टाकाऊतून टिकाऊ

Submitted by मानुषी on 23 July, 2012 - 01:07

अधून मधून कसल्याश्या सुरसुर्‍या येतात. आणि मग असं काहीतरी करत बसते.

काही वेळा ड्रेसला स्लीव्ज आत नुसते शिवलेले असतात. जर तो ड्रेस स्लीवलेस वापरला तर या स्लीव्ज तश्याच रहातात. या पिशवीचा तळचा भागासाठी या स्लीव्ज वापरल्या आहेत.

Photo0116.jpg

ही पिशवी जुन्या कुर्त्याच्या घेरापासून बनवली आहे.
आत स्पंज असल्याने आकार चांगला टिकला आहे.

Photo0048.jpg

जुन्या सोफा कव्हरातले तुकडे उरले होते. त्याची ही पर्स.

Photo0046.jpgPhoto0047.jpg

त्याच कापडातली ही छोटी पर्स.

Photo0050.jpg

जुन्या नारायण पेठ साडीतला तुकडा हा बेस. आणि त्यावर मुलांच्या जुन्या जॅकेटसमधला राजस्थानी भरतकामाचा तुकडा पॅच केलेला. जुन्या जंक ज्युलरीतले मणी खाली लोंबते लावले.

Photo0132.jpgPhoto0133.jpg

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मुलींनो आणि अनुराग इतकं कौतुक कराल तर अजून "कलाकृती" येण्याचा धोका संभवतो!
असो...............सर्वांना धन्यवाद!
सुरसुर्‍या झिंदाबाद!

नगर वर्न जाता येता कलेक्ट केल्या तर चालतील का? Wink Proud
सुपर्ब कलाकारी. मला दरवेळी परळीला जाताना नगरला आलो की आठवण येते. Happy

Pages