मी बनवलेले फ्रेश क्रीम केक्स

Submitted by आह on 6 July, 2012 - 10:20

मागच्या वर्षीच जाणवलेली नवी आवड सध्या असा आकार घेतेय.आधी साधे सोपे आणि आता जरासे अवघड फ्रेश क्रीम केक्स बनवते आहे. ऑर्डर्स पण घेते पार्टी साठीच्या. नोकरी करून उरलेल्या वेळेचा हा उपयोग चालू आहे.
बरेच वेगवेगळे फ्लेवर्स केले आहेत.काही मी नवीनच करून पाहिलेत आणि ते अतिशय आवडले लोकांना. तर असा माझा छंद वजा छोटा व्यवसाय आहे.
अजून फोटोज करिता माझं फेसबुक पेज बघा http://www.facebook.com/aahcake
लहान मुलांचे बाहुल्यांचे पण फ्रेश क्रीम मध्ये केक्स बनवले आहेत.
व्यवसाय करत असल्याने रेसिपी नाही देऊन शकत आहे. तुम्ही माफ कराल अशी आशा करते.
धन्यवाद !

http://www.facebook.com/aahcake
अदिती

Fresh Cream Black Forest cake with Mini Mouse
428839_376375752418339_281049970_n.jpg

Fresh Cream Black Forest cake
541668_376375735751674_1758686264_n.jpg

Fresh Cream Coffee Walnut Cake
543296_349614305092109_1524938845_n.jpg

गुलमोहर: 

केक्स मस्त दिसतायंत. तुम्ही कुठे राहता ते बघायला प्रोफाईलला भेट दिली आणि टुणकन उडीच मारली. तुम्ही माझ्याच गावात राहता. नक्की घेणार तुमच्याकडून केक्स. फ्रेश क्रीम केक्स फार आवडतात Happy

फ्रेश क्रिम केक्स म्हणजे फक्त आयसिंग फ्रेश क्रिमची असते की केकमध्येही फ्रेश व्हिप्प्ड किंवा व्हिप्पींग क्रिम वापरलंय?
केक्स फारच छान दिसतायत.

धन्यवाद गं सख्यानो! अगो, हो मी रेडिंग मधे राहते. तू पण इथेच राहतेस ना? भेटूच कधीतरी.
तोपर्यंत माझ्या फेसबुक पेज ला भेट देऊन ते लाईक करू शकतेस म्हणजे हि बातमी लोकांपर्यंत पोचवयाला मदत होईल मला.

आह्हाह्हा.. काय फ्रेश आणी मस्त केक्स दिस्तायेत.. एकदम प्रोफेशनल आहेस गं तू
नुसते दिसतायेत आणी खाता येत नाहीत म्हणून ' आह' भरायला लावणारे आहेत तुझे केक्स Happy

वाह

लाजो खरा तर तुझे केक्स बघूनच मला स्फूर्ती मिळाली केक्स करायची. मिम्खुप घाबरायची केक्स करायला मागच्या वर्षी पर्यंत
त्यामुळे तुला खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्यांनाच ज्यांनी दाद दिलीये माझ्या कामाला.
खूप रेसिपीज शोधल्या इकडून तिकडून आणि मग माझी अशी एक रेसिपी तयार झाली प्रयोगांमधून.
गुलकंद केक तर अप्रतिम झाला. खूप नवीन नवीन केक फ्लावर्स केले मग, ज्याची रेसिपी कुठेही नव्हती.
अजून खूप केक्स आहेत फेसबुक पेज वर , जरूर चक्कर मारा.

आह,
मस्त. तुम्ही करत असलेला हा प्रयोग आवडला. नोकरी करुन उरलेल्या वेळात करताय, ग्रेट !!
व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा. Happy