ओईल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र ..... एक उत्कृष्ठ करियर पर्याय

Submitted by विनीत वर्तक on 13 July, 2012 - 22:52

ओईल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र ..... एक उत्कृष्ठ करियर पर्याय

ओईल आणि नैसर्गिक वायू क्षेत्र म्हंटला कि आपल्या समोर दिसते ते पेट्रोल आणि डिसेल आणि आपल्या घरी नळावाटे येणारा नैसर्गिक वायू. याचा उत्पादन कस केल जाते याचा आपल्याला फारच जुजबी माहिती असते. थोडूस या क्षेत्रा विषयी. मुळात ह्या दोन्ही गोष्टी पृथ्वीच्या भूगर्भात तयार होतात. त्या साठी लागते ओर्गानिक गोष्टी ज्या भूस्त्रामध्ये दाबल्या जाऊन त्यांचा विघटन होत आणि योग्य ते तापमान आणि दाब मिळाला कि याचा रुपांतर होते क्रूड ओईल मध्ये. याला हायड्रोकार्बन असा हि म्हंटला जाता कारण यात जास्ती करून हायड्रोजन आणि कार्बन याची संयुग असतात. हि संयुग तयार होण्यासाठी बर्याच गोष्टी जुळून यावा लागतात प्रथम ओईल तयार होत आणि मग जस खोलवर जाऊ तसा नैसर्गिक वायू यातही बरेच प्रकार आहेत. तयार झालेला ओईल एखाद्या विशिष्ठ भूस्तारात होते आणि जेव्हा हि प्रक्रिया पूर्ण होते तेव्हा त्याला पूर्णत्वास गेलेला दगड किवा भूस्तर असा म्हणतात.
हि एक क्लिष्ठ प्रक्रिया आहे आणि हि होण्यासाठी करोडो वर्ष जावी लागतात. म्हणजे आज आपण जे ओईल काढतो आहोत त्याची सुरवात करोडो वर्ष पासून झाली आणि आजही ओईल तयार होते आहे फक्त आपण आज ज्या वेगाने काढतो आहे तो वेग तयार होणाच्या वेग पेक्षा अति प्रचंड आहे आणि म्हणूच हळू हळू याचे चटके आपल्याला बसत चालले आहेत. ओईल च्या वाढणाऱ्या किमती हे त्याचाच द्योतक आहे.जगातील २०११ च्या अखेर जवळ पास १३२४ गुणिले १० चा ९ व घात इतका साठा आहे. आजच्या प्रमाणे जर आपण ओईल काढत राहिलो तर जवळ पास अजून ६४ वर्ष हे ओईल पुरू शकेल परंतु हि संख्या अतिशय ढोबळ मानाने आहे. प्रत्येक देश स्वताचा स्वार्थ बघून किती ओईल चा उत्पादन करायचा ते ठरवत असतो आणि त्याचा सरळ सरळ परिणाम ओईल च्या किमतीवर होतो. जगातील सगळ्यात मोठा ओईल चा साठा २०११ अखेर सौदी अरेबिया कडे नसून वेनुझुएला या दक्षिण अमेरिकेतील देशाकडे आहे यातून दररोज २.१ गुणिले १० चा ६ घात इतका ब्यारल ओईल काढला (१ ब्यारल म्हणजे जवळ पास 150 लिटर ) तरीसुद्धा पुढची ३९१ वर्ष ओईल पुरेल इतका हा अति प्रचंड साठा आहे. तर त्या खालो खल नंबर लागतो सौदी अरेबियाचा हा देश रोज ८.९ गुणिले १० चा ६ घात इतका ब्यारल ओईल रोज काढतो या हिशोबाने त्यांच्या काढील ओईल जवळ पास ८१ वर्ष पुरेल. आज आपण रोज ९०००० ब्यारल इतका ओईल फस्त करत आहोत आणि त्यात भर पडतच आहे. म्हणूच येणाऱ्या काही काळात हे क्षेत्र पूर्ण जगाच्या दृष्टीने अतिशाय महत्वाची भूमिका बजावणार आहे.
मुळात ओईल हे जगाच्या अश्या ठिकाणी मिळते कि सगळे भाग हे काम करण्यासाठी अतिशय दुर्गम मानले जातात. सांगायचा झाला तर वाळवंटी प्रदेश, समुद्र आणि पृथ्वीचे दोन ध्रुव. त्या मुळेच या क्षेत्रात काम करण्यात खूप जोखीम असते पण या जोखीम मुळेच तुम्हाला मिळणारा मोबदला सामान्य नोकरीच्या कितेक पट असतो. मुळात ओईल जमिनीखालून बाहेर काढणा आणि त्या पासून पेट्रोल आणि डिसेल बनवणा हि खूप खर्चिक प्रक्रिया आहे. सांगायचा झाला तर एका खोल समुद्रात उत्खनन करणाऱ्या रिग चा भाव असतो रुपये २०,००० प्रत्येक मिनिटाला. म्हणजे तुम्ही जर कामात ५ मिनिटे वाया घालवली तर तुम्ही कंपनीचा १ लाख रुपयांचा नुकसान केलं. इतका प्रचंड पैसा या सर्व प्रक्रियेत लागतो कि मुळातच खर्चिक असणारी हि प्रक्रिया देशो देशांच्या भांडण आणि श्रीमंत होणाच्या वृतीने अधिक खर्चिक होते. आता तुमच्या लक्षात आलाच असेल कि या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांचा नफा आणि ऐकून कामाचा आवाका किती प्रचंड असेल. थोडक्यात सांगायचा झाला तर अएक्सोन मोबिल या कंपनी २०११ चा रेवेनु आहे ४८६ बिलियन अमेरिकन $ मी ज्या कंपनीत काम करतो तिचा रेवेनुये आहे ४० बिलियन अमेरिकन $ आता हे उत्त्पन्न जगातील सर्वात श्रीमंत पद्मनाभन मंदिरात मिळालेल्या खजिन्याच्या दुप्पट आहे आणि ते हि एका वर्षातील.( पद्मनाभन मंदिरातील खजिन्याची आजमितीला किंमत आहे १ त्रिलिअन रुपये किवा २४ बिलियन अमेरिकन $ ) आणि मोबिल चा वार्षिक उत्पन्न या खजिन्याच्या २० पट आहे. मग इतका अति प्रचंड प्रमाणात पैसा ह्या कंपनी कमावत असतात आणि त्या योगे या क्षेत्रात काम करणारे सगळेच जण... क्रमश:

पुढील भागात ओईल कसा शोधतात काढतात आणि या क्षेत्रात असणार्या नोकरीच्या संधी , धोके आणि उत्त्पन्न विषयी...........

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

चांगली माहिती मिळत आहे, पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे.

भाव वाढतांना कधी इराक तर कधी लिबीया, सिरीया मधील परिस्थिती अशी कारणे एकायला मिळतात. आंतरराष्ट्रिय बाजारांत तेलाच्या किंमती कमी झाल्यातरी गेल्या सहा महिन्यांत आमच्याकडे गॅस-पेट्रोलचे दर काही कमी झाले नाही.

वाचतोय,
याविषयी थोडा अभ्यास आहे. माझ्या मते क्रुड ऑईलचा साठा आणखीनही आहे पण तो झाकून ठेवला गेला आहे. कदाचित भविष्यात तग धरता येऊन जगावर राज्य करण्यासाठी. Happy

पु भा प्र.

वर्तक साहेब अतिशय महत्वपुर्ण माहिती. Drilling Rig वर काम करणे म्हणजे फारच रोमांचक अनुभव असतो.

ऑफशोअर मधे Survey Vessel आणि Drilling Rig असे दोन प्रकार पहायला मिळतात. Drilling Rig वर काम करणार्‍यांना पर्यावरणा सोबत मानवी चुकां मुळे होणार्‍या धोक्यांनाही सामोरे जावे लागते. या जोखमीच्या कामासाठीच त्यांना इतरांपेक्षा ७ ते १० पट मोबदला ज्यादा मिळतो. तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी कंपनीद्वारे वेळोवेळी BOSIET, HUET, Advanced Fire Fighting, COXWAINE सारखे Safety Courses करविले जातात.

या क्षेत्रात कुशल कामगारांची मागणी दररोज वाढत आहे. त्यामुळे नविन पिढीने करिअरच्या दृष्टीने O&G Industry कडे एक सुवर्ण संधी म्हणून पाहिले पाहिजे.

महाराष्ट्रातील काही Geologist Colleges
Shivaji University, Vidyanagar, kohalpur 416004 (Offers Geochemistry also)
University of Pune, Ganeshkhind, Pune 411007
Nagpur University, Ravindranath Tagore Marg, Nagpur 440001
Mohanlal Sukhadia University, Pratap Nagar, Udaipur 313001
Goa University, PO Santacruz, Taleigoa Platean, Goa 403203
University of Bombay, MG Road, Fort, Mumbai 400032 (Offers Geochemistry and Geophysics)
Amravati University, Tapowan Road Camp, Amravati 444602
Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Aurangabad 431004
Swami Ramanand Teerth Marathwada University, Nanded 431603

खोल समुद्रात उत्खनन करणाऱ्या रिग चा भाव असतो रुपये २०,००० प्रत्येक मिनिटाला.>>> अगदी खरयं.. हा आमच्या कंपनीने नायजेरीयात पुर्ण केलेला MOPU Project.
_DSC3063.jpg

हजाराच्या नोट मागे ONGCची जी Rig दिसतेय... तीचे रुंपातर Mobile Offshore Production Unit मधे करण्याचे काम सध्या आमच्या कंपनी कडे आहे.
1000-rupees_India-Note.jpg

छान माहीती.
aban loyd च्या Drilling Rig वर 'इलेट्रीकल मेंटेनससाठी' काही दिवस राहीलो होतो.

हाय्ला - भारी आहे की...

रच्याकः इथे कोणि डाउन स्ट्रीम नाहि का? मी LNG production मधे आहे

माझे दोन शब्द
Oil and gas section is mainly divided in 3 parts. 1. Oil exploration, 2.Processing (refinery),3. Distribution. All these divisions are important and there is shortage of talented manpower in all the divisions.पण येथे नगाला नग म्हणुन माणसे भरता येत नाहीत. मी स्वतः एप्रिल पर्यन्त या क्षेत्रात होतो. Petroleum products storage &distribution (specility fire protection) पण आता power मधे आहे.

उत्तम माहिती

आता जाणकारांनी खालील माहिती पुरवावी.

१) या क्षेत्रात एन्ट्री लेव्हल साठी ( काय शैक्षणीक पात्रता ) लागते ?
२) इतर मोठ्या कंपन्यासारखी इथे ट्रेनी इंजिनियर्स ची भरती होते की अन्य काही शैक्षणीक पात्रता ?
३) कोणत्या अश्या मोठ्या कंपन्या आहेत जिथे ही भरती दर वर्षी होते.
४) इतर कोणत्या पदासाठी सातत्याने भरती चालु असते ?

इत्यादी

ह्या विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर (नोकरी साठी नव्हे) गिरीश कुबेर यांचे 'हा तेल नावाचा इतिहास आहे' हे पुस्तक जरुर वाचा.