बालप्रेम

Submitted by सौरभ उपाध्ये on 13 July, 2012 - 14:26

प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं" किंवा प्रेमाशी निगडीत आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो ,वाचतो पण सगळ्यात चर्चेचा विषय मात्र तरुणांचं प्रेम .कधी कोणी मुलगा मुलगी एकत्र दिसले कि लगेच चर्चा ,"तो बघ ! अमुकांचा मुलगा आणि ती बघ तमुकांची मुलगी ! ".पण त्या दिवशी मात्र वेगळ्या प्रेमाबद्दल ऐकायला मिळालं आणि हसू आवरत नव्हतं कारण आता पर्यंत बालनाट्य , बालकलाकार , बालवाडी आणि असं बरच काही ऐकलं होतं पण बालप्रेम ! हे काय असतं ? असा प्रश्न नक्की पडेल.

त्यादिवशी, मी घरी येत असताना खरंतर उन्हाळा असल्याने मी दमलेलो चालतानाही जाम कंटाळा येत होता पण जेव्हा बिल्डींगपाशी पोहचलो तेव्हा समोरून आमच्याच वाडीत राहणारा एक लहान साधारण ११ ते १२ वर्षाचा मुलगा "दादा ! दादा ! " असं ओरडत समोर आला. मला पाहून याला काय झालं असं मला वाटलं. मला कोणतीतरी गोष्ट सांगायची आहे म्हणून तो आपल्या समोर आला आहे हे त्याच्या चेहऱ्यावर दिसतच होतं. शेवटी मीच म्हणालो, "काय रे काय झालं ?". त्यावर तो एकदम उत्साहात बोलला," मला ती हो बोलली ". हे असं वाक्य ऐकणं म्हणजे खरंतर मोठा विनोदच होतं त्याचा ओसंडलेला आनंद पाहून मी म्हणालो," अरे वा ! मजा आहे तुझी ! " मग थोड्यावेळ त्याची प्रेमकथा कशीबशी ऐकून मी घरी निघालो.

शाळेत असताना बरेचदा कोणी मुलगा-मुलगी बोलताना मी पहिले नव्हते आणि मुलींशी जरी बोललो तरी कोणाला सांगताना ,"मैत्रीण नाही ! बहिण आहे ती माझी !" असं सगळ्यांना सांगायचो. खरोखर पण आता सगळं बदलय असं मोठी माणसे नेहमी बोलतात.अगदी शाळेत जाणारा मुलगा देखील आपल्या भविष्याच्या बाबतीत हा देखील विचार करून ठेवतो हे तेव्हा कळलं. पण आधी कॉलेज मध्ये असतना मन वेडं असतं असं बरेच जण बोलताना मी ऐकले होते पण आता शाळेतल्या मुलांचं मनही बरंच वेडं झालंय कारण हा वेडेपणाचा virus आता ७ वी च्या मुला-मुलीं मध्येही पोहचलाय. पण ! हा वेडेपणा खरंतर मजा , मस्करी न घेता आधीच रोखला पाहिजे ना ? कारणं या वेडेपणात काही वेगळे होऊन बसले नाही तर मिळवलं. पण तरी खरोखर अजून तो क्षण आठवला कि हसू आवरत नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: