Submitted by सागर on 17 July, 2012 - 04:20
Net Banking ची सुविधा वापरून online payment करण्याकरता Google Chrome सुरक्षित आहे का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Net Banking ची सुविधा वापरून online payment करण्याकरता Google Chrome सुरक्षित आहे का?
आहे. असा आजवरचा माझा अनुभव
आहे. असा आजवरचा माझा अनुभव आहे. इतरांबद्दल कल्पना नाही.
हो. मी पण Google Chrome च
हो. मी पण Google Chrome च वापरते.. अजुन तरी काही वाईट अनुभव नाही..
Online transaction =
Online transaction = आंतरजालीय आर्थिक व्यवहार
तर, आंतरजालीय आर्थिक व्यवहारांसाठी शक्यतो Internet Explorer वापरावा. मला जेव्हा येत असे तेव्हा मी बँकेत फोन केला की ग्राहक सेवा अधिकारी अडचण सोडवण्याच्या दृष्टीने मला जे प्रश्न विचारित त्यांपैकी एक प्रश्न "तुम्ही Internet Explorer वापरता का? नसेल तर Internet Explorer वापरून लॉग इन करुन बघा" हा असायचाच. हे त्यांचे मत तांत्रिकदृष्ट्या किती बरोबर मला ठावूक नाही. पण नेहमीचा Internet Explorer सोडून इतर ब्राऊझर वापरू नये हे माझे मत झाले हे मात्र खरे.
Online transaction करतांना
Online transaction करतांना Web Browsers आणि Web Servers (उदा. gmail, hdfcbank, etc.) काही ठराविक standards follow करतात. सध्या https protocol वापरून हे व्यवहार केले जातात. Browser तयार करतांना हे protocols किती व्यवस्थीत implement केले आहेत यावर त्या browser ची सुरक्षीतता ठरते. सध्या Firefox सगळ्यात सुरक्षीत आहे.
मंदारः IE मधे सगळ्या साईट्स चालतात कारण सहसा web developers त्याला आणि त्याचा user base विचार घेऊन साईट्स तयार करतात. Firefox आणि Chrome बर्याच वेळा नवीन technologies वापरतात ज्या जुन्या websites मधील security flaws मुळे त्या websites ना block करतात.
--
कानडा
कानडाशी सहमत. मंदार - बर्याच
कानडाशी सहमत. मंदार - बर्याच वेळेस तसे म्हणतात कारण फायरफॉक्स व इतर ब्राउझर वर टेस्टिंग तेवढे चांगले केलेले नसते या ऑनलाईन सिस्टीम्स चे.
पूर्वी, कदाचित अजूनही, १२८ bit SSL किंवा त्यातील पुढचे स्टॅण्डर्ड्स वापरत. जे ब्राउझर हे सपोर्ट करतात ते वापरले तर सहसा प्रॉब्लेम येउ नये. पण ऑनलाईन पेमेंट्स, वैयक्तिक माहितीची देवाणघेवाण करायची असेल तर ज्या साईटवरून करणार आहात त्या साईटवर "supported browsers" अशी लिन्क असते. नसेल तर सपोर्टला फोन करून कन्फर्म करा आणि मगच वापरा.
मीही यातील तज्ञ नाही, कोणी असल्यास माहिती द्या अजून.
जर काही कारणास्तव IE च वापराव
जर काही कारणास्तव IE च वापराव लागत असेल तर ते regularly update करायला पाहिजे. अश्या updates मायक्रोसॉफ्ट कडुन फुकटात मिळतात. तसेच एखादा (खर तर एकच) antivirus प्रोग्राम कायम असायला पाहिजे आणि तो सुद्धा regularly update करायला पाहिजे.
--
कानडा
मी गेली दहा बारा वर्षे
मी गेली दहा बारा वर्षे बँकिंग, पैसे ट्रान्स्फर, चेक देणे, पे पॅल, कंपनीच्या साईट्स वापरून ऑन लाइन खरेदी, टर्बोटॅक्स वापरून दरवर्षी टॅक्स भरणे, असे प्रकार केले आहेत, करतो आहे. माझे नि गूगल मेल, गूगल क्रोम, गूगल मॅप यांचे पटत नाही, दोष माझाच असणार. पण IE7, Firefrox, असे मुक्तपणे वापरतो. आता IE7 दळभद्रे आहे असा अनुभव आल्याने (पुनः चूक माझीच असणार!) फायरफॉक्स वापरतो.
कामानिमित्त असल्या सुविधांबद्दल माहिती मिळवली होती नि आमच्या दर वर्षी ३० बिलियन डॉ. चे बिलिंग करणार्या कंपनीला त्यात काही धोका आढळला नाही, तसेच तसे फारसे काही ऐकीवात आले नाही, निदान या व्यवहारात तरी. बाकी याहू मधून पासवर्ड चोरण्याचा एक मोठ्ठा प्रकार नुकताच उघडकीला आला आहे, नि व्हायरस तर पाचवीलाच पुजलेले आहेत. पण पासवर्ड सांभाळले नि व्हायरस पासून जपून राहिले तर मला काही भीति वाटत नाही.
अपवाद हे नियम सिद्ध करण्यासाठी असतात पण अपवादावरून नियम ठरत नाही.
आताचे वापरात असलेले सगळे
आताचे वापरात असलेले सगळे ब्राउझर्स IE7, Chrome, Firefox, Saffari 128 biy encryption वापरतात. त्यामुळे कुठलाही वापरला तरी सेफ आहे.
माहिती चोरीला जाण्याचे प्रॉब्लेम्स पुढील कारणास्तव येउ शकतात.
१. आपल्या काँप्युटर मधे ट्रोजन हॉर्स, स्पायवेअर अस़णे, (शक्यतो हे प्रकार अन सेफ साईट्स उदा. चित्रपटांच्या साईट्स, गाणी डाउनलोड करणार्या साईट्स यातर्फे येतात).
२.फारशा प्रसिद्ध नसलेल्या साईट्स वर पेमेंट वापरणे. (मी अमेरिकेत असताना कॉलिंग कार्ड साठी एका साईटवर - बहुतेक पाकिस्तानी होती - क्रेडीट कार्ड वापरले होते. त्यानंतर काही महिन्यातच माझ्या कार्ड वर फ्रॉड्युलंट चार्जेस आले होते).
३. पेमेंट करताना https:// आणि ब्राउझरच्या उजवीकडे कोपर्यात कुलुपाचे साएन येणे महत्वाचे. हे नसेल तर नक्की प्रॉब्लेम्स येउ शकतात.
४. काँप्युटर प्रोटेक्टेड नसणे.
IE load व्हायला बरेचदा त्रास
IE load व्हायला बरेचदा त्रास देते, वेळही घेते. त्यामुळे chrome वापरायचो.
Chrome मुक्त स्त्रोत (आणि मोफत उपलब्ध) असल्याने त्याच्या सुरक्षिततेबद्दल शंका होती.
माहिती दिल्याबद्दल थ्यांक्स
माझ्या मते IE (IE 8 बेस्ट)
माझ्या मते IE (IE 8 बेस्ट) वापरावा.
क्रोम मध्ये काहिही खोट नाही पण वर दिल्याप्रमाणे बर्याच कंपन्यात IE वर सर्वात जास्त Testing होते.
पब्लिक कॉम्प्युटर मात्र शक्यतो वापरु नये.
जर वापरलात तर सर्व ब्राउजर डाटा क्लीन करावा (tools options) मध्ये पहा.
IE7 वर स्पीड आणि इतर प्रॉब्लेम असत पण याला त्याच्यावर अनियंत्रित addons टाकणार्या
गुगल, याहु हेच जास्त जवाबदार होते (यालाच चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात).
IE 8 मध्ये तुम्ही हे addons स्वतः मॅनेज करु शकतात आणि शक्यतो माहित नसलेले addons डिसेबल करावेत.
१) मी IE 8 वापरतो. अनेक
१) मी IE 8 वापरतो. अनेक कंपन्यांचे पेमेंट करण्यासाठी हा चालतो. मी अनेक वर्षे वापरत आहे.