आईची अजून काही कलाकारी

Submitted by अवल on 29 June, 2012 - 01:18

१. हे रंगीत दोर्‍याचे क्रोश्याने केलेले टी व्ही कव्हर
DSC_0253 copy.jpg

२.ही लहान बाळांची जाकिटं :
DSC_0248 copy.jpg२.

DSC_0250 copy.jpg

४. DSC_0251 copy.jpg

५. हे लोकरीचे पायमोजे
DSC_0255 copy.jpg

६. नात एम एस करायला अमेरिकेत चाललीय, तिच्यासाठी का नी लेग्थ कोट अन टोपी :
DSC_0256 copy.jpgDSC_0258 copy.jpg

७. ही आईची खासियत. वय वर्षे १ पासून ८ पर्यंत मुलाला बसणारी कानटोपी. घालाय काढायला अतिशय सोईची अशी. गळ्याजवळ प्रेस बटण असणारी. मुलं खळखळ न करता घालून बसतात Happy आता पर्यंत २०० च्या वर अशा टोप्या आईने केल्या आहेत.
DSC_0260 copy.jpgDSC_0261 copy.jpg

गुलमोहर: 

किती सुंदर वस्तु बनवते तुझी आई, नातीसाठी बनवलेला कोट व टोपी तर लाजवाब...... माझी आई देखील असे काही प्रकार करायची,नंतर नोकरीच्या धावपळीत राहुन गेले, तरी तिने बनवलेल्या वस्तु मी जपुन ठेवल्या आहेत....... हे काम खुप किचकट, सातत्याचे व मेहनतीचे आहे

अवल............खरंच तुझ्या आईला माझाही दंडवत! हातानी केलेलं विणकाम मला फार आवडतं.
तो नी लेन्ग्थ पांढरा कोट काय छान दिसत असेल घातल्यावर!
आणि ती शेवटची अनकॉप्लिकेटेड(घालायला) टोपी! मस्त!

वॉव खरंच मस्त...किती मेहनत ...सगळंच छान त्यात ती नातीचा कोट टोपी सही आणि बाळांचे कपडे खूप सुंदर

एक सहज सुचना : वरचा आइ शब्द "आई" असा हवा न? Happy

धन्यवाद सर्वांना.
वेका, धन्यवाद, केला बदल.
आज माझं म्हणजे नुकती माबो वर आल्यासारखं झालय. प्रत्येक पोस्टीत चुका Proud

आरतीतै,
फार फार मस्त...
आईने केलेल्या कलाकुसरीच्या गोष्टी कौतुकानं आणून आम्हा सगळ्यांना दाखवलंस, त्यासाठी तुझंच कौतुक आधी..
सगळंच आवडलं.. माझ्या आईच्या ऊबदार स्वेटर्स/ विणलेली शाल ह्यांची आठवण आली.. Happy

अवल, तुझी आई ग्रेट आहे. माझाही नमस्कार सांग. या वयात त्या इतकी बारीक कलाकुसर करतात हे खूप विशेष आहे.

अवल खूप छान .तुझ्या आईचा उत्साह दांडगा आहे. तुझ्या आईला _____________/\_____________. Happy एकदा भेटलच पाहिजे त्याना.
अग त्या मोठ्यांसाठी पण विणतात का? Wink

मस्त मस्त मस्त Happy
अग त्या मोठ्यांसाठी पण विणतात का? >> त्यांचे माहित नाही.. पण आमची आरती ताई आहे ना.. ती माझ्यासाठी विणनारे Proud

त्यांचे माहित नाही.. पण आमची आरती ताई आहे ना.. ती माझ्यासाठी विणनारे फिदीफिदी>>>>>>>>>.मला पण. Happy
अवल, माझा वाढदिवस कळवू का तुला? Wink

हो विणते की आई मोठ्यांसाठी पण.
वर्षा पुण्यात थंडी पडतच नाही ग हल्ली, नाहीतर नक्की केला असता बघ तुझ्यासाठी स्वेटर Wink खरच करू का? रंग सांग Happy

सह्ही! लहान बाळांची जाकिटं तर कसली गोडुली दिसत आहेत.माझं बाळ आता बरच मोठ झालय नाही तर मी पहिल्या जाकिटासाठी नंबर लावला असता Happy

Pages