काल मला पण असच झालं होत...!

Submitted by आर.ए.के. on 17 July, 2012 - 05:52

सकाळचे ७:०० वाजले आहेत.
अजून ७:१५ पर्यंत झोपाव असा विचार करुन मी पांघरुण डोक्यावर ओढून पुन्हा झोपी गेले. जेंव्हा जाग आली तेंव्हा घड्याळात ७:४५ झालेले...मी दचकून जागी झाले.. शेजारी तो शांतपणे झोपला आहे. त्याला पाहून मला परत एकदा झोपण्याची इच्छा झाली...पण आत्ता नाही उठले तर पुढे ऑफिसला जायला उशीर होणार...म्हणून मी पलंगाच्या खाली पाय ठेवला..
आज उठायला उशीर झाला म्हणून त्याला डबा बनवुन देणं शक्य नव्हत..लग्न झाल्यापासून ४-५ महिन्यांनी...अगदी अलीकडेच मी त्याला डबा बनवून द्यायला लागले होते. त्याला मी केलेल्या भाज्या खूप आवडतात. तशी त्याची खाण्याच्या बाबतीत कसलीच तक्रार नसते.लग्नानंतर स्वयंपाकात माझे बरेच प्रयोग फसायचे.अजूनही फसतात्..पण तो सगळ अगदी मुकाट्याने सहन करतो..उलट मला सकाळी स्वयंपाकाचा त्रास नको म्हणून तो डबा न्यायलाच नको म्हणायचा...मीच मागे लागून त्याला डब्याची सवय लावली आहे.
घड्याळात ८:०० वाजले आहेत.
त्याला आता उठवायला हवं.....
तो अगदी शांत झोपलाय...दोन्ही हात डोक्याखाली ठेवून पालथ झोपायची त्याला सवय आहे...झोपेत किती निरागस दिसतो तो..
पण कधी कधी असा का वागतो हा? कदाचित तो तसाच आहे....कदाचित त्याच्या द्रुष्टीने तो बरोबर वागतो...पण मला कधी कधी जाम राग येतो त्याचा....
काल दिवस भरात मी त्याला फोन नाही केला म्हणून चिडून बसला...१ तर ऑफिस मधे कामाचा ढिगारा त्यात गावी जायचे म्हणून travels ची तिकीटस बुक करायची होती...एरवी हे काम पण त्यानेच केल असत...पण त्या travels ने मी लग्नाआधी बर्याचदा प्रवास केला होता म्हणून ती जबाबदारी मी स्वतः घेतली होती.आणि फोन वरुन फक्त बुकिंग तर करायची होती....पण कालचा दिवसच खराब निघाला...तिथला एजंट म्हणाला तिकीटस आजच घेऊन जा..नाहीतर जागा reserved ठेवली जाणार नाही..वैताग आला नुसता....
ऑफिस मधून १ तास लवकर निघून मी तिकीटस घेतली... या सगळ्या गडबडीत मला काल त्याला फोन, मेल किंवा मेसेज पाठवायला नाही जमलं...तिकीटस काढ्ल्यानंतर मी त्याला फोन केला तर तो माझ्यावरच चिडला.
"हॅलो.."
"कुठे आहेस गं...किती मेल्स पाठवले तुला....एकाचा रिप्लाय नाही, फोन केला, फोन पण उचलला नाहीस..."
"अरे हो..!"
"हो काय....तू ना बावळट आहेस...!"
बावळट या शब्दाचा मला तसा रागच आला...पण चूक माझीच होती...
"अरे सकाळपासून मी माझ्या desk वरच नाहिये..आल्या आल्या मीटींग होती, नंतर १ अतिशय बोरींग असं K.T.session होत..आणि आत्ता मी इकडे तिकीटस घ्यायला आले आहे.
"काय? तिकीटस घ्यायला कशाला गेलीस एकटी?"
"कारण तिथला एजंट म्हणाला तिकीटस आजच घेऊन जा..नाहीतर जागा reserved ठेवली जाणार नाही"..
"मग कशी गेलीस एव्हढ्या लांब?"
"बस ने आले"
"तू पण ना....फोनवर बुकींग होत म्हणून तुला करायला सांगितल....नाहीतर मी गेलो नसतो का बाईक वर...? आणि फोन का नाही उचललास?"
"अरे silent वर होता..आत्ताच पाहिले तु़झे missed calls..."
"नेहमीचयं तुझ हे..... असं करत जाऊ नकोस गं ...तू कुठे असतेस ते कळवत जा...काळजी वाटते..आणि गोष्टी करायच्या आधी मला सांगत जा...please..."
रस्त्यावरच्या गर्दीमुळे आधीच माझी चीडचीड होत होती.....त्यात हा मला ओरडून बोलत होता. नाही जमलं एखाद्या दिवशी फोन करायला..काय बिघडल त्यात एव्हढं? आणि आयत्या वेळी अडचण येऊ नये म्हणूनच धडपड चालू होती ना माझी तिकीटस घ्यायची ...मी काही timepass करत नव्हते. एव्हढी कामं करा ते करा...वरुन ह्याची चिडचिड ऐका.... bore झालं मला...
मी पण मग घरी गेल्यावर त्याच्याशी नीट बोललेच नाही... height म्हणजे तो पण माझ्याशी नीट बोलत नव्ह्ता...भांडण कसल्याही प्रकारच असल तरी नेहमी तोच माझी समजूत काढतो...काहीतरी विषय काढून मला हसवायचा प्रयत्न करतो पण आज तस काहीच झाल नाही.. अगदी जुजबी , कामापुरतं बोलून काल आम्ही दोघेही झोपी गेलो...
घड्याळात ८:१५ वाजले आहेत.
मी त्याला हाक मारली....थोडी चुळबुळ करुन तो उठला...आणि सरळ आवरायला निघून गेला..
घड्याळात ८:४५ वाजले आहेत.
तो ऑफिसला जाण्यासाठी घराबाहेर पडला पण...माझ्याशी न बोलता...!
माझी ऑफिसला जाण्याची गडबड चालू आहे.डोक्यात बरचं काही चालू आहे...पण माझ आवरणं कस mechanically चालू आहे.
घड्याळात ९:४५ वाजले आहेत.
मी ऑफिसला पोहोचले आहे..मी माझी system चालू केली. महत्वाचे mails check केले. आज कामाचा लोड तसा नाहिये...मी निवांतणे मराठी पेपर ची लिंक ओपन केली...आज उगाच inbox पुन्हा पुन्हा check करत आहे...inbox मध्ये एकही मेल नवा नाहिये..उगाच अस वाटायला लागलं....मी कधी कधी जरा जास्तच rudely वागते त्याच्याशी..काल माझ्यावर चिडला तो .... पण माझी काळजी वाटते म्हणूनच ना...कदाचित त्याच्या चिडण्याला मी हासून प्रतिसाद द्यायला हवा होता...पण त्याला तरी एव्हढं चिडायला काय झाल होतं? नेहमी सारखं सगळं विसरुन तो का नाही बोलला माझ्याशी...? मला अस्वस्थ वाटतय...
घड्याळात ११:०० वाजले आहेत.
मी पुन्हा मेल्स चेक केले... अजुनही त्याचा मेल आलेला नव्ह्ता...एरवी ऑफिसला पोहचल्या पोहचल्या रोज १ मेल येतो त्याचा...आज मीच मेल टाकते त्याला...तू काल असा का वागलास? माझ्याशी नीट का नाही बोललास? माझ तिकीट काढण किती गरजेच होत...etc-etc लिहून मी एक १०-१२ ओळींचा मेल ड्राफ्ट केला..
सब्जेक्ट लाईन : U THR?
अशी लिहीली...सेंड वर क्लिक करायच्या आधि विचार बदलला...आणि मजकूर सगळा डिलीट केला.
U THR? एव्हढच ते पण सब्जेक्ट लाईन मध्ये लिहून मी सेंड वर क्लिक केल.
आता त्याच्या रिप्लाय ची वाट पाहण्याशिवाय मी काहीच नाही करु शकत...
घड्याळात ११:३० वाजले आहेत.
मी जागेवरुन उठले..खाली pantry मध्ये जाउन स्वतःसाठी कॉफी बनवली. टेरेस वर कॉफी न पिता ती मी desk वर आणली.
आधी मी system unlock करुन outlook उघडल्..इन्बॉक्स बघितला....१ नविन मेल दिसला...पण त्याचा नव्हता...मला परत bore होतय्...मी कॉफी प्याले..

११:४५ , त्याचा रिप्लाय नाही आला. कदाचित कामात असेल तो...मी परत एकदा मेल पाठवतेय त्याला.
सब्जेक्ट लाईन : R U THR?
मजकूर काहीच नाही लिहीला. सेंड वर क्लिक केलं. आउट्बॉक्स चेक केला...उगाच sent items चेक केले...आता परत त्याच्या मेल ची वाट पाहत मी बसले आहे...
१२:०० त्याचा लंच ब्रेक झाला असेल.
माझा लंच ब्रेक १:०० ला असतो. म्हणजे जरी त्याने रिप्लाय दिला तरी २:०० शिवाय मी तो पाहणार नाही..
घड्याळात १:४५ वाजले आहेत.
मी आज जरा लवकरच desk वर आले. outlook ची विंडो ओपन केली. फारशी काही आशा नाहीये...पण चक्क त्याचा रिप्लाय आलाय.
सब्जेक्ट लाईन : R U THR?
तीच होती जी मी लिहून पाठवली होती.
खाली लिहील होत,
busy...
बस्सं....इतकच्...मी इतक्या वेळापासून ह्याच्या रिप्लाय ची वाट पाहतेय्....आणि ह्याने इतका तुटक रिप्लाय पाठवला...मला राग आला...अस्वस्थ पण वाटायला लागल...मी त्याला फोन करायच ठरवलं...
मी त्याला फोन लावला...
१ दा, २ दा, ३ दा, ७ वेळा फोन केला....पुर्ण रिंग्ज वाजून फोन बंद झाला.... तो माझा फोन उचलत नाहिये....
आता मला त्याची काळजी वाटायला लागली आहे...
कुठे असेल तो? फोन हरवला की काय त्याचा? का कुठे विसरला? चिडला आहे का माझ्यावर? फोन का नाही उचलत आहे...?
मी परत एकदा फोन लावलाय त्याला....
आता तर चक्क switched off लागतोय...
मला आता त्याची भयंकर काळजी वाटत आहे...
त्याच्या ऑफिस मधल्या कोणाचाच नंबर नाहिये माझ्याकडे..
काय बावळट आहे मी..! त्याच्या ऑफिस मधल्या कोणाचाच कसा नंबर नाही माझ्याकडे...? माझ्या ऑफिस मधल्या ३ जणींचे नंबर आहेत त्याच्याकडे, शिवाय ऑफिसचआ नंबर पण आहे...पण त्याच्या ऑफिसच्या नंबर ची गरज मला कधी भासलीच नाही...तो सतत माझ्या संपर्कात राहायचा...श्शी...!
मी त्याला परत मेल पाठवायच ठरवलय...
सब्जेक्ट लाईन : कुठे आहेस रे?
आता मात्र मजकूर लिहीला.
please pick up the phone.
चिडला आहेस का? I am Sorry! काळजी वाटत आहे रे... atleast reply तरी कर्...फार वेळ नाही लागत २ ओळींचा मेल टाकायला....plz rply..
३:३० , ३:४५, ४:००, ४:१५
outlook refresh , update...सगळं करुन झालं....त्याचा रिप्लाय नाही आला..
घड्याळात ४:३० वाजले आहेत.
मला त्याची कमालीची काळजी वाटत आहे...स्वतःचा राग पण येत आहे...मी का वागले अशी त्याच्याशी काल....तो चिडल्यावर त्याची समजूत घालायची सोडून मीच चिडले त्याच्यावर... छे...मी अस नको होत वागायला..
आत्ता कुठे असेल तो...त्याचा accident तर्...श्शी...काहीपण विचार येत आहेत मनात...
घड्याळात ५:०० वाजले आहेत.
मी अजून १ मेल ड्राफ्ट करत आहे.
सब्जेक्ट लाईन : I am coming to ur office.
मजकूर परत काहीच लिहीला नाही.
मी पटापट सगळ्या विंडोज बंद केल्या. आज मी परत १ तास आधी ऑफिस मधून जातेय...!
मी ऑफिसच्या बाहेर पडलेय खरी...पण त्याच्या ऑफिसचा नेमका पत्ता कुठे म।हीती आहे मला...फक्त मोघम एरिया माहीत आहे..... मला माझ्या मुर्खपणाचा प्रचंड राग येत आहे...
पण आता पर्याय नाहिये....जेवढा पत्ता माहिती होता तेवढा रिक्षावाल्याला सांगून मी त्याच्या ऑफिस कडे जायला निघालीये...
घड्याळात ६:०० वाजले आहेत.
जेवढा पत्ता रिक्षावाल्याला सांगितला होता त्याच्या आधारावर त्याने मला एका चैIकात आणून सोडले होते...इथेच कुठेतरी आसपास त्याच ऑफिस होत...
मी त्याला फोन लावला...
त्याने तो कट केला...
मी मेसेज टाईप केला..
I am on my way to ur office...
अ‍ॅक्चुली मी तुझ्या ऑफिसजवळच्या चैIकात आहे.
ही मात्रा बरोब्बर लागू पडली.
२ र्‍या मिनिटाला त्याचा फोन आला.
आज दिवस्भरातून तो मला पहिल्यांदा फोन करत होता. एवढे फोन केले , मेसेजेस पाठवले.... एकाचा पण रिप्लाय नाही दिला....आणि आता त्याच नाव फ्लॅश होतय मोबालच्या स्क्रीन वर...
मी फोन उचलला..
"हॅलो..."
पहिला शब्द कानावर पडला...
"बावळट..इकडे एवढ्या लांब कशाला आलीस? आणि कशी आलीस? काय गरज होती इकडे येण्याची...
ऑफिस सुटणारच होत्...इतक्यात घरी निघणारच होतो मी....तो एरिया चांगला नाहिये गं.... तिथे बस स्टॉपपाशीच उभी राहा...मी पोहोचतोच आहे...
"हम...."
घड्याळात ६:४५ वाजले आहेत.
मी त्याची वाट पाहत स्टॉप वर उभी आहे...त्याच्या सारखी गाडी असणार्‍या प्रत्येक गाडी कडे माझ लक्ष जातय..
बसेस येताहेत , जाताहेत...
आणि तो आला.... गाडी स्लो करुन तो मलाच शोधतोय....मी अजून नाही दिसले त्याला...मी मात्र त्यालाच पाहातेय....
त्याच्या चेहर्‍यावर काळजी दिसतेय....ट्रॅफिक मुळे तो वैतागलेला दिसत आहे...तो मला शोधत आहे...
आणि त्याची नजर माझ्यावर स्थिरावली...
सापडली एकदाची....! असे काहीसे भाव त्याच्या चेहर्‍यावर झळकले....
गाडी वळवून तो बस स्टॉपच्या थोडा पुढे जाउन थांबला....
मानेनेच त्याने मला गाडीवर बसायची खुण केली....
मी त्याच्या जवळ गेले....
तो हसतोय्...अगदी गोड्....ओळखीच..की खोडसाळ..?
माहीत नाही नक्की कस्....पण छान वाटतयं....
ह्याला असच तर हसताना पहायचं होत सकाळपासून...
खरंतर असच तर हसताना पहायचं ह्याला नेहमी साठी....
माझ्या चेहर्‍यावर कदाचित वेगळेच भाव होते... राग, काळजी, प्रेम यांच कॉकटेल झालयं बहूदा...
त्याला याची मज्जा वाट्तेय...तो हसला आणि प्रेमाने म्हणाला...
"वेडी कुठली..! चल बस लवकर...!
मी गाडीवर बसले.
घड्याळात ७:१५ वाजले आहेत.
मी त्याच्या खांद्यावर डोक ठेवून शांतपणे बसले आहे.. ..माझ्या मनात बरेच प्रश्न आहेत...
कुठे होतास? फोन का नाही उचललास? मेल ला रिप्लाय का नाही दिलास..? काल रात्री पण माझ्याशी नीट नाही बोललास...एवढा का चिडला होतास...?
पण एकही प्रश्न मला विचारावासा वाटत नाहीये..
मला छान वाटत आहे...खूप छान वाटत आहे...
थोड्या वेळाने मान थोडीशी मागे वळवून तो म्हणाला...
"आता कसं झाल..? आल ना टेन्शन? वाट्ली ना काळजी..?
काल मला पण असचं झाल होतं...!" Happy

गुलमोहर: 

majya sobat sudha asech gadle aahe pan fark evdach ki aadi me keli tyachi kalji aani natar tyane... khup chan aahe manla lagali agdi..

झक्कासच झालीय..........................

अभिषेकने लिहिलेल्या गोष्टीचा काउंटर पार्ट वाटतोय.>>>

Happy अभिषेकने लिहिलेली गोष्ट मी वाचली होती. पण मला आठवत तस त्यात intentionally "ती" अस वागत नाही.
या गोष्टीतला "तो" मुद्दाम तस वागतो. अर्थात त्याच्या काळजीची जाणीव करून देण्यासाठीच..
दोन्ही गोष्टींत हा १ फरक आहेच..
पण प्रतिसादासाठी धन्यवाद. Happy

Pages