लाईफ हिस्टोग्राम

Submitted by यशू वर्तोस्की on 23 July, 2012 - 05:00

" how much land does a man need “ . प्रसिद्ध रशियन विचारवंत लिओ टोलस्टोय याची एक कथा आहे . कथा सूत्र काहीसे असे आहे की एका माणसाला हे बक्षीस मिळते की तो पहाटेपासून संध्याकाळ पर्यंत जेव्हडे अंतर पायी काटू शकेल तेव्हढी जमीन त्याला मिळेल . तो माणूस भल्या पहाटे चालायला सुरुवात करतो , काही वेळानंतर त्याला आपला वेग कमी वाटू लागतो म्हणून तो पळू लागतो खूप धाप लागते तरी हावऱ्या सारखा पळतच राहतो . खूप पळाल्यावर त्याला प्रचंड धाप लागून खोकल येतो रक्ताची उलटी होवून तो मरण पावतो . खरी गोष्ट अशी असते की त्याला आवशक असलेली जमीन त्याल कधीच मिळालेली असते .
आपण आपल्या व्यवसायातील , शिक्षणातील किंवा कुठल्याही प्रगतीचे रिप्रेझेन्तेशन प्रोग्रेस हिस्टोग्राम मध्ये करत असतो . त्यावर चर्चा करत असतो तो पाहून आनंदी किंवा दुखी होत असतो. असे म्हणाना की आपल्या आयुष्यातील जवळ जवळ ९० टक्के भाग अश्या वेग वेगळ्या हिस्टोग्राम ने व्यापलेला असतो. आणि मुख्य म्हणजे आपण नकळत आणि बऱ्याच प्रमाणात कळतही या हिस्टोग्रामच्या जंजाळात स्वतःला गुंतून टाकतो.
काही जण असाही विचार करतील की हे काही खरे नाही आम्ही वर्षातून दोनदा तरी काश्मीर , राजस्तान , केरळ ...पुढे जावू युरोप ...बाली...श्रीलंका ..ऑस्ट्रेलिया वगैरे ठिकाणी जावून येतो मग आम्ही हिस्टोग्रामचे गुलाम नाही. कमीत कमी महिन्यातील दुसर्या आणि चवथ्या आठवड्याला बाहेर फिरायला जातो . काही वाईट नाही. पण एकदा आठवून पाहूया की अश्या निवांत वेळी आजूबाजूचा निसर्ग पाहून आपल्या मनात काय विचार येतात . मी नक्की सांगतो आपण असे सर्व असाच विचार करत असणार की हा निसर्ग कायम आपल्या बरोबर असता तर किती बहार आली असती. नुसता निसर्गच नाही तर आपली पत्नी मुले अश्या निवांत क्षणी आपल्या सहवासात काही अनमोल क्षण देवून जातात जे पुढच्या आयुष्यात आपल्या सदैव लक्षात राहतात. आता हेच बघाना आपण आपल्या लग्नाच्या सुमारास काही आर्थिक दृष्ट्या इतके ज्याला सेटल म्हणतात तसे नसतो , परंतु बऱ्या परिस्थितीत आल्यावर आपल्यात लग्न होते . त्यावेळी बहुतेक जणांची परिस्थिती हि काशिमीर किंवा युरोप वगैरे करायची नसते ..त्यामुळे आपण हनिमून ला जवळच जसे माथेरान ...महाबळेश्वर किंवा अगदी उटी वगैरे ठिकाणी जातो . आता ते दिवस आठवा आता जरी आपण अगदी चंद्रावर फिरायला जावू शकलो तरी खंडाळ्याला , माथेरानला किंवा अगदी गेला बाजार कोल्हापूरला देखील घालवलेली हनिमुनचे दिवस जास्त चांगले वाटतात . काही वेळा तर असा विचार मनात येतो की शक्य नाही म्हणून नाहीतर हवी तेव्हडी किमत देवून सुद्धा आपण ते दिवस पुन्हा मिळवायचा प्रयत्न करू.
आता आपण ज्याला आउटिंग म्हणतो त्यात मजा येतो परंतु खूप कमी वेळात आपण खूप जास्त गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो . काही वेळा तर रात्र थोडी आणि सोंगे फार अशी परिस्थिती येते . आणि आपल्या घरी परत येताना आनंद पेक्षा काय करायचे राहून गेले याचा विचार मनात घोळत असतो नाही तर आपण इतका वेळ आणि पैसा खर्च करून फिरायला जाणे खरच वर्थ होते का असाच विचार करतो . मला तर कधी कधी दारुड्यान सारखी आपली मनस्थिती होते असे वाटते म्हणजे दारू प्यायच्या आधी खूप उत्साह वाटतो परंतु पिवून झाल्या नंतर पिण्याबद्दल पश्चाताप होतो.
खूप वेळ याचाच विचार केल्या नंतर असे लक्षात आले की आपण ज्याला सुख मिळवणे म्हणतो किंवा त्यात सुख मिळते अश्या गोष्टी करतो ते सुख मिळवणे नसून सुख ओरबाडणे आहे . सुख अशी गोष्ट आहे की ती अशी मिळवता येत नाही तर ती अपोआप तुम्हाला आपला अनुभव देते . सुख गोष्टच अशी आहे की ती एकट्याने येते . म्हणूनच आपण सुंदर आठवणीना आपण सुखाचे क्षण म्हणतो आणि दुखद घटनांना संकटाची मालिका म्हणतो. त्यामुळे कमी वेळात मौज मजेकारिता अधाशीपणे केलेल्या गोष्टीतून मिळतो तो फक्त सुखाचा आभास . आता ट्रेकिंग सारख्या गोस्तीना हा नियम लागू नाही कारण ट्रेकिंग सारख्या गोष्ट आपल्या दररोजच्या राहण्याच्या ठिकाणी आपण करू शकत नाही त्या गोष्टी स्थलनिगडीत असतात आणि त्यामधील क्रिया हि आधी नक्की झालेली असते . परंतु निसर्ग किंवा सौख्य या गोष्टी आपण दररोजच्या रुटीन मधून देखील मिळवू शकतो.
एक गोष्ट नक्की की निसर्गाने आपली निर्मिती पैसा किंवा धन किंवा अगदी मोठ्या कोनात पाहिल्यास कोठल्या ही प्रकारची संपत्ती निर्माण करणारे मशीन म्हणून केली नाही आहे हे नक्की . दररोज च्या भोजनाच्या माध्यमातून जसे सर्व रस , सर्व चवी आपल्या पोटात जाणे गरजेचे आहे. एकतर्फी खाणारी व्यक्ती पुढच्या आयुष्यात जशी पित्त , मेद किंवा स्थूलता , रक्तदाब , हृदय रोग , मधुमेह , मुल व्याध अश्या रोगांनी त्रस्त होवून जातो. नीट वाचल्यावर हे जाणवेल की यातील प्रत्येक रोग एकतर्फी खाण्यामुळे झालेला असतो. आपल्या आयुष्यात देखील असेच घडत असते सुखांचा किंवा दुखाचा ..कोठलाही भावनिक अथवा शाररीक अतिरेक शेवटी त्रासाला आमंत्रण देतो . आपण जसे एक दिवसात औषद घेवून बरे होवू शकत नाही किंवा एक आठवडा व्यायाम करून बलवान होवू शकत नाही त्याप्रमाणे चार दिवस मजा केल्याने सुखी होवू शकत नाही . आनंद नक्की मिळतो पण त्याला सुख म्हणू शकत नाही कारण तो क्षणभंगुर असतो.
त्यामुळे आपल्या जीवनाचा हिस्टो ग्राम आपण ठरवला पाहिजे . अगदी दिवसाचा ...२४ तासातील किती वेळ आपण आपल्या कुटुंबाला देतो , किती वेळ आपल्या आवडी नि छंदांना देतो , कुटुंबा बाहेरील कर्तव्याना देतो , समाजाला देतो , व्यवसायाला किंवा नोकरीला द्यावा लागतो. मग दिवसाच्या पातळीवर नसेल तर आठवड्याच्या पातळी वर किंवा महिन्याचा पातळीवर हा हिशोब नक्की व्हायला हवा. आणि आपल्या विचारसरणी आणि रुटीन मध्ये अवषक बदल नेटाने घडवून आणून या सर्वाचा एक सुंदर मिलाफ आपल्याला साधता आला पाहिजे . संपत्तीची असो , सुखाची असो किंवा अगदी ' कर खुदी को बुलंद इतना ' करत दुख मागणे असो कुठलाही अतिरेक वाईटच.
माणूस पूर्वी माकड होता म्हणे ....निसर्गरुपी शिक्षका कडून नवीन नवीन गोष्टी आत्मसात करत त्याचे कष्टाने मनुष्य प्राण्यात रुपांतर झाले , परंतु त्याने शिकणे सोडले नाही. नवीन तंत्रे विकसित केली नवी कला विकसित केल्या . बोली भाषा , साहित्य ,भावनाचे उच्चारानासारखी अतिशय क्रांतिकारक गोष्ट मानवाने सध्या केली. मनुष्याच्या या प्रगतीचा आणि जडण घडण विस्तृतपणे सांगणाऱ्या शास्त्राला एवोल्यूशन सायन्स म्हणतात. या शास्त्राप्रमाणे प्रत्येक मागची पिढी आपण आत्मसात केलेले ज्ञान पुढच्या पिढीकडे गुणसूत्र मार्फत देत होती. म्हणजे कला , शास्त्र यासारख्या गोष्टी पिढी दरपिढी जीन्स मधून पुढे सरकल्या. अगदी घोडे , कुत्रे विकत घेताना यांच्या बाबतीत आपण त्यांची ब्लड लाईन पाहतो कारण काही चागल्या सवयी किंवा गुण त्यांच्या मात्या पित्याकडून त्यांच्या पुढे आलेले असतात.
आता आपण हे असे पैसा किंवा स्थावर गोष्टी ज्या आपले सध्या नसून फक्त साधने आहेत यामागे धावत असतो ...आणि आपली पुढची पिढी जी आपली सर्वात मोठा ठेवा आहे त्यांच्या करिता वेळ देत नसू किंवा त्यांच्या वर नुसता जीव लावत असू ( तोही बरेचदा मालकी हक्काप्रमाणे असतो ) आणि भावनिक गुंतवणूक करत नसू तर आपण एवोल्यूशन सायन्स च्या नैसर्गिक नियमाच्या विरुद्ध वागत आहोत. सर्वात आधी आपल्या स्वतःच्या रुटीन मध्ये सुखाचे क्षण शोधणे किंवा निर्माण करणे आणि त्यात आपल्या कुटुंबाला किंवा मित्र मंडळीना गुंफणे अशी सुरुवात करायला हवी. आणि हळू हळू त्यामधी प्रगती करायला हवी. मग पहा सुख शोधण्याकरिता आपल्या धावपळ करत किंवा आपला जीव ( आणि संपत्ती सुद्धा ) आटवत रहायची गरज भासणार नाही. निसर्ग सर्वत्र सारखाच असतो बदलत असते ती आपली मनोवृत्ती.
आपल्या जीवनाकडे एक नव्या चष्म्यातून बघून पाहूया ना एकदा ...कदाचित आपली दुनिया वेगळीच दिसायला लागेल. पण मनाचा निर्धार पक्का हवा आणि असा क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची भावना निर्दोष हवी.

यशोधन वर्तक

गुलमोहर: 

जाम बरोबर आणि मस्त लिहीले आहे. मला काल वविला खूप जायचे होते पण कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे जमले नाही. मी पहाटेच कुत्र्यांना घेऊन खाली चालायला गेले होते. ते दोघे हिरवळीवर बागडत असताना एका क्षणी इतके सुरेख वारे आणि हिरव्या वासाचा पाऊस आला कि मला वाटले हेच माझे ववि.
निसर्ग जवळच शोधला पाहिजे. सिस्टिमचे गुलाम झाले नाही पाहिजे अगदी अगदी.
शेवटाचे वाक्य पण रॉक्स ते आमचे जीवनध्येयच आहे.

इंट्रेस्टिंग.
फक्त तुमची व्यक्त व्हायची पद्धत preachy वाटते. थोडे विस्तृत लिहा अजून.

आपल्या जीवनाकडे एक नव्या चष्म्यातून बघून पाहूया ना एकदा ...कदाचित आपली दुनिया वेगळीच दिसायला लागेल. पण मनाचा निर्धार पक्का हवा आणि असा क्रांतिकारी बदल घडवून आणण्याची भावना निर्दोष हवी. >> हे आवडले.

खुप साध्या सोप्या भाषेत लिहल आहे...उगीच कुठले जड उदाहरणे नाही आनि अलंकारिक भाषा पन नाही...आवडल Happy ....आजच्या २४ तासांमधला...हा लेख वाचण आनि काही गोष्टी आपसुक कळण हा सुदधा एक आनंदाचा क्षण च आहे Wink

सर्वात आधी आपल्या स्वतःच्या रुटीन मध्ये सुखाचे क्षण शोधणे किंवा निर्माण करणे आणि त्यात आपल्या कुटुंबाला किंवा मित्र मंडळीना गुंफणे अशी सुरुवात करायला हवी. >>>> खूपच सकारात्मक विचार मांडले आहेत, खूपच आवडले.

माझा एक विचार - सतत आपल्या मनासारखे होत राहिले तरी आपण सुखी/ आनंदी होऊ का - त्यालाही आपण कंटाळून जाऊ. आपलं जीवन सुख-दु:ख मिश्रित आहे ते तसंच असावं - सतत कोणी दु:खी/ सुखी असू शकत नाही.
मी कशात गुंतून पडतो हे सर्वात महत्वाचे वाटते - (यातच हवे/नकोपण आले)
आपल्याला आश्चर्य वाटेल - एखाद्या माणसाला मी सतत दु:खी असावं, लोकांनी मला सहानुभूती दाखवावी असेही वाटते.... (हे टोकाचे उदाहरण आहे)
पण जे आहे ते अ‍ॅक्सेप्ट ही वृत्ती असेल व सुख-दु:ख दोन्हीचा बाऊ न करता त्यापासून अलिप्तता असेल तर आपण आताचा हा क्षण (व असेच हळुहळू मिनिटे-तास, दिवस करत) एन्जॉय करत या संपूर्ण जीवनाचाच उत्तम प्रकारे स्वीकार करणे शक्य होईल ......
धन्यवाद...

मस्त लिहिले आहे
अश्विनिमामी म्हणतात ते बरोबर आहे. पटले

छोट्या आणि हाताशी असणाऱ्या गोष्टीत सुख अनुभवता आले पाहिजे.