकन ..असे शब्द उच्चारले जातील त्या प्रत्येक वेळी तू तिथे असशीलच ...

गीत मेरे सुनकर नौजवान जागते हैं ...निंद नाही आती अरमान जागते हैं ...
थाम के दिलको हाथो मे जलते हैं बरसतो मे ...
मै आय हुं लेके साज हाथो मे...मैफिल की मस्तानी ...मस्तानी रातो मे....

LONG LIVE THE FIRST SUPERSTAR

यशोधन वर्तक

गुलमोहर: 

यशोधन वर्तक जी : हे लेखन इथून काढा. ......'अप्रकशित' करा

बेफीजींनी यावर धागा काढला आहे तिथे हे लेखन कॉपी-पेस्ट करून प्रतिसाद म्हणून द्या
हे तिथेच योग्य आहे

http://www.maayboli.com/node/36514