ओईल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र ... एक उत्कृष्ठ करियर पर्याय....भाग २

Submitted by विनीत वर्तक on 15 July, 2012 - 03:38

ओईल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र ... एक उत्कृष्ठ करियर पर्याय....भाग २

मागील भागात बघितला कि ओईल कस तयार होत. ओईल जमिनीखाली शोधण आणि त्या नंतर ते वर काढून त्यावर प्रक्रिया करून वेगवेगळ्या घटकात ते बदलणं हि बरीच मोठी प्रक्रिया आहे. कोणतीही एक कंपनी सगळ्याच टप्प्यावर स्वतः सगळी उपकरणा आणि प्रक्रिया करू शकत नाही आणि मग तिथेच येतात सर्विस कंपन्या. सर्वप्रथम ज्या ठिकाणी ओईल शोधायचा त्या ठिकाणचा भूगर्भीय अभ्यास केला जातो या मध्ये येत भूस्तरीय रचना तिथल्या भूगर्भाची हालचाल आणि त्या मुळे निर्माण होणार्या प्लेट. साधारणतः जिकडे अश्या प्लेट असतात तिकडे ओईल मिळण्याची संभावना जास्त असते. एकदा हा अभ्यास झाला कि मग त्याचा सेस्मिक अभ्यास केला जातो यात ध्वनी लाहिरी जमिनीत पाठवून त्यांच्या प्रतिध्वनीचा अभ्यास करून एक अंदाज बांधला जातो कि किती खोलीवर कोणत्या स्वरूपाचा भूस्तर आहे. एकदा हे सगळा झाला कि एक संशोधनाची विहीर खणली किवा ड्रील केली जाते. ड्रील करत असताना भूगर्भातील रचनेचा अभ्यास साठी त्याचा लोगिंग केलं जाते. या अभ्यासाच्या जोरावर मग पुढच्या गोष्टी अवलंबून असतात. समजा ओईल असण्याचा सिद्ध झाला तर मग अजून आशयाच स्वरूपाच्या २-३ विहिरी केल्या जातात ज्यात आतील रचनेचा अगदी बारकाईने अभ्यास केलं जातो. नंतर या भूस्ताराचा क्षेत्र ठरवला जाते आणि त्यातून किती ओईल आपण काढू शकतो याचा अंदाज बांधला जातो. त्यात असणारा सगळा च्या सगळा ओईल आपण बाहेर काढू शकत नाही. मुळात ओईल हे पाण्या प्रमाणे वाहत नसता तर ते असता पोरस दगडांच्या फटी मध्ये. उदाहरण द्यायचा झाला तर चून खडक किवा वाळूचा दगड. ह्यात असणार्या पोकळ जागेत ओईल दडलेला असता. म्हणजे स्पंज प्रमाणे. स्पंज मध्ये पाणी असेल तर ते वाहत नाही पण जर तुम्ही स्पंज ला पिळला तर त्यातून भरपूर पाणी बाहेर पडते तसच काहीसं.
एकदा का अभ्यास पूर्ण झाला कि मग या क्षेत्रात उत्खनन सुरु होत. उत्खन करणाऱ्या विहिरी आता सरळ ड्रील न करता त्यांना पूर्णतः आडवं करण्यात येत. ज्या योगे जास्तीत जास्त ओईल भूस्तर मधून बाहेर काढता येईल. ओईल चा क्षेत्र मुख्यतः काही मीटर्स जाडी मध्ये असत पण ते २००- १००० किलोमीटर पर्यंत पसरलेला असू शकते. त्या मुळेच आज काल जास्तीत जास्त विहिरी आडव्या स्वरूपाच्या ड्रील केल्या जातात. वर वाचताना हि गोष्ट अतिशय सोप्पी वाटत असेल पण जमिनीच्या खाली जवळ पास ३०००-५००० मीटर्स खोली आणि जवळ पास १२० डिग्री सेल्सिअस तापमानात अगदी ५ ते १० मीटर च्या छोट्या भूस्तारात विहिरीला अडवा करणा आणि तसच ज्या प्रमाणे भूस्तारात उतार चढाव होतील त्या प्रमाणे विहिरीत वर खाली करणं खूप कठीण काम आहे. एकतर जमिनी चा दाब , तापमान , माहित नसलेल्या गोष्टी आणि त्यात ड्रील करताना होणारे आवाज आणि धक्के यातून जमिनीचा अभ्यास करणं हे खूप मोठ जिकरीच काम आहे. एक सोप्पं उदाहरण तुम्ही कधी तुमचा कॉम्पुटर जमिनीवर आदळून अगदी ५ फुटावरून परत चालू केला आहे ?? किवा घरातील कोणतीही इलेक्ट्रोनिक वस्तू जर अशी आदळली तर ती परत सुरु होणा अगदीच अशक्य. मग कल्पना करा २५ जी फोर्स मध्ये काय होत असेल. (माणूस फक्त ९ जी फोर्स पर्यंत स्वताला सहन करू शकतो ते सुधा अद्यावत प्रशिक्षण घेतलेले आणि जेट विमान चालवणारे चालक ) . या सर्व कठीण परिस्तिथी मध्ये सुधा कॉम्पुटर ने काम करावा या साठी विशिष्ठ बदल करावे लागतात आणि ते करून मगच आपल्याला भूस्ताराचा अभ्यास करता येऊ शकतो आता तुमच्या लक्षात आलाच असेल कि हे सगळा करण्यासाठी पैसा आणि संशोधन आलाच आणि त्याच बरोबर याचा वापर करण्यासाठी पैसे मोजणं हि आलंच. अशी अद्यावत उपकरणा चालवण्यासाठी त्याचा योग्य आणि नीट वापर करणारे लोक हि आलेच आणि त्याच बरोबर मिळणारा मानधन हि.
जमिनीखालून मिळणार ओईल हे जमिनीच्या खाली दबलेला असत आणि त्यावर प्रचंड दाब हि असतो. कल्पना करा एखाद्या हवा भरलेल्या फुग्यामध्ये तुम्ही टाचणी टोचली तर काय होत तर बाहेर निघणाऱ्या हवेच्या जोरामुळे अति प्रचंड दाब निर्माण होऊन फुगा फुटतो. तसच ओईल असलेलं भूस्तर प्रचंड दाबाखाली असत आणि आपण करणारा ड्रील हे त्या टाचणीचा काम करत. जर बाहेर येणारा ओईल दाबला नाही तर वाटेत येणारा सगळ उद्वस्त करते. गल्फ ऑफ मेक्सिको मध्ये झालेला हाहाकार वाचलास असेल याला ब्लो ओउट अस म्हणतात. अस होण्यापासून रोखण्यासाठी ड्रील करताना मड वापरतात . यात काही रासायनिक द्रव्य मिसळेली असतात. या मड चा दाब हा त्या ओईल च्या दाबा पेक्षा जास्त असेल तरच आपण व्याव्स्तीथ ड्रील करू शकू म्हणूनच या क्षेत्रात धोके खूप आहेत. प्रत्येक गोष्ट हि दोनदा तपासून मग केली जाते एखादी चूक आणि त्याचा फटका एखाद्या कंपनीच्या नाशा मध्ये होऊ शकतो. बी पी या कंपनी ला गल्फ ऑफ मेक्सिको मध्ये बसलेला झटका १५ बिलियन अमेरिकन $ चा आहे. त्या शिवाय पर्यावरणाचा नाश, जीवितहानी अस न भरून येणार नुकसान हि आहे. त्याच बरोबर ड्रील करताना उपयोगात येणारे रासायनिक द्रव्य हि आजूबाजूचा पाणी , जागा हे सगळा खराब करत असतात.
ड्रील झाल्या नंतर त्यातून ओईल काढायला सुरवात होते. ओईल वर असणार्या दाबा मुळे ते स्वतःच वरती येते पण जर जास्ती वेळ काढल्यावर त्या वरील दाब कमी होतो व मग सक्शन पंप किवा अर्तिफ़िशिअल लिफ्ट या तत्वाचा वापर करून ओईल बाहेर काढला जाते. ते येताना त्या बरोबर पाणी, नैसर्गिक वायू, तसेच सगळ्यात घातक H2S वायू सुधा बाहेर येतो. H2S वायू प्राणघातक असून त्याच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्याने मृत्यू ओढवू शकतो. बाहेर येणारे सगळेच वायू उपयोगी नसतात आणि त्यांना साठवणं सुधा घातक असते म्हणून त्यांना जाळून टाकण्यात येत. आधी बाहेर निघणारा नैसर्गिक वायू सुधा जाळला जात होत आता याचा उपयोग घरघुती वापरासाठी तसेच गाड्यान मध्ये केला जातो.
इकडे नोकरीच्या संधी खूप आहेत कारण घरापासून लांब राहुन काम करावा लागत असल्याने खूप कमी जण या क्षेत्राकडे वळतात. त्याच बरोबर धोके हि आहेतच पण इकडे मिळणार मानधन हे तुम्हाला साध्या ऑफिस नोकरीत मिळणाऱ्या मान्धांच्या कैक पट असते. कदाचित एखाद्या ठिकाणी ३० वर्ष नोकरी करून तुम्हाला जितका मानधन मिळणार नाही ते तुम्ही इकडे ५ वर्षात कमवू शकता. त्याच बरोबर ६ आठवडे कामा नंतर ३ आठवडे भरपगारी सुट्टी किवा २८ दिवस कामा नंतर २८ दिवस भरपगारी सुट्टी. इतका असून सुधा घरचा विरह हा आहेच त्याच बरोबर धोके सुधा. ज्यांना काहीतरी वेगळा करायचा आहे ज्यांना घरून आई, बाबा, बायको , नवरा , मुलगा, मुलगी या सर्वांचा सपोर्ट आहे त्यांनी या क्षेत्रात यावं. मुळातच स्वस्थ जीवन जगणाऱ्या माणसांचा हे कार्य क्षेत्र नक्कीच नाही ज्यांना धडपड करायची आहे आणि खूप काही शिकायचं आहे , त्याच बरोबर चांगला पैसा कमवायचा आहे त्यांनी या क्षेत्राचा आवर्जून विचार करावा. इकडे विहिरीला आडवा करणाऱ्या आणि बरोबर त्या भूस्तारात नेणाऱ्या व्यक्ती दिवसाला जवळ पास ३०,००० रुपये कमावतात आणि त्या शिवाय तुमचा पगार वेगळा म्हणजे निदान ८-१० लाख रुपये एका महिन्याला तुम्ही आरामात कमवू शकाल पण त्या साठी हवी जिद्द, जवळ पास १५-२० वर्षांचा अनुभव या क्षेत्रातला आणि घरच्यांचा सपोर्ट. या क्षेत्रात पैसा नुसता नाही तर बरच काही शिकायला हि मिळत आणि एक आपण केलेल्या कामाची अनुभूती हि आहेच. येणाऱ्या काळात ह्या क्षेत्राचा महत्व वाढतच जाणार आहे आणि हो त्या योगे मिळणार मानधन आणि अमर्याद संधी. कारण अजून आपण पृथ्वीचा ६०% भाग शोधलाच नाही ओईल साठी कारण तशी व्यवस्था आपल्याकडे न्हवती उद्या कदाचित ती असेल आणि येणाऱ्या संधी सुधा.

.....विनीत वर्तक

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान उपयुक्त माहिती... येथे दिल्याबद्दल धन्यवाद. अनेक प्रश्न आहेत.

ऑईलचे (कच्चे तेल) प्रकार असतांत का? सैदी मधे असणारे तेल हे जास्त दर्जेदार किंवा त्यावर कमी प्रक्रिया करावी लागते आणि अल्बर्टा मधे मिळणार्‍या तेलावर अनेक प्रक्रिया कराव्या लागतांत म्हणुन कमी दर्जाचे.

माहितीपुर्ण लेख!!!

शुद्धलेखनाबाबत श्री यांच्याशी सहमत. वाचताना अडखळल्यासारखं होतं उगाचच.

सगळ्यांचे आभार आणि शुद्धलेखनाच्या बाबतीत काळजी घेईन पुढील लेखात.. Happy
नोकरीच्या संधी अमाप आहेत या क्षेत्रात पण काही निवडक जबाबदार्यांचा संकलन दुसर्या लेखमालेत करीन..:)