फुलांच्या रांगोळ्या-भाग १

Submitted by अत्रुप्त आत्मा on 18 July, 2012 - 05:45

नमस्कार... मायबोलीकर...

आज मी आपल्या समोर, मी काढलेल्या फुलांच्या रांगोळ्यांची काही छायाचित्र प्रदर्शित करत आहे.ह्या सर्व रांगोळ्या मी माझ्या कामाच्या ठिकाणी काढलेल्या आहेत. (मी पौरोहित्य करणारा आहे. म्हणजे भटजी...!)

आता थोडिशी या कलेची जन्मकथा सांगतो.साधारणतः १० वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एके ठिकाणी कामाला गेलो असताना माझं बराच वेळ अथर्वशीर्ष म्हणणं चालू होतं. ५०/६० आवर्तनं एकट्याला म्हणायची(च) होती.अगदी कंटाळा आला होता. ( अता कित्तीही भक्तिभावाचा विषय असला,तरी रोजच झाल्यावर कंटाळा येतोच Happy ) बाजुला बरीच वेगवेगळी फुलं आणलेली होती. सहज डोक्यात आलं आणी एका बाजुला म्हणंणं' सुरू असतांना, त्यातल्या निशिगंधाच्या फुलांनी अधी १गोल चक्र काढलं. गावरान गुलाब भरपुर होता त्याचा पाकळ्या केल्या आणी मधे टाकल्या,त्यात मध्यभागी एक भलमोठ्ठं जास्वंदीचं फुल ठेवलं,आणी बाहेरुन विड्याची पानं देठाच्या बाजुनी कट करुन गोल लावली... झालं,तेंव्हा पासुन दिसली फुलं की काढ रांगोळ्या असा क्रम सुरु झाला.मग भरपुर फुलं आणली तर काय/कश्या आणी कित्ती मोठ्या रांगोळ्या होतील..? ही एवढी फुलं आणायची कुठुन..? वगैरे विचार सुरु झाले.आणी आधी मंडई(पुणे) आणी नंतर फुलांचं सगळ्यात मोठ्ठं होल-सेल मार्केटयार्ड(गुलटेकडी)ही दोन ठिकाणं हताला लागली...मग काय..? पुढे पुढे...कल्पना सुचत गेल्या,आणी रांगोळ्या निघत गेल्या. आज अता बरीच वर्ष झाली मी या रांगोळ्या (कामाच्या ठिकाणी आणी इतरत्र प्रासंगिक)काढतोय. तुंम्हाला कश्या वाटतात..? पहा आणी सांगा. Happy
१)
https://lh3.googleusercontent.com/-PMc1aQbVj0s/ToCxlMkGowI/AAAAAAAAAFQ/Nv4kVke5wc8/s640/f9.jpg
२)
https://lh6.googleusercontent.com/-oUFajJdgKKg/ThX9gb3T3aI/AAAAAAAAAB0/AwHsB60pYXU/s640/208821_106532459433049_100002288875710_64779_4024943_n.jpg
३)
https://lh3.googleusercontent.com/-bGBahPwmaMI/ToC1qG-iZQI/AAAAAAAAAFY/n9seWPiVzLc/s640/f16.jpg
४)
https://lh4.googleusercontent.com/-VbxMbF_1Z68/ToC2MEVjqHI/AAAAAAAAAFg/y9XfqYOr0rU/s640/f21.jpg
५)
https://lh3.googleusercontent.com/-mG-8GjNiyIQ/ToC2jG3m-9I/AAAAAAAAAFk/tSKKJ09Ol48/s640/f3.jpg
६)
https://lh6.googleusercontent.com/-rr5UIySagl4/ToCxPbMYm1I/AAAAAAAAAFM/FEUD9LHNd2g/s640/f8.jpg
७)
https://lh3.googleusercontent.com/-TiRrptsXuXo/TwL8IieeIOI/AAAAAAAAAVo/uEISJx0Dr7U/w532-h399-k/27082011%2528001%2529.jpg
८)
https://lh5.googleusercontent.com/-ZSydsSN6BwA/TwL7-aU176I/AAAAAAAAAVI/Nm9LCjxuFrc/w532-h399-k/26082011%2528002%2529.jpg
९)
https://lh4.googleusercontent.com/-InHbM0NhqtQ/TwL7xhkr9oI/AAAAAAAAAUo/ViyMjaOrLPI/w532-h399-k/25082011.jpg
१०)
https://lh6.googleusercontent.com/-14gmTnHHqAQ/TwL7Zaoi55I/AAAAAAAAATk/5kkVNsQNRSs/w532-h399-k/22082011%2528001%2529.jpg
११)
https://lh5.googleusercontent.com/-j_mZbgNt5hE/TwL631jvokI/AAAAAAAAAR0/ykHfvakfKac/w532-h399-k/14102011.jpg
१२)
https://lh3.googleusercontent.com/-G1DgeoBzZnk/TwL5YFrQkAI/AAAAAAAAANE/lucZHlaR5YA/w532-h399-k/04092011%2528001%2529.jpg
१३)
https://lh6.googleusercontent.com/-FOSroqdJPLQ/TwL5eIwvzjI/AAAAAAAAANU/_H0vSdrJKoE/w532-h399-k/05092011.jpg
१४)
https://lh6.googleusercontent.com/-PtpBzWU3rDo/TwL7KlGJDDI/AAAAAAAAAS0/hTmnDB0UN-0/w532-h399-k/20082011.jpg
१५)
https://lh6.googleusercontent.com/-jkxudxh5sDQ/TwL592lwXmI/AAAAAAAAAOU/_nGWQbZ1P3c/w532-h399-k/07102011%2528001%2529.jpg
०=====०======०=====००=====०======०=====००=====०======०=====००=====०======०=====०
धन्यवाद...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

@वर्षा>>>@अहो अतृप्त आत्मा उर्फ भटजी बुवा, रोज एवढे देवकार्य करता, तो श्रीगणेश तुम्हाला पावला बरं का. >>> ब्वार.. Happy

आंम्हीही त्याला एकदा असेच पावलो होतो...

वा फारच सुरेख रांगोळ्या आहेत. रंगसंगती आणि डीजाईन्स दोन्ही सुरेख जमले आहे प्रत्येक ठीकाणी. Happy
दक्षिणेत पण गुरुजी / भटजी पुजेला आले की सुरेख फुलांच्या रांगोळ्या तयार करायचे, अर्थात इतक्या मोठ्या प्रमाणावर नाही, पण दरवेळी छोटी का होईना फुलांची रांगोळी तयार केलेली पाहीली आहे पुजेच्या ठीकाणी.

वा वा आवडल्याच
रच्याकने केरळमध्ये कधीच आपल्या सारख्या रांगोळ्या काढल्या जात नाहीत
त्यांच्याकडे याच अशाच.. फुलांच्या आणि अतिशय सुंदर
तुमची परवानगी असेल तर इथे एक दोन टाकेन, तुम्हालाही नविन डीझाईन्सची कल्पना येईल

अप्रतिम! सुंदर!! एक से एक रांगोळ्या आहेत Happy बप्पाची रांगोळी पण खुप सुरेख Happy अजुन फोटो असतिल तर नक्की टाका.

रिया, तु टाकलेल्या फोटोतल्या रांगोळ्या कसल्या सुबक आणि सुरेख आहेत!!! पहिली तर एकदम खतरा... डिजिटल आर्ट वाटत्येय आणि दुसर्‍याची बॉर्डर खुप आवडली.

या रांगोळीत माझाही हातभार होता<< बाजुला मातीच्या पणत्या ठेवण्यात का? Wink

@ अतृप्त आत्मा

आंम्हीही त्याला एकदा असेच पावलो होतो...
<<<<<<<<<

Lol

पावा पावा असेच एकमेकांना पावा
एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ Happy

@ रीया

खुपच सुरेख रांगोळ्या आहेत........

वॉव....रिया.... अतिशय सुंदर आहेत,पण यांना रांगोळ्या न म्हणता... फुलांचा वापर करुन काढलेली चित्र हेच अभिधान योग्य वाटेल...नाही का..? पण...

प्रमाणबद्धता आणी रंगसंगतीला माझा

लाजो Proud
त्यापेक्षा फुलांच्या पाकळ्या काढायला की काय अस तरी विचारायचंस.. बर्‍याच जनांना त्या कामाला लावलेलं आम्ही Wink

वॉव....रिया.... अतिशय सुंदर आहेत,पण यांना रांगोळ्या न म्हणता... फुलांचा वापर करुन काढलेली चित्र हेच अभिधान योग्य वाटेल...नाही का..? पण...
>>>
आपण नाही का रांगोळीचे गालिचे काढतो, तसे हे लोक्स फुलांचे काढतात. पण अनेक वर्षांपासुनची सवय आहे ना त्यांना म्हणुन इतके प्रमाणबद्ध आहेत Happy

आपल्या कलाकारीला दाद द्यायला शब्दच सापडत नाहीत.आपला आत्मा कधीही अतृप्त राहु नये हीच परमेश्वराजवळ मनोभावे प्रार्थना (अनेक आशिर्वाद)

सुंदर.

यजमानही खुश होत असतील ..... >>> खुश होतातच.... पण काहीजण वेडे झालेत.त्यांचं काम कुठल्याही प्रांत/देशात असो,,,मी आलच पाहिजे,म्हणुन हट्ट करतात. मला जावंही लागतच!

आम्ही माबोकर नक्कीच झालोय >>> मनःपूर्वक धन्यवाद.

Pages