एकटे मूल

Submitted by पालवी. on 12 July, 2012 - 17:29

आम्हाला ७ वर्शाची मुलगी आहे.दुसर्या मुला बद्दल आमचा विचार नव्हता.आम्ही सध्या अमेरीकेत आहोत.कीती काळ अजून असू ते माहीत नाही.सध्या इतरंची २ मुले बघून मुलगी खूप वेळा मला बेबी हवय म्हणून हट्ट करते.जर इथे राहीलो तर तिला भावंड असाव का? एकट्या मुलांच्या काय अडचणी असतात?मला काही आरोग्याच्या तक्रारी मुळे दुसर मूल झेपणार नाही वाटत.दत्तक घेण्यस नवरा तयार होत नाही.मुलीला काय समजवाव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पालवी, तुला तब्येतीच्या दृष्टीने दुसरे मूल शक्य नसेल, तर प्रयत्न सुद्धा करु नकोस. कारण शारीरिक कष्ट असतातच मूलाची काळजी घ्यायची म्हटले की. अमेरिकेत मुलांना एकटेपणा जाणवतो, तेव्हा दुसरे मूल असेल तर बरे, पण जर आपण त्या बाळाची काळजी घ्यायला समर्थ नसू तर मूल न होऊ देणे उत्तम.

तुझी मुलगी खूप लहान नाही, तिला समजावून सांग की आईला बरे वाटत नाही आहे आणि नवीन बाळामुळे जास्त त्रास होईल. तिला मित्र-मैत्रिणी मिळतील असे बघ, प्लेग्रुप वगैरे असतील तर शोध, काही क्लासेसना घाल (पोहणे वगैरे) जेणेकरुन तिला खूप कंटाळा येणार नाही. तिच्याशी खेळत जा. पुस्तके वाचून दाखव. हे सगळे सोपे नाही, काही वेळा आपल्याला कंटाळा येतो मुलांचे खेळ खेळायचा. जमेल तितके कर.

--

पालवी, तुला तब्येतीमुळे शक्य नाही, नाही तर मी दुसरं मुल असणं स्ट्राँगली रेकमेंड करते. स्वानुभव. प्रत्येक मुला/मुलीला एक तरी भावंड हवंच. यावर मी अजुन लिहेनच.

माझा प्रश्न पण थोडा फार असाच आहे.... कि.. माझी मुलगी आता nursury ला जाते ( वय साडेतीन ). ते hatti आहे.. लवकर तिची कोण बरोबर मैत्री होत नाही.. वेळ लागतो.. ( हे साहजिकच आहे हे माहित आहे) , वस्तू share करत नाही. त्या मुले मला असा वाटत कि आपण दुसर्या चा विचार करावा का ? म्हणजे तिच्या बरोबर खेळायला कोणी तरी हक्काचं घरी असेल..